Nojoto: Largest Storytelling Platform

New धनगरी ओवी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धनगरी ओवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धनगरी ओवी.

Stories related to धनगरी ओवी

राजेंद्रभोसले

Globe  creats from Me but I have not created it. #dnyaneshari#ओवी

HANAMANT YADAV (कवीराज)

समतेची ओवी

read more
समतेची ओवी..

पहीली माझी ओवी गं। भिमाईच्या भिमाला।
ज्ञानकुंड पेटविला।तू ये रे बां विठ्ठला।।धृ।।

दुसरी माझी ओवी गं।  सावित्री अन ज्योतीला।
शिक्षणाच्या मेरूला अन स्त्री मुक्ति दात्याला। तू ये रे...।१।।

तिसरी माझी ओवी गं। राजर्षी शाहूला। 
समतेच्या या देवाला। शिक्षण दिले सर्वाला। तू येरे...।।२।।

चौथी माझी ओवी गं। सयाजी राजाला।
 सलाम त्यांचे दातृत्वाला। भिमा परदेशी धाडीला। तू ये रे...।।३।।

पाचवी माझी ओवी गं। अण्णा भाउ साठेला। 
म्हणे कवीराज हा , साहित्य रत्न शोभला। 
लिहूनी फकीराला त्याने पावन केले मराठी ला। तू ये रे...।।४।।

                    कवीराज समतेची ओवी

Rohini kadam

सुखावलं असं डोळं, 
गहिवरली ही वाणी, 
सोनं पिकलं मातीत,
 झाली झाली आबादानी! #शेती #ओवी

vaishali

ओवी # स्त्री जन्म#

read more
🌹 कव्यप्रकार : ओवी 🌹

🌹 स्रीजन्म 🌹

पहिली माझी ओवी ग / लेकीच्या त्यागाला /  
सोडूनिया माहेराला /  उजळवते सासरला // 

दुसरी माझी ओवी ग / पत्नीच्या त्या प्रेमाला / 
विसरुनी आईबापाला / खुश ठेवे पतीदेवाला //

तिसरी माझी ओवी ग /  आईच्या मातृत्वाला / 
नऊ महिने गर्भात / वाढविले बाळाला // 

 चौथी माझी ओवी ग / स्त्रीत्वाच्या त्यागाला / 
कर्तव्य जबाबदारीत / झोकून देते स्वतःला //

पाचवी माझी ओवी ग / जगातील प्रत्येक महिलेला /
विसरुनी स्वप्न स्वतःची / बळ देते सगळ्याला // ओवी # स्त्री जन्म#

HANAMANT YADAV (कवीराज)

माहेरची सय.... (ओवी)

read more
माहेरची सय... (ओवी)

माझ्या माहेराची वाट। सोनचाफ्याचा गं घाट।
तिथ घाटामंधी माट। घेई जाता मी घोट ।।धृ।।

घोट घेते अमृताचा। त्यात गोडवा मायेचा।
गावच्या महादेवाचा। दिस तिथुन माचा ।।१।।

लागूण महादेवाला। वाडा बांन गं बांधीला।
भिंगरुळ्या कौलातला।गडकोट शोभीला ।।२।।

तिथं गोठ्यातली गाय। हंबरी पाहता माय।
येता माहेरची सय। कंठ दाटतो बाय ।।३।।

दाटलेल्या कंठामंधी। हुंदका काळजामंधी।
माहेरच्या मातीमंधी। माझ मन गं बंदी।।४।।

बंदी मनाची चाहूल।चाफ्याला गं आली फूल।
बाप न्हायला येईल। गं अडलं पाउल ।।५।।

कवीराज।
८६९८८४५२५३ माहेरची सय.... (ओवी)

Suyash Ananda Gulig

पुरेशी तुझ्या बाललीलांची ऊब 
जगण्याला शेकोटी निमित्त मात्र,
तुझ्या लीलांमध्ये हरवुन जाण दिवस रात्र
आनंदी राहण्यासाठीच माझ सुत्र.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #थंडी #बाललीला #ओवी

Vilas Bhoir

माझी दुःखाची गं ओवी...

read more
vil@sBhoir

©Vilas Bhoir माझी दुःखाची गं ओवी...

Diksha Gurav

(ओवी) ...बाई काजळाची वात

read more

Upare Shyam

"छंद नाही 🚩नामाचा,
हा देह काय कामाचा" ❓  #cinemagraph2 #मराठीलेखणी #ओवी #म्हणी #मराठी_quote #प्रेम #भागवत_गीता

Omkar Ranveerkar

प्रयत्न हा यत्न
करावे असे की
आळसाचे नाकी
नऊ यावे #मराठी #ओवी #प्रयत्न #yqtaai #original #आळस #6664 #स्पर्धा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile