Nojoto: Largest Storytelling Platform

New सावल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सावल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावल्या.

Stories related to सावल्या

Dr. Raju Ghanshyam Shrirame

सावल्या

read more
चंद्र सावल्या उन्हात हसती। 
असेच अवचीत स्मरते गाणे।
दु:ख वेचूनी गर्द उन्हामधुनी।
आयुष्य वेचते नवेच गाणे।।१।।

घरी निघाल्या सखी गोकुळी।
ती सांज दाटते यमुना तीरी।
कृष्ण सावळा तगमगतो वेडा।
अर्थामधुनी सुचते नवेच गाणे।।२।।

हिरवे हिरवे रान फुलतेे इथले।
पानामधूनी भिरभिरते गाणे।
पाऊल वेडे खचते निरंतर का।
मन हरवी स्वप्नानी नवेच गाणे।।३।।

डॉ. राजू श्रीरामे
भ्रमणध्वनी - 9049940221 सावल्या

vishnu thore

अंधार सावल्या...

read more
 अंधार सावल्या...

Gaurav Pramod Deshpande

खेळ सावल्यांचा #alone

read more
हा खेळ सावल्यांचा रोजचाच आहे,ती लपते मी शोधत आहे  !                                                                                                           संपेल कधी हा खेळ  कोण जाणे ,माझ्या हरण्याची वाट सारेच पाहत आहे !

  एक सांगणे माझे त्या सावलीला , दुःख नाही मजला काही हरण्याचे !
जिंकली जरीस तू आनंद मज आहे ,तुलाच शोधण्याचे सारे बहाणे आहे !
❣️@Gaurav❣️ खेळ सावल्यांचा 

#alone

Dr. Raju Ghanshyam Shrirame

चंद्र सावल्या

read more

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सावल्यांची व्यथा.. #सावल्यांचीव्यथा हा विषय silent reader यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more


दमलेल्या ,भरकटलेल्या वाटेकरूची मायेची सावली |
तू कधीही विसावा घेत असताना दिसत नाही सावली ||

कधी कधी तू माझ्या मागे असते सावली तर कधी पुढे |
न कळे ना मला सावलीचे हे खेळ सारे ||

उन्हाचे चटके  तू सहन नेहमी करते |
विसावा  देण्यासाठी नेहमी तू तत्पर असते ||

ऊन्हाचा या खेळामध्ये तु घाव सोसून जगते |
हारणे आणि जिंकणे ही संकल्पना तू स्पष्ट करते ||

तू कधी आधार होते, तू कधी पाठलाग करते |
सावली तू कधी माझ्यासोबत हिंडते ||

कधीतरी तुझ्या माझ्यामध्ये एक खेळच रंगतो |
माझी सारखे कृती तू कशी करते ||

आश्रय तुझा आम्हाला लढण्यास करतो मदत |
तू आमच्या पाठीमागे असते नेहमी तत्पर ||
-✍️ काव्यशितल✍️





















 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सावल्यांची व्यथा..
#सावल्यांचीव्यथा
हा विषय
silent reader यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सावल्यांची व्यथा.. #सावल्यांचीव्यथा हा विषय silent reader यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
खरंतर सतत आपली सोबत करणारी
आनंदाचे क्षण, दु:खात ही साथ न सोडणारी
पण तरीही दुर्लक्षित, पायाशी घुटमळणारी
हीच "ती"ची कथा अन् हीच सावल्यांची व्यथा

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सावल्यांची व्यथा..
#सावल्यांचीव्यथा
हा विषय
silent reader यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सावल्यांची व्यथा.. #सावल्यांचीव्यथा हा विषय silent reader यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
सावल्यांची व्यथा सवल्याच जाणती
अस्तित्वही तिचे स्वतःचे नसती
अंधाराची तिला असते कायम भीती 
प्रकाश तिच्या असे नेहमीच सोबती
माणसाच्या मागे वणवण फिरती
अंधारात मात्र एकटीच हरवून जाती 
तिच तिला मग अंधारात गवसती.........


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सावल्यांची व्यथा..
#सावल्यांचीव्यथा
हा विषय
silent reader यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

अल्पेश सोलकर

नुसतीच काळजी घेऊ नका ... वार करतील त्या ' सावल्या ' बघा..! बाधित होण गुन्हा नव्हे.. अंगावर कश्या

read more
नुसतीच काळजी
घेऊ नका ...
वार करतील त्या
' सावल्या ' बघा..!

बाधित होण
गुन्हा नव्हे..
अंगावर कश्या
' धावल्या ' बघा..!
           वार करतील त्या ' सावल्या ' बघा..!
 नुसतीच काळजी
घेऊ नका ...
वार करतील त्या
' सावल्या ' बघा..!

बाधित होण
गुन्हा नव्हे..
अंगावर कश्या

vishnu thore

कुणी हेरून सावल्या केले दहन पुरावे मन होते जेव्हा वैरी काय हिशोबी धरावे -विष्णू #5LinePoetry

read more
#5LinePoetry कुणी हेरून सावल्या 
केले दहन पुरावे
मन होते जेव्हा वैरी
काय हिशोबी धरावे
- विष्णू थोरे

©विष्णू थोरे कुणी हेरून सावल्या 
केले दहन पुरावे
मन होते जेव्हा वैरी
काय हिशोबी धरावे
-विष्णू

#5LinePoetry

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सावल्यांची व्यथा.. #सावल्यांचीव्यथा हा विषय silent reader यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
सावल्यांची व्यथा मांडण्या मी सावली बनून पाहिले,
अंधाऱ्या रात्रीत किंवा दिवसाच्या उजेडात नेहमीच सोबत राहिले.
अंधाऱ्या सावलीत कित्येक जण मला घाबरतात नि भयावह म्हणून हिणवतात.
दिवसाच्या उजेडात ही मीच सोबत असते,भर उन्हात ही मीच संगती राहते.
इतकी सोबत असतानाही मला सोडून इतर सावली का शोधत असतात.
झाडा जवळील सावलीस किंवा आडोश्या ला उभे राहून 
दिसत नसलेल्या सावलीस आपली मानतात.
विसरतात अजून एक माझे रूप जे त्यांनी लहानपणी पाहिलेत,
समज येईपर्यंत आईच्या पदराच्या सावलीत राहिलेत.
मोठे होताच आईच्या मायेची सावली ही नकोशी वाटते,
समजून कुणीच घेत नाही मग का म्हणून 
मी माझ्या सावल्यांची व्यथा कुणास सांगते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सावल्यांची व्यथा..
#सावल्यांचीव्यथा
हा विषय
silent reader यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile