Find the Latest Status about विनोद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विनोद.
Vinod Yadav
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून असा एक माणूस देवाज्ञा घेतो. जो आपल्याला अतिप्रिय असतो आपल्या आयुषयभरासाठी केलेले त्याचे उपकार, छोट्या छोट्या क्षणी केलेली त्याची मदत आपल्या समोर उभी राहते. पाउलो पाऊली तो माणूस आपल्या समोर उभा ठाकतो. अश्यावेळी नकळत अश्रूंची धार आपल्या डोळ्यातून वाहू लागते मन कासावीस होतो . देवावर इतका राग येतो की देव समोर असला असता तर आपण देवाचा जीवच घेतला असता. अश्यावेळी दुसऱ्या जगातून तो माणूस आपल्याला बघत असतो. त्याच्यामुळे आपल्याला होत असणारी वेदना त्याला असह्य होते. ह्या जगातून निरोप घेतल्यावरही त्याचा जीव आपल्यामुळे इथे अडकून पडतो. आपल्या आसवांना मोती समजणारा हा माणूस त्याच्या आठवणीमुळे आपण हवालदिल झालो हे बघून परत आपल्या आयुष्यात यायला उतावीळ होतो. कुठल्या न कुठल्या रुपात तो आपल्या आयुष्यात परत येतो परत आपल्याला खूप खूप सुख द्यायला. आपल्या मायेमुळे मोक्षाकळची त्याची वाटचाल थांबते. जन्मोजन्मी ह्या सुख दुःखाच्या विश्वात तो त्याचे ध्येय नसून सुद्धा रमून जातो. आता आपण त्या गेलेल्या माणसाची दुःखी आठवण करून परत त्याला जबरदस्तीने ह्या जगात रमवावे की, त्याच्या मनासारखं जशी त्यांची आपल्यावर अपेक्षा होती तसे वागून, आपल्या सारखं इतरांवर त्यांच्या स्नेह होता अश्यान सोबत ते सजीव असो की निर्जीव, आपल्याला आवडणारे असो की नावडणारे अश्यान सोबत स्नेहाने वागून, अगदी तसेच हुबेहूब, जसा तो गेलेला माणूस वागत होता तसे वागून. त्या दुसऱ्या जगातून बघणाऱ्याला धीर द्यावे, त्यांची ह्या जगातील कार्ये फलित झाली ह्याचा त्याला आश्वासन द्यावा. त्यांच्या मोक्षप्राप्ती साठी सहायक व्हावे, हे आपण ठरवावे. आणि हो गेलेल्या माणसांसाठी असे तर करावेच पण ते जे आपल्यासाठी आजही आयुष्य जगताहेत त्यांच्या साठी ही असे करावे आणि आपले जीवन चरितार्थ करावे. सर्वे भवतु सुखिनः विनोद यादव "आभीर" ©Vinod Yadav #बोधकथा #मराठीविचार #vinodyadav #विनोदयादव
#बोधकथा #मराठीविचार #vinodyadav #विनोदयादव
read more