Find the Latest Status about त्याचा येळकोट जाईना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याचा येळकोट जाईना.
Madhuri Chavan
🌧🌧🌧🌧🌧 या वेळेस पाऊस म्हणाला मी परत नाही जाणार 😏 दिवाळीची मजा मी पण अनुभवणार 🤗 मी आल्यावर लोक करतात नुसते उपास अन् तापास 🙃 कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा चकल्यांचा वास🙁 वास घेऊन पदार्थांचा जेव्हा होईल मी तृप्त 😌 मगच ठरवलय मी ह्या थंडीत होईल लुप्त 🌫 चातुर्मासातला फराळ म्हणजे साबुदाणा अन् भगर 😖 त्याला कशी येणार दिवाळीच्या फराळाची सर 🤨 छत्री रेनकोट बघून बघून मी ही कंटाळलोय 😩 दिवाळीचे नविन कपडे बघायला मी थांबलोय 😍 म्हंटल होत आपणही कुर्रम कुरम चकली खाऊ 😉 पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही झाली मऊ 😒 लाडू बसला फुगून करंजी बसली गुरफटून 👿 "अतिथी देवो भव" सारेच कसे गेले विसरून 🤔 मला बघून सारेच जण हिरमुसून बसले 😼 उदास चेहरे बघून त्यांचे मला रडू फुटले 😭 बघायचा होता मला फटाक्यांचा धूर 🎆 पण रडण्याने माझ्या आला नदीला परत पूर 🌊 शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहायचे 💃🏽🕺🏼 चकल्या नाही तर नाही कांदाभज्यांवरच भागवायचे 🎊🏮 पाऊस काही जाईना
पाऊस काही जाईना
read moregauri kulkarni
#ज्याचा त्याचा प्रश्न चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. #गौरीहर्षल ७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न
#ज्याचा त्याचा प्रश्न
read moregauri kulkarni
#ज्याचा त्याचा प्रश्न फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. #गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न
#ज्याचा त्याचा प्रश्न
read moreRohii N
केलेलं प्रेम कुणाला कळलं नाही तर प्रेम करू नये असं सगळे म्हणतील पण प्रेम विसरता येईल... विसरण्या साठी प्रेम केल असत तरं ते प्रेम कसलं... हें ही लोकांना कळत नाही... #त्याचा वरच माझ् खरं प्रेम
#त्याचा वरच माझ् खरं प्रेम
read moresharad gaikwad
काल जेव्हा तो न्याहाळत होता माझातील विद्रोही शरद चाळत होता बोलताना गायकवाड आहे नियम पाळत होता साहेब तुमच्या शब्दाचा अर्थ मला कळत होता दुर्दैवाने माझा खिसा गळका होता चहा पाजण्यासाठी पुळका आला होता घेणार का म्हणून चाचपडत होता माझ्यातील लढवय्या महार विद्रोही डिवचत होता मलाच फुले शाहू आंबेडकर डोस पाजत होता त्याचा पांचट पणा मला समजत होता त्याचा पांचट पणा मला समजत होता ©sharad gaikwad त्याचा पांचट पण मला समजत होता
त्याचा पांचट पण मला समजत होता
read moreCopyright rprakash
तो आणि त्याचा बाप कोरोणामुळे 'तो' नववीची परीक्षा न देताच दहावीला गेलेला...त्यात शाळा बंद पडुन आता 'आॕनलाईन शिक्षण' चालू झालेलं... 'तो' सोडून इतर सगळ्या वर्गमित्रांकडे 'अँड्राईड मोबाईल' होते... काही दिवस मीत्रांच्या मोबाईलवर भागलं... रोज रोज दुसऱ्याच्या मोबाईलवर अभ्यास करणं त्याला कमी पणाचं वाटत होतं... पण त्याला दुसरा इलाजही नव्हता.. 'बाप' खदानीत पाषाण फोडायच्या कामावर.. बंद पडलेलं काम आताशी कुठं चालु झालेलं.. असं हातावरचं पोट त्यांचं... पोराला कुठणं मोबाईल घेणार...? तरी पण मोबाईल साठी 'तो' राती बापाबरोबर भांडला होता... अन् आज दिवस कलला तरी अजुन 'बाप' कामावरून कसा आला नाही या विचारानं माय-लेक परेशान झाले होते... पोराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... तो तसाच मनावर दगड ठेऊन खदानीवर आलेला... समोरचं दृश्य पाहुन पोराचं काळीज हललं... ह्याच्या मोबाईलसाठी, बाप 'जादा दाम' मिळेल या आशेवर हातात 'घण' घेऊन काळोखातही खदाणीतल्या पाषाणाला येड्यागत भिडत होता... लेखक:- आर. प्रकाश (माजलगांव) ©Copyright rprakash लघुकथा-दिर्घव्यथा. * तो आणि त्याचा बाप *
लघुकथा-दिर्घव्यथा. * तो आणि त्याचा बाप *
read moreVasudev Dalvi
नाही तू त्याचा होतीस आणि नाही तू माझा आहेस नाही तू आत्ता ज्याचा आहे त्याचा आहेस
नाही तू त्याचा होतीस आणि नाही तू माझा आहेस नाही तू आत्ता ज्याचा आहे त्याचा आहेस
read moreKishor Rokade
हार म्हणालं तर...खासदार उदयनराजे भोसले..! अन अखंडीत जित म्हणाल तर... "छत्रपती उदयनराजे" ।। जय शिवराय ।। भंडारा उधळला तरीही येळकोट अन नाही उधळला तरीही येळकोटच...! त्याचप्रमाणे सत्ता कोणाचीही..पण महाराष्ट्राचा बाप..हे "छत्रपती" च.
भंडारा उधळला तरीही येळकोट अन नाही उधळला तरीही येळकोटच...! त्याचप्रमाणे सत्ता कोणाचीही..पण महाराष्ट्राचा बाप..हे "छत्रपती" च.
read more