Find the Latest Status about जीवनगाणे गातच रहावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनगाणे गातच रहावे.
Sujata Bhalerao
नुसत्या नको आणाभाका नकोत नुसत्या शपथा जीवनभराची साथ हवी शेवटपर्यंत विश्वास हवा मी तुला अन् तू मला सावरु संकटसमयी उज्ज्वल करु भविष्य संगतीने आपण दोघेही ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
हो मोकळी मनाने हितगुज सांग मनीचे.. नको घाबरुस आता सारी खोल गुपिते.. हा खेळ सावल्यांचा अविरत चालतो आहे.. चाचपडू नको कधीही चाल पुढे निर्धाराने.. या निष्पर्ण वृक्षांनाही पालवी फुटते नव्याने.. मग तूच थांबतेस का गं भर ओंजळ नवऊर्जेने.. जग आता स्वाभिमानाने जग तू नवविचाराने.. ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
नतमस्तक होऊनी चरणी लीन व्हावे... अन् तथागतांप्रती हृद्य भावगीत गावे... मूलमंत्राची शिकवण अत् दिप भव मज ठावे... साऱ्यांचे होईल मंगल हा आशिष देत जावे... 🙏💐 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे #गातच राहावे
Sujata Bhalerao
ही कातरवेळ जीवघेणी तुझ्या डोळ्यातील भय बरंच काही सांगतंय..... समाजव्यवस्थेचा चक्काचूर नाही सुधारणार का कुणी ? सुरक्षा गेली उडत.... काळोखी रस्त्याचे भय मदतीसाठीची आर्त किंकाळी भेदून जाते काळजाला.... तरीही थांबत नाही काही तूही धीटाईने सामना कर कारण लढाई एकटीची आहे 😌 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
कधीच नाही कंटाळा कधीच नाही आळस फुलतेस अविरत कायम टवटवीत असो कोणताही ऋतू नाही पडत कोडे कळी हळूच उमलते अन् फुले सदाफुली सदाबहार शिकवतेस सार जीवनाचे शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय हो ? सर्वांना आनंद देत सदा फुलणेच ना ! ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
MEERA
येतील समस्या सोडवत जा संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करुन पहा प्रत्येक गोष्ट मनापासून करत रहा सगळ्यांशी प्रेमाने आपुलकीने वागत रहा येणारा प्रत्येक क्षणा कडून काहीतरी शिकत रहा जे वाईट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून पहा जे चांगलं आहे ते आत्मसात करत रहा असे हे जीवन मस्त जगुन पहा ©MEERA #Likho #nojotomarathi #meera #जीवनगाणे
#Likho #nojotomarathi #meera #जीवनगाणे
read moreSangeeta Kalbhor
आयुष्य... प्रकाशाच्या वाटेने चालत रहावे कायम आपलेच आपल्यासाठी बनवून नवे नियम रहात नाही अंधार तसाही आयुष्यात ठाण मांडून आयुष्य आहे हे वेड्या कधी कधी घ्यावे की कांडूण चोथा असला म्हणून काय झाले असते सत्व त्यात उजेड येतोचं येतो गर्भार करुन रात फुटतात कळ्या टचकन अलगद अलगद उमलत समजण्यातचं माणूस करत असतो गफलत विसाव्याला असला किनारा की आयुष्य चालत राहतं थोडं थांबलं तरी ठेवावं आयुष्यभर वाहतं..... मी माझी...... ©Sangeeta Kalbhor #Identity आयुष्य... प्रकाशाच्या वाटेने चालत रहावे कायम आपलेच आपल्यासाठी बनवून नवे नियम रहात नाही अंधार तसाही आयुष्यात ठाण मांडून
#Identity आयुष्य... प्रकाशाच्या वाटेने चालत रहावे कायम आपलेच आपल्यासाठी बनवून नवे नियम रहात नाही अंधार तसाही आयुष्यात ठाण मांडून
read moreSangeeta Kalbhor
मी जीवनगाणे गातो आहे.. खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे नको वल्गना थातूरमातूर मी मलाचं माझ्यात शमवतो आहे घालू नका साद आता कोणी मी स्वतःतचं स्वतःला शोधतो आहे कितीक राहून गेलेल्या क्षणांना क्षणभर थांबून मोजतो आहे कोण माझा मी कोणाचा प्रश्न ना मला छळतो आहे क्षणभंगूर हे जगणे इथले क्षणही मला क्षणात कळतो आहे नको लत्करे विचारु आयुष्या तूला कधी का मी टाळतो आहे? वरपांगी नाही रे माझे मिलन तुझ्यास्तव अख्खं काळीज जाळतो आहे म्हणो कोणी काहीही मला मी माझे सुख दुःखालाच म्हणतो आहे देणे व्हावे माझ्या करवी माणूसपण एवढेचं मी जाणतो आहे..... मी माझी..... 09/03/2023 ©Sangeeta Kalbhor #holihai खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे न
#holihai खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे न
read more