Find the Latest Status about हेचि थोर भक्ती अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हेचि थोर भक्ती अभंग.
somnath gawade
दीपोत्सव अंधारावर मात करुनी दिव्याने प्रज्वलित करू इथला प्रत्येक कण निराशेचे वादळ क्षमवून प्रफुल्लित होऊ दे सारे क्षण.. दिव्याने दिव्यत्वाची द्यावी प्रचिती संकटावर मात करण्या मिळावी गती अनिश्चिततेचे मळभ सारे निघून जावे प्रकाशाने सर्वत्र आशेचे किरण शिंपावे... #हेचि मागणे आता
#हेचि मागणे आता
read morevaishali
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼 मनमंदिरात | तूच आहे देवा || सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| कर जोडुनिया | तुला विनविते || साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे || आहे हे सांगणे | तुजपाशी ||३|| कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || दरवळे गधं | चोहीकडे ||४|| तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ || साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५|| 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #
# अभंग #
read moreMohan Somalkar
लावियल्या ज्योती (अभंग) लावियल्या ज्योती ॥ डोळ्यात भक्तीच्या॥ हरी भजनाच्या ॥ पांडुरंगा॥१॥ आळवितो तुला ॥ भक्तीत रंगतो॥ अभंगातुनि गातो॥ नाम तुझे॥२॥ दया, क्षमा,शांती ॥ तुझ्या ठायी भेटे॥ चित्त शांत वाटे ॥ तुझ्या ठायी॥३॥ नको राग -द्वेष ॥ नको मनी क्रोध ॥ भजनातुनी बोध ॥ घेऊ दे रे॥४॥ मन माझे लागे ॥ धावे तुझ्याकडे॥ गावया आवडे॥ गीत तुझे॥५॥ हरी मुखे म्हणा॥ झेंडा हाती धरा॥ पहाट प्रहरा ॥ नाम घ्यावे॥६॥ एक तरी ओवी॥ रोज म्हणा घरी॥ हरीपाठ दारी॥ नित्यदिनी॥७॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #अभंग
Mohan Somalkar
ऑडिओ- उपक्रम अभंग -४ ( एकादशी) ज्ञानीयाची वाणी॥ आणा आचरणी ॥ आनंद गगनी ॥ धावघेई॥१॥ मनन चिंतन ॥ अध्याय प्रत्येक ॥ पान ऐकऐक॥ करा नित्य॥२॥ मराठीची जाण ॥ भाषेचा सन्मान ॥ बाळगुया मान ॥ सदा मनी॥३॥ आज एकादशी ॥ उद्याची द्वादशी ॥ पुजुया तुळशी ॥ आज उद्या॥४॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar # अभंग
# अभंग
read moreMohan Somalkar
आषाढी एकादशी भक्त करिती वारी वाट चालती पंढरी आवडीने...! मोहन म्हणे आता मिडीयातही देव वसला प्रत्येक मोबाईलात विठुराया हसला......! तुका पाहती वरुन पुष्पक विमान पाठवितो खाली शिकवितो अभंग या त्यात बसुन.! असेल आवड श्री विठ्ठलाची मग कशास बाळगता भिती मरणाची...! निसंदेह, निर्मोही भक्ती करा स्वतःला पायरीत करा अर्पण नका चित्त ठेवा आपुले खेटरात..! काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल दोन्ही निरंतर हेची सर्व सुख...! मोहन सोमलकर नागपुर 🚩🚩🚩🎋 ©Mohan Somalkar #अभंग
Archana Pol
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह। संसाराचा मोह । सुटो आता ।।१।। नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।। वासनेचा जाळ । आगीचे मोहळ देहाचा विटाळ । जळो आता ।।३।। भावनांचा खेळ। सुखाचे साधन गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।। भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा संतसंग जीवा । जडो देवा ।।५।। तुझीया भेटीने । उजळो जीवन हरपावे भान । आनंदाने ।।६।। ©Archana Pol अभंग
अभंग
read more