Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणींच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणींच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणींच्या.

शब्दवेडा किशोर

आठवणी..

फार विचित्र असतात ना ??
आठवणींचं असं वेळीअवेळी येणे..
कधी सुखद अनुभूती देणे
तर कधी 
नकळत आसवे गाळणे..

कधी कधी वाटतं 
आठवणी उगाच येतात छळायला..
तर कधी कधी असंही वाटतं की
आठवणी हव्यात हळुवार पाळायला..

कोणत्याही पाहुणचाराची 
अभिलाषा न बाळगता
किंवा कोणत्याही अपमानाची 
तमा न बाळगता
आठवणी निरंतर येत राहतात
सुख दुःखाचे हिंदोळे 
नित्यनेमे त्या घेत राहतात..

आठवणी नकळत घेऊन जातात
वर्तमानातून भूतकाळात
तसेच भूतकाळातून भविष्यात..
क्षण येतात आणि क्षण जातात
आठवणी मात्र 
निरंतर सावलीसम सोबत असतात..

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन 
#आठवणींच्या_साठवणी

शब्दवेडा किशोर

कोलाज आयुष्याचं....
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा..दिवाळी हा दिव्यांचा सण..अगदी सगळीकडे आनंदाला अगदी उधाण आलेले असते. घरातला कोपरा न कोपरा स्वच्छ होतो.जुनं काहीस जाऊन तिथं नवीन काही विराजमान होतं.आपल्याही मनावर आलेली मरगळ झटकली जाऊन नव्या आशेच्या दिव्यांनी आपल्या मनाची व घराची कवाडं उजळून टाकण्यासाठी आपण उत्सुक झालेले असतो.नवीन कपडे,उटणे,साबण यांच्या एकत्रित सुवासिक दरवळीने घरातले वातावरणही प्रफुल्लित झालेले असते.या आनंदावर सरताज होऊन मिरवली जाते ती आपल्या दारा पुढची सुबक रांगोळी..घराला लावलेला आकाशकंदिल..त्याच्या झरोक्यातुन डोकावणा-या त्या रंगाच्या विविध छटा..रांगोळीत भरलेले रंग त्यावर ठेवलेली मंद प्रकाशात तेवणारी पणती..जणु इंद्रधनुच्या सोहळ्याची प्रचिती आणणारी दिवाळीतील ती प्रत्येक संध्याकाळ..या सगळ्या आठवणीत रमताना मन लगेच बालपणात गेलं.दिवाळीच्या खरेदीत दरवर्षी दहा ते पंधरा रूपये रांगोळीच्या पुस्तकासाठी राखीव असायचेच.ठिपक्यांचा कागद, रांगोळी,रंग ही खरेदीही असायचीच.दुपारचे जेवण,फराळाचे पदार्थ करून झाले की प्रत्येक सखी गेरुने (लाल माती) आपापल्या घरासमोरील अंगणाचा काही भाग सारवुन सुरू करायची कलाविष्काराचा अनोखा सोहळा..या सोहळ्यात ठिपक्यांच्या कागदापासुन ते रांगोळीत भरायच्या रंगाचीही देवाणघेवाण हक्काने होऊन अंगणं रंगानी तर मनं समाधानानी भरून जायची.दोन तीन तास अगदी तल्लीन होऊन काढलेल्या  रांगोळ्यांनी प्रत्येक अंगण सजायचे.रांगोळी व रंगाची लाली प्रत्येक सखीच्या गालावरही दिसायची.आम्हा मुलांच्या लुडबुडीलाही अगदी आनंदाने सामावुन घेतलं जायचं.आमचं प्रशिक्षणही तिथं सुरु व्हायचं.पहिला धडा होता रांगोळी..चिमटीत पकडुन सरळ रेष आखायची..दिसायला सोप्पं वाटणारं काम करायला फारच कठिण होतं कारण एकतर हात थरथरायचा किंवा चिमटीतली रांगोळी आधीच संपायची पण हळुहळु शिकायचो आम्ही संयमाचा पहिला धडा..अन् मग चार ठिपके व ओळींपासुन सुरु झालेला तो अद्भुत प्रवास मुक्तहस्त रांगोळी पर्यंत कधी येऊन ठेपला कळायचं नाही.आपणच रांगोळीच्या आयुष्यासम रेखा आखुन ऐपतीनुसार रंग भरायचे.चुकुन कधी एखादा रंग दुस-या चौकटीत गेलाच तर त्यावर समाधानाची जाडसर पांढरी रेख आखुन वेळ साजरी करायची.चांगली रांगोळी काढणे ही कला तर आहेच पण ती सुरेख रंगसंगतीने सजवणं हे खरंं कसब आहे.ती आपल्याला रोजचे जीवन जगण्यासाठीचे तत्वज्ञान समजावते.रांगोळी अनेकविध रंगानीही सजवता येते किंवा दोनच रंग वापरुनही उत्तम सजते.गरज असते ती फक्त चांगल्या दृष्टीकोनाची..उदाहरणार्थ तुम्ही अतिशय सुंदर चविष्ट स्वयंपाक केला पण तुम्ही जर तो नीट पध्दतीने सादर केला नाही तर त्यातली गंमत निघुन जाते.याउलट तुम्ही दोनच पदार्थ केले असतील अन् जेव्हा तुम्ही ते छान पद्धतीने आनंदाने वाढता तेव्हा त्याची लज्जत काही औरच असते.रांगोळीचे रंग अन् आपल्या आयुष्याचा प्रवास असाच समांतर सुरू राहणारच आहे.रेखा चुकतील..रंगसंगती चुकेल..पण त्या चुकलेल्या गोष्टीतुन नवे अनुभव मिळतील..अगदी त्या सप्तरंगी रांगोळीसारखेच..माझ्या मते आयुष्यही असेच रोज नव्याने जगताना येणारे कटु अनुभव मनातुन सतत झाडुन टाकायचे म्हणजे कधीतरी रांगोळी सुंदर येईल अन् रंगसंगतीही मनाजोगती होईल अन् मग अशा सुरेख क्षणांचं कोलाज करून ते मनात साठवायचं व नंतर आयुष्याचं कोलाज जेव्हा जेव्हा चुकेल किंवा रंगसंगती बिघडे तेव्हा हे कोलाज आठवायचं..मग रांगोळी काय व आयुष्य काय..चुकणं अन् सावरणं दोन्ही सोप्पं होईल....

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्या_पुस्तकातुन

शब्दवेडा किशोर

पाऊलखुणा..

आठवणींच्या पाऊलखुणा
उजळून दिसतात जिथे  
खेळलो..बागडलो..रमलो
स्मरण होते जाताना तिथे..
स्मृतींच्या पाऊलखुणा
जात नाहीत विस्मृतीत 
सुवर्ण असतात त्या
तरळत येतात त्या कृतीत..
सर्वांनाच पडते भुरळ
त्या सोनेरी पाऊलखुणांची  
दिसता येता कमी जाणवते
हृदयातील त्या आठवणींची..
अशा असतात पाऊलखुणा
वळते पुन्हा तेथे नजर  
आठवण काढताच त्यांची
क्षणात होतात पुन्हा हजर..

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्या_साठवणी

writer_rohit.gase_rg

 #आठवणींच्या_साठवणी #आठवणींच्या_साठवणी #love #sad #romantic #writers

शब्दवेडा किशोर

नाटक संपतं..पडदा पडतो..
पण
काही कलावंत अन् त्यांनी केलेल्या भुमिका
ह्या कायम लक्षात राहतात..
आयुष्यात येणाऱ्या काही व्यक्तीसुद्धा अशाच असतात..
जोवर आपल्या आयुष्यात त्यांची भुमिका असते तोवर ते
ती भुमिका अगदी जीव ओतुन
करतात..एकदा का त्यांची भुमिका संपून पडदा पडायची वेळ येते
तेव्हा ते आपली भुमिका चांगली निभवुन आपल्यातुन Exit घेऊन
जातात..मात्र जाताना आपल्यासाठी पाठीमागे ठेवून जातात
त्यांच्या आपल्या आयुष्यातील काही कडू गोड आठवणी..
त्या आठवणी देणाऱ्यातल्या काही जणांना आपण चांगल्या रितीनं
लक्षात ठेवतो तर काही जण आपल्याही स्मृतीमधून
विसरल्या जातात..असेच होते आमचे
आदरणीयश्री.विक्रम चंद्रकांत गोखले.. वयाच्या ७७व्या वर्षापर्यंत म्हणजे अगदी
रूग्णालयात दाखल होईपर्यंत त्यांनी अभिनयाचा त्यांना
भेटलेला वारसा सातत्याने चालवला
अन् नव्या पिढीसाठी एक नवा अध्याय लिहुन गेले..
शरीररूपी जरी ते आपल्यातुन गेले असले तरी त्यांच्या दिलेल्या शिकवणीतुन ते
आज आणि कायमसाठी आपल्या आठवणीत राहतील..
अनाहुतपणे देवानं आपल्यातुन नेलं ते आपलं दुर्दैव..
देव त्यांना चिरःशांती देवो..
विक्रम काका आम्ही
तुमची आठवण आणि शिकवण सतत
आमच्या आयुष्यात कायम ठेवू..
We all miss u vikram kaka

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन

शब्दवेडा किशोर

ही सांजवेळ तुझ्या आठवणींची
कातरवेड्या माझ्या जीवाची काहीली झाली
नजरेसमोर तुझी प्रतिमा आजही मज दिसे अन्
आता नाही उरणार सोबतीस तुझ्या मी
असं बोलून तु अलगद् बेसावध क्षणी निघुन गेली 
तुज काय ठावे जाताना
माझं आयुष्य तु घेऊन गेलीस
आपल्या प्रेमबंधाला पूर्णविराम देऊन गेली 
माझ्या आनंदास नजर लावून गेली
अशीच होती ती जीवघेणी सांजवेळ
जेव्हा तु मला माणसांच्या गर्दीत
एकटेपणाचा शाप देऊनी गेली 
पुढं कसा चालू मी कळतंच नाही मजला
तु असं मला हे शापीत एकटेपण देऊन गेलीस
तु गेली तेव्हाच गेलाय जीव माझा
आता फक्त ही सजीवातली निर्जीव माझी मुर्त राहीली
आज चौदा वर्ष झाली तु आमच्यातुन
अनाहुतपणे निघुन गेली 
येता मज आठवण तुझी मी तुला ही
काव्यरूपी शब्दसुमनांची
श्रद्धांजली वाहीली

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन

शब्दवेडा किशोर

आठवणीतला एकांत अन् एकांतातल्या आठवणी..

शांत संध्याकाळी समुद्रकिनारी 
तुझी वाट बघत मी बसलो होतो
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी 
एकटाच बोलत बसलो होतो
रोजचेच झालंय आता
एकांतामध्ये माझं असं जाणं
अन् तुझ्या आठवणीत एकांतात
कुठंतरी स्वत:ला विसरुन बसणं
झाली आता माझ्या सावलीलाही
सवय तुझ्या आठवणींची
आठवणीतंच तुझ्या पांघरून घेण्याची
आठवणीतंच तुजसवे मनमोकळं विहार करण्याची 
एकटेपण स्वतःचं स्वतःनेच वाटून घेण्याची
सवय झाली आहे आता मज
तुझ्याविना आठवणीत जगण्याची
पाने आयुष्याची थोडी थोडी मग
मी रोज चाळून पाहतो
चाळताना जीवाची होते काहिली तरी
पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपतो
तरीही मज एक खंत रोजच क्षणोक्षण भासते
माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच
कमी सतत मजला जाणवते

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन

Dipak kolaskar

|| एकदा ||

मनातल्या त्या भेटीमध्ये
 भेटून घेतो तुला एकदा
रडुन घेतो मिठीत तुझ्या मी 
भेटशील का मला एकदा.

अरश्यातला मीच हरपलो 
तूच उरली एकटी
तुझीच मागणी कवितेस माझ्या 
सांग लिहु का तुला एकदा.

आजही पाऊस तुला शोधतो 
बरसतो उगा तो तुला शोधण्या
फुलांचाही गंध हरपला आता
सांग तुझ्या नावाने तोडू का एकदा.

मीच माझ्यात उरलो नाही
 तुच ध्यानी मनी असतेस
चंद्रास विचारतो तुझ्या खुशाली
त्या ताऱ्याला तुला मागू का एकदा.

सांगायचे होते मला तुला काहीतरी 
तुला पुन्हा सांगणं मला जमेल का
खुप काही आहे मनात साठलेले
झालीच कधी भेट तर बोलशील का मला एकदा.

                                                         दिपक कोळसक

©Dipak kolaskar #आठवणींच्यापुस्तकातुन

शब्दवेडा किशोर

आठवण येता तुझी डोळे माझे अनाहुतपणे
पाणावले असे की नकळत तुझ्याशी स्नेहबंधमय 
नाते हे जुळले
सोशल मीडियाचा आधार त्याशिवाय आपल्याकडे
दुसरा कोणताही नव्हता पर्याय
बोलावं कसं एकमेकांशी अन् पाहावं कसं एकमेकांना
फक्त फोनच आपल्याला दुवा होता    
तुझ्या आठवणी या असे कधी सुखद तर कधी दुःखद
कधी गोड स्वप्नं तर कधी फक्त एकटेपणा
कधी सुरमैफलीची गीतं तर कधी वादळी दुःखरुपी डोहसागराचा मी पणा
माझ्यासोबत असूनही तू माझी नसे हा भास मजला का बरं होई
तुझ्या आठवणी मज फक्त त्रासच देई अशातंच एक तो सुवर्णमय दिवस उगवला
तुझ्या माझ्या भेटीचा क्षण तो रंगला फोनवरचे आपण प्रत्यक्षात भेटल्यावर खूपच वेगळे ठरलो आधीपण एकमेकांचे होतोच आपण तरीही पहील्या त्या सोनसळी नजरेतच नव्यानं एकमेकांच्या हृदयी वसले गेलो
नियतीला आपलं एकरूप होणं मंजूर नव्हतं ते म्हणतात ना की सारं काही सुरळीत चालू असताना नियतीचं वेगळंच चक्र फिरतं अगदी तसंच घडत होतं
काळ आला होता अन् वेळही ती जुळली होती
प्रेमाच्या या प्रीतपखरांना जणु कुणाची नजर लागली होती
अनाहुतपणे त्या रात्री नियतीचे उलटे फासे पडले
एका क्षणभरातच दोन जीवांना कायमसाठी वेगळे व्हावे लागले
परी होती तु माझ्याच मांडीवर श्वासबंधाची माळ त्यागली
नियतीनं कशी ही काळरात्र आपल्या दोघांसाठी आणली
अन् मग पुन्हा सुरू झाला खेळ तो जुना आठवणींचा
तिच्या हृदयबंधाच्या नात्यात त्याचा अडकायचा अन् शापीत म्हणूनच जगायचा
आजही मी साऱ्या जगास हेच सांगत असतो की..
आठवण येता तुझी
डोळे माझे अनाहुतपणे पाणावले असे की
नकळत तुझ्याशीच कायमसाठी माझे स्नेहबंधमय नाते हे जुळले

©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन

Dipak kolaskar

त्या जुन्या वाटा….

सहज निघून जातो दिवसा मागुन दिवसं
हा वेळ कुणाला धरताच आला नाही
कळलेच नाही कसा लोटला काळ
आयुष्याच्या गाडीला थांबता येत नाही.

छान होती कहाणी त्या राजा अन राणीची
शाळेत त्या राणीची भेट मला झाली
व्हायला ओळख तिच्याशी वेळ थोडा लागला
मग हळू हळू आमची सूत्र जुळू लागली.

वर्गातल्या मंडळीशी ओळखी होऊ लागल्या
त्या गर्दीत आमचा संवाद नजरेने होऊ लागला
अधून मधून भावना आता पत्रात कळू लागल्या
मग रुसवा फुगवा मात्र हक्काने होऊ लागला.

पुस्तकाची अदलाबदल होन स्वाभाविकचं होत
लपून छपुन चॉकलेट वगैरे देन तस सुरूच होत
हातावर नाव काढण्यात तर वेगळाच आनंद यायचा
सहज जुळून आलेलं ते नात प्रेमाच खूप छान होत.

कधी तीही बोलली नाही कधी मीही बोललो नाही
प्रेम होतं एकमेकांवर पण कधी व्यक्त केलं नाही
भासलीच नाही कधी गरज भावना व्यक्त करण्याची
ती म्हणायची,मला तू आठवशील का तुला मी आठवणार नाही?

कळलेच नाही त्या नात्याचा शेवट कसा झाला
सरले ते वर्ष पुन्हा भेटण्याचा योग नाही आला
आजही आठवतो तो चेहरा अन मन भरून येते
त्याच वाटेने आजही तिची चाहूल कानी पडते.

                                                            दिपक कोळसकर

©Dipak kolaskar #आठवणींच्यापुस्तकातुन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile