Find the Latest Status about जातं वंशे भुवनविदिते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जातं वंशे भुवनविदिते.
Jaymala Bharkade
जातं माय दळते ग बाई एक एक दाणा भरडूनी गाते सुखी संसाराची ग गाणी दुःख कंठात गिळूनी जातं फिरते ग बाई गर-गर संगे बांगड्याच नाद घुमे खळ- खळ एक एक मुठ धान्य असे भरडले जात्याच्या पाळ्याखाली संगे तयाच्या सुख- भरडले जाय असा हा बयेचा सृजन गं संसार ©Jaymala Bharkade ❣️ जातं
❣️ जातं
read moreकवी - के. गणेश
आयुष्य कळून जातं.. एक चुराडा झालेलं स्वप्न थरथरत्या ओंजळीतून गळताना. फाटून जातं मनाचं आभाळ अश्रू स्वाभिमानाचे ढाळताना.. इथं रक्ताची नातीही परक्यासारखी वागू लागतात.. सावत्र आईच्या नजरेने दुरून बघू लागतात.. पाण्यावाचून वाळलेल्या झाडाचं उन्हालाही काही कळत नाही.. ढग भरून आल्याशिवाय खाली थेंबही गळत नाही.. गिळून घेतलेला आपमान धमन्यातून उसळत राहतो.. इथं दुनियेच्या ईर्षेनं जीव तळमळत राहतो.. निव्वळ वाऱ्याच्या वणव्यात अख्खं वय जळून जातं.. शून्यातून वर येताना आयुष्य कळून जातं..! copyright @kganesh 9028110509 आयुष्य कळून जातं..
आयुष्य कळून जातं..
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
तुला बघितल की मन फुलून जातं.. फुलताना मन माझं नव्याने जगून जातं .. जगताना आयुष्य सगळं निघून जातं.. जगलेल्या क्षणांना मन आठवून जातं .. आठवताना क्षणात मन अगदी रमून जातं... रमलेल्या मनाला जीवन फुलवून जातं.. जगता जगता अजून थोडं जगायचं थोड राहून जातं.. जगता जगता अजून थोडं जगायचं राहून जातं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर जगायचं थोड राहून जातं
जगायचं थोड राहून जातं
read moreमयुर लवटे
काही तरी राहून जातं... आपलं आयुष्य इतकं छोटं आहे हे सांगायचं राहून जातं, एवढे सारं जगून सुद्धा काही तरी राहून जातं... कुणावर कितीही जीव लावला काही तरी नक्कीच कमी पडतं, कुणावर कितीही प्रेम केलं पण काही तरी राहून जातं... कुणासाठी काहीही केलं ते सर्व काही विसरून जातं, कुणाला कितीही जपलं पण काही तरी राहून जातं... आपली नाती कितीही सुरक्षित ठेवली तरी त्याला नजर लागूनच जातं, कितीही नाते जुळविले पण काही तरी राहून जातं... इतकं प्रेम करून सुद्धा व्यक्त करायचं राहून जातं, प्रेमाचा क्षणोक्षण जगून पण काही तरी राहून जातं... -मयुर लवटे काही तरी राहून जातं... #Love #Life #for #you
yogesh atmaram ambawale
काहीतरी राहून जातं, नेहमीच का असं मनाला वाटतं. जे काही ठरवलं असतं,ते सर्वकाही होत असतं. तरी मन भरत नाही,वाटतं काहीतरी राहून जातं. बालपण जातं, तरुणपण जातं, येता वृद्धापकाळ वाटे जसं काहीतरी राहून जातं. शाळा होते,कॉलेज होते,पुढे जाऊन चांगली नोकरी ही लागते, प्रत्येक गोष्ट मनासारखी होत असते, तरीही,प्रत्येक टप्प्यावर असं का वाटतं, जसं काहीतरी राहून जातं. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीतरी राहून जातं.. #काहीतरीराहूनजातं चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Ma
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीतरी राहून जातं.. #काहीतरीराहूनजातं चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Ma
read moresandy
कुठल्याच पाठ शाळेत प्रेम शिकवता येत नाही.. शिकल्यावरच प्रेम कळतं अस ही काही असत नाही.. निरक्षर वा साक्षर असा भेद असत नाही.. प्रेम म्हणजे भाव
कुठल्याच पाठ शाळेत प्रेम शिकवता येत नाही.. शिकल्यावरच प्रेम कळतं अस ही काही असत नाही.. निरक्षर वा साक्षर असा भेद असत नाही.. प्रेम म्हणजे भाव
read morePratik Patil Patu
गंभीर! घरात आहे एक चिमुकला त्याचा कोणी मित्रच नाही मैत्री करायला गेला तरी मैत्री त्याची होतच नाही! वाद पाहतो घरातले पोरं आणि बायकां मधले चिडतो - भडकतो म्हणत असतो माझं कोणी ऐकतच नाही! सारखा आजारी पडतो शरीराची त्याला साथच नाही गोळ्या - बिस्कीट, हवं नको बाकी कुणाला काळजीच नाही! रोज नकळत चुका करतो सुनेचा मग ओरडा खातो तरी विचारा गप्प राहतो अंगात त्याच्या त्राणच नाही! तसं करा! असं नको! अगदी बालिश हट्ट त्याचा! लहानग्या सारखं वागून सुद्धा, बाळ! त्याला कुणी म्हणतच नाही! गरज आहे ती फक्त याला चिमुकला म्हणून स्वीकारण्याची! गंभीर! #oldfather #yqtaai #oldagehome #childhood मनाला लागलं की, शेअर केलं जातं सांगावं लागत नाही!
गंभीर! #oldfather #yqtaai #oldagehome #Childhood मनाला लागलं की, शेअर केलं जातं सांगावं लागत नाही!
read moreyogesh atmaram ambawale
प्रत्येक वेळेस हे असंच होतं, जेव्हा सर्व काही घडून जातं. तेव्हाच नेमकं असं वाटतं, जसं काहीतरी राहून जातं. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीतरी राहून जातं.. #काहीतरीराहूनजातं चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Ma
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीतरी राहून जातं.. #काहीतरीराहूनजातं चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Ma
read more