Nojoto: Largest Storytelling Platform
ashleshmade1531
  • 29Stories
  • 14Followers
  • 331Love
    0Views

कधी प्रेम कधी विरह

  • Popular
  • Latest
  • Video
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White मागणं काही नाही बाप्पा तुला 
फक्त प्रयत्नांना माझ्या साथ दे 
प्रामाणिकपणे शोधतोय मी रस्ता माझा 
फक्त निंदकांना जळणाऱ्यांना तेवढं मात दे...

मागणं काही नाही बाप्पा तुला 
हतबल होऊन थांबलेल्यांना पळ दे 
पार होईल प्रत्येक कठीण रस्ता 
फक्त विरोधकांना तेवढं बळ दे...

फार काही नको बाप्पा तुझ्याकडून 
सगळ्यांना सुखाचा समाधानाचा वर दे 
माणूस म्हणून माणसाला जगण्यासाठी 
तूझ्या पद्धतीने फक्त धीर दे...

अजून काय मागायचं बाप्पा तुला 
तिरस्कार करणारे भरपूर आहेत त्यांना थोडं संयम दे 
आणि विरहाच्या दुःखात जगणाऱ्यांना 
त्यांच्या वाट्याचं त्यांना हवं असलेलं खरं प्रेम दे...

©कधी प्रेम कधी विरह #Ganesh_chaturthi
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White किती त्रासदायक असतं ना 
न भेटता फक्त डोळ्यासमोरून तिला/त्याला जाताना बघणं 
फक्त एकमेकांना बघण्यासाठी 
एक एक क्षण आतुर असणं...

किती आतुरता असते ना एका भेटीची 
आणि त्या एका भेटीसाठी क्षणोक्षणी वाट बघणं
खूप त्रासदायक असतं असं दूर राहणं 
आणि न भेटता कधीतरी एकमेकांना लांबून बघणं...

समाज,परिवार,नातं ही भिती त्या प्रेमात 
तरीही लपूनछपून ते प्रेमाचं नातं निभावणं 
डोक्यात नको ते विचार आणि एकीकडे आपलं प्रेम 
खूप त्रासदायक असतं ना खरं प्रेम करणं...

ती नजरेसमोरून जाताना एवढंच वाटतं 
कधी होईल मनातलं स्वप्न पूर्ण 
आणि कधी होईल कायमची ती माझी 
बस्स एवढंच आता दिवसाढवळ्या स्वप्न बघणं...

©कधी प्रेम कधी विरह #sad_shayari
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White एकदा जर माणूस नजरेआड गेला 
तर तो नजरेसमोर कधीच येत नाही 
आणि हातातून निसटलेले प्रत्येक क्षण 
आयुष्यात परत कधीच भेटत नाही...

जवळ आहे जिवंत आहे तोपर्यंत ते जपा 
मेलं किंवा गेलं कायमचं तर कधीच मिळत नाही 
कारण, आवडलेली वस्तू असो किंवा माणूस 
प्रत्येक वेळी मनासारखं मिळत नाही...

मनातले सगळे संकोच लगेच दूर करायला हवं 
नंतर पच्छाताप करायला ही वेळ मिळत नाही 
इथे मेल्यावर सारेच काढतात डोळ्यातून अश्रू 
जिवंत असताना मात्र कोणालाच माणूस कळत नाही...

कोण किती दिवस असणार हसत खेळत आपल्यासोबत 
हे कोणाला कधीच जाण्याआधी कळणार नाही 
म्हणून आज बोला व्यक्त व्हा प्रेम दया आणि जपा नात्याला 
कारण, एकदा कायमचा गेल्यावर कोणीच कोणाला मिळणार नाही...

©कधी प्रेम कधी विरह #moon_day
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White Google ला सुद्धा माहिती असते 
तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कुठे जात आहात,
YouTube ला सुद्धा माहिती असते तुम्हाला कोणती व्हिडीओ आवडते,
Google Crome ला सुद्धा माहिती असतं तुम्ही काय Search करताय आणि कोणत्या website वर जाताय,
Gmail ला सुद्धा माहिती असतं तुमच्या मोबाईल मध्ये कोणाचा नंबर Save आहे आणि तुम्ही कोणाला Massage करताय,
    सांगायचं तात्पर्य हेच  की,
हे माणसानेच तयार केलंय आणि आपण यांना फक्त एकदाच Order दिलाय तरीही ते आपलं ऐकतात,आपल्याला काय हवं हे समजून घेतात, आणि हवं ते पुढे आणून देतात,
पण, आपण जन्मापासून किंवा कित्येक वर्षांपासून एखाद्याच्या सोबत वाढतो,क्षणोक्षणी सोबत वावरतो,अनेकांसोबत काही वर्ष घालवतो आणि तरीही सोबत राहून सुद्धा हे माहिती नसतं आपल्याला काय हवं, काय आवडतं, काय करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय, हे काहीच माहित नसतं...
माणसाने तयार केलेली यंत्र माणसांपेक्षा जास्त माणसाला समजून घेतात की काय?
कारण, खरं तर यंत्र भेदभाव करत नाही हे सगळं करताना,
की, हा माणूस कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा,श्रीमंत की गरीब हे काहीच बघत नाही,
पण माणसे हे सगळं बघून आयुष्य जगतात 
कारण, बरेचदा आपल्याला काय हवं यापेक्षा समाजाला काय आवडतं हे बघून आपण आपलं आयुष्य जगतो.

©कधी प्रेम कधी विरह #Sad_shayri
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

वासनांध झालेल्या अशा भडव्यांना 
भर चौकात गोळ्या घालावंसं वाटेल जरी 
बांधले इथे हात कायद्याने सगळ्यांचे 
हातात असेल तुमच्या बंदूक जरी...

कित्येक होतात इथे बलात्कार रोज 
मोकाट फिरतात असे आरोपी तरी 
फक्त काढायचं कॅण्डल मार्च अनं करावं आक्रोश 
डोळ्यासमोर होईल कोणाचा बलात्कार जरी...

लिहिलं कितीही ताकदीने विद्रोह करून कवींनी 
वाचून इथे पेटतो, उठतो,लढतो कोण तरी 
वासनांध बलात्कारी फिरतो नेहमीच मोकाट 
लाखो च्या संख्येने जरी येईल जनता रस्त्यावरी...

तुरुंगात मिळेल बिर्याणी अनं सोयीसुविधा त्यांना 
रोज करतील असे निर्घृन पाप जरी 
येतील घटनेतील कलमे आड आपल्या 
असे रोज आपल्या नजरे समोर घडेल तरी...

राजकारण चालेल थोडाफार लोकांना भुलवायला 
अनं न्यायालयात चालेल खटला कित्येक वर्षावरी 
फिरतील असेच वासनांध पापी मोकाट 
जोपर्यंत घडणार नाही असे प्रत्येकाच्या घरी...

चिडतील,लढतील,मोर्चे काढतील प्रशासनाच्या विरोधात 
अनं पडतील डंडे पोलिसांचे आपल्याच ढुंगणावरी 
सुटतील निर्दोष वर्षनुवर्षे असे बलात्कारी 
 कठोर शिक्षा होणार नाही अशा नराधमांना जोवरी....

©कधी प्रेम कधी विरह #feelings
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White मरण येतपर्यंत सोडणार नाही हात तुझं 
म्हणून ही काळजी कधी करशील नको 
आलंच जर मरण तुझ्या आधी मला 
तेव्हा ही हात सोडून रडशील नको...

बघू शकणार नाही मी तेव्हा तुला 
पण गेलो म्हणून धीर सोडशील नको 
करशील तू तूझ्या आयुष्याचा प्रवास पूर्ण 
पण मी मेलो म्हणून तू तुझं जगणं सोडशील नको...

ज्याचा त्याचा प्रवास लिहिलेलंच आहे 
तेव्हा अर्ध्यात दगा दिल्याची बोंब करशील नको 
असेल तोपर्यंत जीव लावणारच मी तुला 
तू फक्त जगण्याला हरशील नको...

जिवंत असताना कायम प्रेम मिळेल माझं 
त्यासाठी खऱ्या प्रेमाला कधी झुरशील नको 
गेलोच जर वचने मोडून शेवटचं सोडून 
तेव्हा मला कधी माफ करशील नको...

बघतोय आयुष्य आणि प्रेमाची रेषा कुठपर्यंत असेल माझी 
तू मात्र तुझ्या हातावरच्या रेषा बघशील नको 
माझं आयुष्य आणि प्रेम दुप्पट देऊन जाईल तुला भेट 
तू मात्र स्वतःला माझी कमी भासू देशील नको...

तू तुझं आयुष्य जगशील नेहमी आनंदी 
मी निघून गेल्यामुळे हिरमसून जाशील नको 
जमलंच जर तर बघत राहीन तुला नेहमी 
तू मात्र मला कधी विसरून जाशील नको....

©कधी प्रेम कधी विरह #love_shayari
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White अजूनपर्यंत ती माझी 
हक्काची बायको तर झाली नाही 
पण, कसं सांगू तिला मी 
हक्काच्या बायको पेक्षा ती कमी नाही...
सात जन्माची वचने वैगरे काय?
ह्याच जन्मातच कधी सोडणार नाही 
दगा देणं तर रक्तातच नाही आपल्या 
म्हणून पहिली आणि शेवट तिच्याशिवाय कुणी नाही...
तिच्याविना अर्धवट हे आयुष्य 
म्हणून तिच्याशिवाय जगणं नाही 
काही नको फक्त तीच हवी मला 
देवाकडे अजून कोणतं मागणं नाही...
जमेल तेवढं झेपेल तेवढं सुख देईल तिला 
पण काहीच कमी पडू देणार नाही 
एकवेळ मी उपाशी राहील तेव्हा 
पण तिला देईल हवं ते सर्व काही..
कसलाच त्रास नाही देणार तिला 
हे फक्त शब्द नाही तर आहे माझी ग्वाही 
कळत नकळत जर दुखावली कधी माझ्यामुळे 
तर माफी मागायला ही मागे पडणार नाही...
सात जन्म, कुंडली वैगरे सर्व थोतांड असते 
प्रेम आणि समजदारी असते सर्व काही 
ज्याला जगता येतं मिळतं त्यात समाधानी राहून 
त्याला हवं नसते अजून काही...
आकर्षण असतं तर प्रेमिका च असती उपभोग घेतपर्यंत 
अशाची बायको कधी कोणी होणार नाही 
पण प्रेमिका आणि बायको असं सुख लग्नाआधी 
प्रत्येकाला मिळतं असं नाही...
मिळेलच जर अशी कुणी जीव ओतणारी 
तर कधीच तिला अर्ध्यात सोडणार नाही 
प्रेमिका हिच बायको ही असणार 
तरच ही कविता व्यर्थ लिहिलेली असणार नाही...

©कधी प्रेम कधी विरह #sad_shayari
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

प्रेम म्हणजे 
स्वतःला एकदुसऱ्यात झोकून देणं 
एकदुसऱ्याच्या आयुष्याचा भाग होणं 
शरीर दोन आणि आत्मा एक असणं 
मरेपर्यंत एकदुसऱ्यासाठी प्रामाणिक असणं 
दुनिया विरोधात गेली तरी आपण एकमेकांच्या सोबत कायम असणं 
जात-पात,श्रीमंत-गरीब,धर्म-पंथ, उच्च-नीच दरी मोडून एकत्र असणं 
एकाला रडायला आलं तरी दुसऱ्याच्या डोळ्यात अलगद अश्रू येणं 
एकदुसऱ्यासाठी सगळ्या जगाशी लढण्याचा बळ असणं 
लाख जरी बोलले एकमेकांविरुद्ध तरी विश्वास अतूट असणं 
कितीही वादळ आलं तुफान आलं अगदी सुनामी आली तरी एकमेकांचा हात न सोडणं 
आपल्या प्रेमाला कुणीच हरवू शकत नाही एवढा पक्का विश्वास असणं 
एकमेकांना समजून घेणं आणि चुकलं तर समजावून सांगणं 
निसंकोच हवं ते एकदुसऱ्याला देणं आणि मागणं 
प्रेमा व्यतिरिक्त कुठलाही स्वार्थ मनात नसणं 
कोणाच्या बोलण्याने कोणत्या भीतीने सहज तुटेल इतका कच्चा प्रेम नसणं
एकमेकांचं ऐकणं ऐकून घेणं निर्मळ मनाने व्यक्त होणं 
काहीही न लपवता सारं काही स्पष्ट सांगून नेहमी खरं बोलणं वागणं 
एकमेकांना स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही दगा न देणं 
कळत नकळत झालेल्या चुका स्वीकारून माफ करणं 
साऱ्या जगाला विसरून दोघेच आहोत असं अनुभवणं 
नात्याला हवी तितकी वेळ नेहमी देणं, आणि 
नात्याचा कंटाळा आलाय म्हणून पर्याय न शोधणं 
प्रेम म्हणजे मरण जरी आलं तरी कधीच वेगळं न होणं....

©कधी प्रेम कधी विरह #happypromiseday
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White आयुष्यात खरं प्रेम मिळायला भाग्य लागतं 
प्रत्येकांच्या नशिबात ते नसतं 
ज्यांच्या नशिबात मिळालं खरं प्रेम 
त्यांना त्याचं महत्व लवकर कळत नसतं...

वेळ निघून गेलेली असते ती 
जेव्हा खऱ्या प्रेमाचं महत्व कळतं 
जेव्हा समजायला लागतं दूर गेलेला माणूस 
तेव्हाच मात्र ते आपल्या जवळ नसतं..

वस्तू असो किंवा व्यक्ती आपल्याजवळ 
त्याचं मोल आपल्या आयुष्यात तेव्हा काहीच नसतं 
हा मात्र सवय लावून दूर निघून गेलेली व्यक्ती 
पुन्हा मिळवणं फारच कठीण असतं...

वेळ हातात असते तेव्हा जपणं फार महत्वाचं 
तेव्हा मिळवण्यासाठी लढणं गरजेचं असतं 
जर निघून गेली व्यक्ती आयुष्यातून कायमची 
तेव्हा हातात मात्र काहीच उरत नसतं...

आयुष्यात एकदाच मिळते संधी कोणतीही 
त्या संधीला सहज गमवायचं नसतं 
मिळालेल्या संधीचे सोने करणं आपल्या हातात असतं 
ते मिळवण्यासाठी मनात जिद्द, बळ आणि प्रेम फार असावं लागतं...

©कधी प्रेम कधी विरह #moon_day
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White मला लग्न करायचंय 
व्यापार नाही
सारं काही स्वतःसाठी करायचंय
इतरांसाठी नाही..
नाही बघत मी जात,पात,धर्म 
यात कोणतेही तथ्य नाही 
हवं मनासारखं जोडीदार 
याशिवाय सत्य नाही..
समाज आज उद्या रोज बोलेल 
पोसेल मात्र कुणी नाही 
सल्ला तर सगळेच देतील 
सोबत असतील कुणी नाही..
एका दिवसाच्या पाहण्यात 
समजेल आपल्याला कुणी नाही 
महिनोमहीने सोबत जरी 
ओळखलं अजून कुणी नाही..
नाक नक्ष अनं दिसायला सुंदर जरी 
आयुष्य काढणं सोपं नाही 
स्वभाव कोणाचा कसा 
अनुभवाशिवाय कळतं नाही..
बघणं,भेटणं,आवडणं, ठरवणं 
लग्न याला म्हणत नाही 
मनात असलं प्रेम जर 
वेगळं कुणी करत नाही..
जात, धर्म, सुंदरता, संपत्ती, पैसा बघून 
खरं लग्न ठरत नाही 
ठरलं जरी करायचं समाजाप्रमाणे 
म्हणून असे लग्न फार टिकत नाही..
प्रेम असावं नात्यात आधीच 
प्रेम कधी सरत नाही 
इतर गोष्टी क्षणिक असतात 
कारण, आवड कधी उरत नाही..
म्हणून लग्न करायचंय मला खरं 
समाजासाठी व्यापार नाही 
नाही पटत मनाला माझ्या ह्या गोष्टी 
पण, माझं ही अशा लोकांना पटणार नाही...

©कधी प्रेम कधी विरह #love_shayari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile