Find the Latest Status about आपल्याला नाते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्याला नाते.
Shahaji Chandanshive
नाते संसार माझा मांडण्या तुझा आज मोडू नको सप्तपदीचे नाते तुझे माझ्यासाठी तोडू नको ... मी असा वाऱ्यावरी सोबतीस तू येवू नको कालच्या त्या दिसांसाठी आता तू झुरु नको ... जुळणार नां नाते इथे आता जन्मांतरीचे प्रतीक्षेत त्या रात्री आता तू जागू नको ... आठवणीसवे मी आता जाईन दूर तुझ्या नियतीचा शाप मला आज तू टाळू नको ... स्वप्नं एका घरट्याचे होते तुझे नी माझे भंगलेल्या क्षणांना आता उरी तू बांधू नको ... ***** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive नाते
नाते
read moreकवी - के. गणेश
गुंतलेला जीव काहीही मागत नाही.. अट फक्त एकच असते एकमेकांशिवाय जगत नाही नाते....
नाते....
read morekavi Dhananjay (dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. नाते कोणतेही असो त्या नात्याचा ओलावा तेव्हाच टिकतो जेव्हा त्या नात्याची गरज दोन्हीकडून सारखी असते. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे.. ©Dhananjay(dhanuj) Sankpal #नाते
Upendraraj Devadhe
तुझे बोलणे फुंकर मुलायम पिसांची तुझे बोल ते ह्दयावर बरसात पिसांची किती कोमल मंजुळ नाते आपुले मृदू पिसांगत हवेत उंडरते. सप्तरंगी नाते
नाते
read moreProf.Shivaji Waghmare
जगावेगळे नाते तुझे नी माझे स्वप्न तसे प्रत्यक्षात उतरावे.... अजरामर व्हावी प्रेमकहाणी कागदावर काळीज उतरावे... नाते...
नाते...
read moreMohan Somalkar
भा.सा.व सां मंच नागपूर उपक्रम क्रमांक:- ३३३ उपक्रम विषय:- दुरावा शीर्षक:- मोबाईल नात्यांची विण तुटली संवाद मनातला खुंटला! दुरावला समाज सारा गोतावळा सगळा सुटला! विचारपूस एकमेकांची कोणी कोणाची नाही करत! वेळ आता प्रत्येकाचा जातो हाती मोबाईल सदा धरत! जीवनात प्रत्येकाच्या झाला मोबाईल गळ्यातला ताईत! त्याच्याविना जीवन अधुरे राहतो कितीही असो घाईत! त्याच्याशिवाय राहावेना काय द्यावा पुरावा! नवे नाते मोबाईलने जोडतो रक्ताच्या नात्यात येतो दुरावा! नाही आता पत्र लिहतो कुणासोबत नसे भेटीगाठी! नाते रक्ताचे तुटले आता कुणास मारावी मगरमिठी! मैफिल ती चारचौघांची दिसत नाही कुठे! सारा रिकामा वेळ जातो मोबाईलमुळे वादळ उठे! मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #नाते