Nojoto: Largest Storytelling Platform
omkarkapase5877
  • 17Stories
  • 25Followers
  • 95Love
    19Views

omkar kapase

  • Popular
  • Latest
  • Video
e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

○
कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।।
चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।।
पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला
तुमची गरज हाय।।
बारामती vision बघून लोकांची तर जळत हाय,
तुमच्या वर टीका करून,त्यांना दोनवेळच्या भाकरीची सोय करायची हाय।।
पण अजूनही  आमच्या महाराष्ट्राला साहेब तुमची गरज हाय।।
smart city साठी लोक जपान बरोबर करार करत ह्यात।।
त्यांना म्हणावं तुम्ही लवासा,कोरगाव पार्क,मगरपटा, अजून बघितलाच नाय।।
म्हणून सांगतो साहेब तुमची अजून ही महाराष्ट्राला गरज हाय।।
राजकारणच काय? सगळ्या ठिकाणी तुमची गरज लागत हाय।।
डोनाल्ड ट्रम्प ला सुद्धा तुमच्या शिवाय चैन पडत नाय।।
म्हणून साहेब तुमची आमच्या महाराष्ट्राला अजूनही गरज हाय।।
क्रिकेटच्या मैदानावर अजूनही चणक्यनीतीची गरज हाय।।
मातीतील खेळ, (कब्बडी) देशविदेशात नेणाऱ्या साहेबांच्या दूरदृष्टीची अजूनही गरज हाय।।
म्हणून साहेब आमच्या महाराष्ट्राला अजूनही तुमची गरज हाय।।
बांधावरच पोरग संसदेत पाठवायचं हाय।।
शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार बसवायचं हाय।।
म्हणून साहेब आमच्या महाराष्ट्राला अजूनही तुमची  गरज हाय।।।
                        ओंकार कापसे
                        (करामत संग्रह)

©omkar kapase #Journey
e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

तुझं हसणं!
तुझं सोबत राहणं!
 हेच माझ्या साठी खुप महत्वाचं आहे!
गरज नाही तुला माझ्या अधाराची,कारण
तू स्वयंपूर्ण!
तू चरित्रशील!
तू सरस्वती ! 
तू दुर्गा ! आहेस...

©omkar kapase कविता

#womensday
e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

मराठी भाषा किती अलंकारिक आणि सौंदर्यपुर्ण
बाहुपाश,अलिगंण,मिठी या शब्दातील भावना किती प्रसन्न करणाऱ्या, नाहीतर त्या Hug day या शब्दात ना आपुलकी आहे,  नाही भावना आहेत🤗

©omkar kapase #hugday कविता
e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

माई तुझ्याबद्दल लिहिण्याचं माझं धाडस होत नाही कारण तुझं आयुष्य शब्दात मांडणे खरंच कठीण आहे।
माई स्त्री दक्षिण्याचं लेणं कसग जपलं तु,
कितीतरी सावित्री ,आनंदीबाई ,अहिल्यादेवी घडवल्यास ग तू।।
पुराणकालखंडात लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, चण्डिका पहिल्या,
पण या सर्वांमध्ये माझ्या माई मला दिसल्या।।
माई तुला पाहिलेना तुझ्यात स्वराज्यमाता जिजाऊ दिसतात।
शून्यातून अनाथांच्या लेकराच स्वराज्य उभ्या करणाऱ्या मातेला दंडवत करतात।।
अनाथांची माई आहेस ग तू ,शिक्षणाचं  बीज जोपासणारी,
या युगातील सावित्री ,लक्ष्मीबाई आहेस तू ।
शील ,चारित्र्य जपण्याबरोबर, प्रसिद्धी,पैसा ,पुण्य तुझ्या वाट्याला ग,
पण कसंग माई गर्वाचा पर्वत नाही तुझ्याकडं ।।।
हजार लेकरांना पुन्हा अनाथ करून गेलीस माय।
पुन्हा जन्माला येशील तर हीच सिंधुमाय म्हणून जन्माला ये,
येथे आजही तुझी गरज आणि उद्याही असेल,
कारण आईला वांझ पण नसतंय माई......😢
                                                   ओंकार कापसे

©omkar kapase @सिंधुताई सपकाळ 

#BookLife

@सिंधुताई सपकाळ #BookLife #मराठीकविता

e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

मला तू आवडतेस मनापासून, कधी कधी विचार करतो,हीच का ती आपण ठरवलेली आपल्याला हवी असलेली, माझी तपश्चर्या भंग करणारी, परत नको म्हणून सांगूशी वाटत नाही?
तुझ्या डोळ्यांत पाहताना मी स्वतःला पाहत असतो, तुझी कोमल काया बघुन मी स्वतःला थांबवत राहतो!
नाही राहत मला भान तुला पाहताना?वृंदावणातील राधेशी ,स्वत्विक मिराशी तुला जोडताना।।
कृष्णाला नाही पहावी लागत राधा, त्याच्या नीलकंठा तुन ति च उमटत राहते।
प्रश्नाला सुद्धा उत्तर पडावे, उतरला ही प्रश्न पडावे अशी आहेस तू।
तुझ्या अबोल पणात न ठाव माझं स्वर्गसुख।।

©omkar kapase कविता

#lovetaj

कविता #lovetaj

e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

मला तू आवडतेस मनापासून, कधी कधी विचार करतो,हीच का ती आपण ठरवलेली आपल्याला हवी असलेली, माझी तपश्चर्या भंग करणारी, परत नको राहुदेत म्हणून सांगूशी वाटत नाही?
तुझ्या डोळ्यांत पाहताना मी स्वतःला पाहत असतो, तुझी कोमल काया बघुन मी स्वतःला थांबवत राहतो!                                                                                                                      नाही राहत मला भान तुला पाहताना?वृंदावणातील राधेशी ,स्वत्विक मिराशी तुला जोडताना।।
कृष्णाला नाही पहावी लागत राधा, त्याच्या नीलकंठा तुन ति च उमटत राहते।।  प्रश्नाला सुद्धा उत्तर पडावे, उतरला ही प्रश्न पडावे अशी आहेस तू।
तुझ्या अबोल पणात न ठाव माझं स्वर्गसुख।।


मन सैरभैर:-ओंकार कापसे

©omkar kapase #lovetaj
e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

आज माझा बाप हरताना मी पहिला व्हता।

माझा बापं मात्र अश्रूं ढ़ाळत व्हता,
पय पय गोळा करूण संसाराचा गाढा उभा केला व्हता,
पुराच्या पाण्याने सगळा प्रपंच मातीमोल झाला व्हता।।
अश्रूंना सुद्धा ऊर फुटत नव्हता,
छिटकर लावलेल्या मदतीचा पोटाला मात्र आधार व्हता।।
जनावरांनी अखेरचा श्वास कधीच घेतला व्हता,
त्यांनी उठून उभा राहावं म्हणून आधाश्यासारखं दावं मात्र सोडत व्हता।।
ताईच्या लग्नासाठी पोटगी मात्र जमवत व्हता,
पुरानं सगळा जमाखर्च मातीमोल केला व्हता।
ध्यायमोकळून रडताना आज माझा बाप पाहिला व्हता।।


आज माझा बाप हरताना मी पहिला व्हता।.......आर्जव

करामत संग्रह:-ओंकार कापसे अवकाळी मेघप्रलय....

अवकाळी मेघप्रलय.... #poem

e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

आज मिठी थोडी सैल झाली बघ।
●वेळेचं भान जपलं बघ दोघांनी 
○किनाऱ्याच्या अंत दिसणे गरजच झालं तुझ्या भेटीत उभं जाणवली बघ।।
○डबडबलेल्या डोळ्यात मायेची काळजी होती बघ,
○म्हणून आजची मिठी थोडी सैलच केली बघ।
○भेटलं बघ पुन्हा कधी तरी स्वप्न पाहणे सोडू नकोस,
○त्या वळणावरच्या पाऊल खुणा जपुन ठेव
○ माझी आठवण घेऊन येतील माझी..........क्रमश
○

e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

आज मिठी थोडी सैल झाली बघ।
○वेळेचं भान जपलं बघ दोघांनी 
○किनाऱ्याच्या अंत दिसणे गरजच झालं तुझ्या भेटीत उभं जाणवली बघ।।
○डबडबलेल्या डोळ्यात मायेची उभं जाणवली बघ,
○म्हणून आजची मिठी थोडी सैलच केली बघ।
○भेटलं बघ पुन्हा कधी तरी स्वप्न पाहणे सोडू नकोस,
○त्या वळणावरच्या पाऊल खुणा जपुन ठेव माझी आठवण घेऊन येतील माझी..........क्रमश
○

e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

आज खुप दिवसांनी पाहिले तुला,
छान दिसत होतीस!
तुझ्या चेहऱ्यावरची बट हलकेच
कानामागे घेताना,
नजरेचा वेध मात्र घेत होती।।
डोळ्यांमधले कोमल भाव,
                              मनातील अबोल पणा अजून जपला आहेस तू।                          लहान मुलीचा नखरेपणा अजून दिसतो तुझ्यात,
तुझ्या निखळ चेहऱ्यांवरचे हास्य,
छेद करतात माझ्या हृदयात।।
तुझ्या हनुवटी वरचा तीळ,
केंद्रबिंदू बनून माझ्याकडे पाहत होता।।
तुला पाहताना ,आसमंत तुझ्यात सामवताना
आठवण करून देतात तुझ्यातल्या मला ,आणि माझ्यातला तुला आभासी प्रतिमांना।।
कृष्णार्णव.....

loader
Home
Explore
Events
Notification
Profile