Nojoto: Largest Storytelling Platform

New फाटक्या पुस्तकाचे मनोगत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फाटक्या पुस्तकाचे मनोगत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फाटक्या पुस्तकाचे मनोगत.

Stories related to फाटक्या पुस्तकाचे मनोगत

Narendra

"माडाचे मनोगत"

read more
कणा पोखरला तरी,
अजूनही आहे ताठ!
जगण्याची जिद्द मोठी,
जरी मरणाशी गाठ!

माझ्या कण्याकण्यामधे,
किती रहातात पक्षी!
जणू बासरी वाटावी,
अशी काढलेली नक्षी!

त्यांच्या टोचायच्या चोचा,
मला पाडताना भोक!
त्यांची पहायचा कला,
माझा आवरून शोक!

वारा येतो तेव्हा वाटे,
त्यांचे कोसळेल घर!
सरावाचा झाला आहे,
त्यांच्या टोचण्याचा स्वर!

जाता गाठाया आकाश,
नाही जमीन सोडली!
पूल करून देहाचा,
माती-आकाश जोडली!

वय जाणवते आता,
माझा नाही भरवसा!
जगण्याच्या कौलातून,
मरणाचा कवडसा!

घरं सोडा सांगताना,
करकरतो मी मऊ!
पाखरानो शोधा आता,
माझा तरूणसा भाऊ!

सावळांचा भारी भार,
आता मला पेलवेना!
तरी निरोपाचा शब्द,
काही केल्या बोलवेना!

पंख फुटलेले नाही,
नाही डोळे उघडले!
अशा पिल्लासाठी माझे,
प्राण देहात अडले!

जन्म माहेरीचा सरे,
आता चाललो सासरी!
भोकं म्हणू नका देहा,
मी त्या कान्ह्याची बासरी!

कवी - श्री. प्रमोद जोशी - देवगड.

©Narendra "माडाचे मनोगत"

कवी - के. गणेश

भाकरीचं मनोगत..

read more
भाकरीचं मनोगत..

मातीत दाणे उपजून
काळ भूकेचा आला,
अन् टीचभर पोटापाई
जन्म माझा झाला..

श्रीमंत असो वा गरीब
भाकरीवाचून पारखा आहे,
जगातल्या प्रत्येक घरात
आकार माझा सारखा आहे..

मातीशी इमान राखून
मी दुष्काळही भागवलाय,
कधी अर्धी-चतकोर होऊन
इथं माणूस जगवलाय..

घामाच्या प्रत्येक थेंबाला
सुखाचा वास येतो..,
इथं प्रत्येक राबणारा 
भाकरीचा घास घेतो...

जेंव्हा रस्त्यावरचा भिकारी
मला पोटभरून खातो,
माझ्या भाकरीच्या जन्माचा
तेंव्हा ऊर भरून येतो...

आजच्या चमचमीत पदार्थांनी
माझा जीव गुदमरतोय..
अन् खऱ्याखुऱ्या भुकेपाई
भाकरीचा तुकडा थरथरतोय..
                copyright गणेश खरात, जालना
                                     ९०२८११०५०९ भाकरीचं मनोगत..

AVINASH JUMADE

आघातविषयीचे मनोगत

read more

वंदना ....

# विचार #मनोगत

read more

dhanashri kaje

"2020" तु आलास आणि आमचं आयुष्यच बदललं तु आमच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घेऊन आलास तर काही वाईट तुझ्या येण्या बरोबर तु घेऊन आलास ते कोरोनाच महा संकट . ज्याचे पडसाद कदाचित आम्ही आयुष्यभर भोगू.
हो पण यावेळी तु एक काम खूप छान केलंस बर का, यावेळी तु आलास आणि येताना भरपूर पाऊस घेऊन आलास या पावसाने सगळी जमीन हिरवीगार बनली आहे. आपले शेतकरी देखील सुखावले आहेत. पण या पावसाळ्यात आजारपण ही आणलस रे . या पावसामुळे आम्ही सर्दी खोकला ताप सारखे आजार ही पाहिले. निराशा आत्महत्या ही पहिल्या फक्त तुझ्यामुळे. असा कसा रे तु आमचं आयुष्य बदललंस आणि का?
 #मनोगत  #paidstory

मानससूत्र

फूल ने भी अजीब सी ख्वाहिश जता दी आज.
हमेशा तोड़ने आते हो ..
कभी पास बैठकर बात भी किया करो.!! #सदिच्छा#मनोगत

Vishal Chavan

मनोगत...

जरा वेळ काढून, बस एकटाच स्वतःसोबत..
दुसर्‍यांचा विचार सोडून दे, ऐकून घे स्वतःच मनोगत...
तू  असा बसल्याने, काहीच थांबणार नाहिये..
तसचं सुरु राहील, जसं सुरू होतं सारं जगत...

तुला काय वाटतंय, जीवनाची काय कमाई झाली..
कुणाचं हृदय प्रसवलं, कोण कुणाची आई झाली...
काही नाही झालं रे, बाळ जन्मले अन बाळ गेले..
असे कित्येक कोष न उमलता, अळीच राहून मेले....

अळी फक्त वळवळते, फुलपाखरा सारखं उडणार नाही..
कोशात राहून पोषण होईल, पण जगाचं दर्शन घडणार नाही...
जगाची फिकीर सोडून, जरा स्वतःच्या जिंदगीची गोळाबेरीज कर..
मरताना हृदयात आनंद राहील, असा हातचा ह्रदयी धर..


Vishaal/Aadinaath 
05-07-2021














.

©Vishal Chavan #मनोगत 
#seashore

Vishal Chavan

Sarika Kadam

पृथ्वीचे मनोगत

read more

काव्यात्मक अंकुर

मनोगत अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 marathi kavita poem Life Mind writing nojotomarathi

read more
मनोगत

मन हे मोरपिसे घेऊन सोबत उडते आहे
ठाव कोणत्याच सुखाचा नाही आहे
 तरी वाऱ्यासोबत उनाड फुलपाखरू होऊन फिरते आहे
का उगाच मनाने आयुष्य कोलमडून पडते आहे

उलटून गेली सारी रात्र तरी का सावरता नाही आले गबाळ हे
लाज का हवी कशाची जर दिसते मोकळे आभाळ हे
धारण करून मौन आता कृत्य होईल नाही होणार बसणे गहाळ रे
थांबेल चंद्राच्या रातीचा खेळ जेव्हा पलटून येईल सकाळ रे

भरले जातील रंग अवचित आयुष्याच्या क्षणात
जेव्हा उतरेल आग ही भिनभिनेल शरीरात
मुक्त होऊन जाईल आत्मा ईच्छापूर्ती होताच अंतरात  
चालत राहिल लेखणी सदा उमटवेल ठसा या विश्वात
अपुरे पडले जर श्वास तर शब्द घालतील भर आयुष्यात

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #मनोगत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #kavita #poem #Life #Mind #writing #nojotomarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile