Nojoto: Largest Storytelling Platform
akashmahalpure8044
  • 27Stories
  • 19Followers
  • 82Love
    0Views

आकाश महालपूरे

  • Popular
  • Latest
  • Video
f42cd1247f2cd918a0007c1fbd9c937b

आकाश महालपूरे

अगदी साधा माणूस... निळा बारीक चेक्सचा शर्ट साधीशी खुर्ची साधी बैठक... डाव्या बाहीचे बटण निघालेले होते पटकन लागत नव्हते सहज बोलता बोलता ते लावण्याचा प्रयत्न सुरू होता... दुसऱ्या प्रयत्नात लागले...

शब्द मनातून येतं होते पॉलिश न केलेले साधे शब्द... ना कुठला आवेश ना कुठली गडबड... ना अति आत्मविश्वास, ना भयगंड... एक ठाम शांत धीरोदात्त आवाज एक साधा चेहरा...

 लोकलच्या पहिल्या वर्गात दोन सीट्सच्या मध्ये उभ्या असलेल्या माणसाच्या वागण्यात असतो इतका साधेपणा...

महत्वाच म्हणजे राजकारण केलं पण आता करण्याची वेळ नाही हे सांगण्याची धमक... 

हे फक्त "बाळासाहेबांच्या" रक्तातच असु शकतं...!

-आकाश दिपक महालपूरे
f42cd1247f2cd918a0007c1fbd9c937b

आकाश महालपूरे

“नमस्कार मी "ज्ञानदा कदम"
ABP माझा वर तुमचं स्वागत करते”

रोज सकाळी टीव्ही सुरु केल्यानंतर ऐकायला मिळणारा एक ओळखीचा आवाज..,
म्हणजे "ज्ञानदा"..!
लहानपण आर्मीच्या शिस्तीत घालवणारी आणि घरच्यांच्या शिक्षिका बनण्याच्या अपेक्षेला सुरुंग लावणारी म्हणजे "ज्ञानदा"..!
मला बोलायला खूप आवडतं म्हणून या क्षेत्राकडे मी स्वतःला वळवले म्हणणारी म्हणजे "ज्ञानदा"..!
2007 सालच्या रिपोर्टर पासून आजच्या घडीला एक उत्कृष्ट अँकर म्हणून यशस्वी वाटचाल
म्हणजे "ज्ञानदा"..!
आतापर्यंतच्या कारकिर्दीत दोन वेळा उत्कृष्ठ अँकर चा पुरस्कार मिळवणारी आपली मराठी मुलगी 
म्हणजे "ज्ञानदा"..!
लग्नानंतरही घरच्या चटणी मिठापासून भाज्यांपर्यंत लक्ष ठेवत असताना कामाचा तोच वेग कायम ठेवणारी 
म्हणजे "ज्ञानदा"…!
हैद्राबाद प्रकरण असो वा हिंगणघाट घटना पाणावलेले डोळे पुसत रिपोर्टींग करणारी  त्यांच्यातली मुलगी
म्हणजे "ज्ञानदा"..!
पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या विशेषतः युवा पिढीसाठी एक आदर्श म्हणजे "ज्ञानदा"..!
प्रेक्षकांना काय सांगशील "ज्ञानदा" ??
या प्रश्नाला कोरोना व्हायरस च्या संक्रमणाच्या काळात काळजी कशी घ्यावी यावर भाष्य करणारी 
म्हणजे "ज्ञानदा"..!
न्युज चॅनेल च्या स्पर्धेच्या काळात स्वतःचा आवाज बुलंद ठेवणारी 
म्हणजे "ज्ञानदा"..!
“स्पर्धा असो वा संघर्ष
दाखवले तू पुन्हा एकदा..!

बघा "ज्ञानदा मॅम"..
मला पुन्हा तुमच्याविषयी लिहू वाटलं..

-आकाश दिपक महालपूरे #Dnyanda
f42cd1247f2cd918a0007c1fbd9c937b

आकाश महालपूरे

ProMiss Day
ईतरांना प्राॅंमीस करण्यापेक्षा आयुष्यभर आपली साथ न सोडणाऱ्या आई-वडिलांना नेहमी सुखात ठेवेल असं प्राॅंमीस करा..!

f42cd1247f2cd918a0007c1fbd9c937b

आकाश महालपूरे

ChokLet Day..
इतरांना हजारो रुपयाचे 'चाॅकलेट' देण्यापेक्षा कधीकाळी उपाशी झोपून आपल्याला पोटभर खाऊ घालणाऱ्या "माय-बापाला" कमाईतील दोन रूपयाचं एखाद साधं 'चाॅकलेट' तरी द्या..!

~आकाश महालपूरे

f42cd1247f2cd918a0007c1fbd9c937b

आकाश महालपूरे

Prapose Day..
एकमेकांना प्रपोज करण्यापेक्षा दिवस-रात्र राबराब राबनाऱ्या माय-बापाला आयुष्यभर जपण्यासाठी प्रपोज करा..!

f42cd1247f2cd918a0007c1fbd9c937b

आकाश महालपूरे

आज का सुविचार 

आनंदाची निर्मिती म्हणजेच समाधानाची पावती असते
जीवनात काही माणसे आनंद, सुख शोधण्याच्या नादात आपल्या अवतीभवती असणाऱ्या, साध्या वाटणाऱ्या गोष्टींना नजरंदाज करतात नि विनाकारण खेद करत बसतात. थोडक्यात, ज्यांना आनंद निर्माण करता येतो असे लोक नेहमीच आनंदी राहतात कारण, समाधानाची व्याख्या त्यांना कळलेली असते.

~आकाश दिपक महालपूरे
f42cd1247f2cd918a0007c1fbd9c937b

आकाश महालपूरे

आज का सुविचार 
मन आणि बुद्धी यांच्या क्षमतेंमधील समतोल साधते ती म्हणजे परिस्थिती.
कधी कधी मन आणि बुद्धी यांच्यात भावनिक आणि वैचारिक स्तरावर दंद्व सुरू असते. मनाला पटणाऱ्या गोष्टी बुद्धीला पटत नाहीत नि बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी मनाला पटत नाहीत. अशा वेळी ज्या-त्या वेळच्या परिस्थितीला अनुसरून आपल्याला निर्णय घेणे क्रमप्राप्त असते. हे काम फक्त येणारी परिस्थितीच करत असते.

~आकाश महालपूरे

f42cd1247f2cd918a0007c1fbd9c937b

आकाश महालपूरे

आज का सुविचार अभ्यासात चिंतन नि मनन असेल, तर विषय सहजपणे आत्मसात होतो.
वरवर वाटणारा विषय मग तो कोणताही असो, खूप अवघड वाटतो. पण, जसजसे अभ्यासाला चिंतन नि मननाची साथ मिळते त्या विषयाचा अभ्यास कायमस्वरूपी आत्मसात होतो. आपली ज्ञानाची कक्षा
वाढत जाते.

~आकाश महालपूरे #सुविचार
f42cd1247f2cd918a0007c1fbd9c937b

आकाश महालपूरे

आज का सुविचार अभ्यासात चिंतन नि मनन असेल, तर विषय सहजपणे आत्मसात होतो.
वरवर वाटणारा विषय मग तो कोणताही असो, खूप अवघड वाटतो. पण, जसजसे अभ्यासाला चिंतन नि मननाची साथ मिळते त्या विषयाचा अभ्यास कायमस्वरूपी आत्मसात होतो. आपली ज्ञानाची कक्षा
वाढत जाते.

~आकाश महालपूरे #सुविचार
f42cd1247f2cd918a0007c1fbd9c937b

आकाश महालपूरे

यशस्वी जीवनाच्या वाटेवरचं रहस्य..!

चारचौघांतला तिऱ्हाईत संवादही सहज विसरू न शकणारी ती तुमच्या दोघांतलं नातं अगदी सहज विसरू शकते..
तिला ते शक्य असते..
'स्त्री' इतकी कणखर असते मित्रा.‌.

तुम्ही मात्र कायम त्याच अशक्य अशा तिची वाट पाहत सापडता..
तेव्हा तुम्ही पुरूष असता..!

loader
Home
Explore
Events
Notification
Profile