Find the Latest Status about होळी पेटली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होळी पेटली.
Devanand Jadhav
°चला पेटवूया होळी° राग लोभ मत्सराची, आज करुया खांडोळी जात पात द्या आहुती, चला पेटवूया होळी ऋतू वसंत घेऊन, सण शिमग्याचा आला ज्वाला त्या धगधगती, पहा कशा गगनाला हेवे दावे विसरून, दूर सारू वैर भाव सर्व धर्म एक मानू, सोडू सारे भेदभाव भांग पिऊ प्रेमरूपी, नशा चढवू नेकीची बोबो बोबो बोंब मारू, मिठी मारुया एकीची नांदू गुण्या गोविंदाने, रंग रंगात मिसळू निळा भगवा हिरवा, चला आनंदाने खेळू हाच असे क्षण खरा, चला खेळूया रे होळी गोड धोड भरू मुखी, आज पुरणाची पोळी -------------------------------------- ©•देवानंद जाधव• धामणी, पुणे. dhamanikarsahityik.art.blog jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav होळी रे होळी
होळी रे होळी
read moreAvinash lad
होळी... ------------------- पेटवूया होळी घालुनी गाऱ्हाणं आनंदाचे दिन यावे घरी मारुनिया बोंब गोमू येई दारी कलाकार भारी कोकणात रंग नवा नवा उधळूया सारे आनंदाचे वारे घेऊ सदा पुरणाची पोळी घरात जेवण होळीचा हा सण घरोघरी गावाकडे माझ्या पालखी देवाची देवाच्या गाण्याची मजा भारी बालगोपाळाचा आनंद गगनी खेळती अंगणी रंग रंग ------------------- श्री.अविनाश लाड राजापूर,हसोळ होळी..
होळी..
read moreManish Kanade
तुला रंगवून टाकावे की तुझ्या रंगात रंगावे क्षणच्या आनंदाने की आयुष्यभर जगावे माझ्या पांढऱ्या आकाशी तुझ्या रंगांची उधळण तुझ्या प्रेमाच्या रंगांनी झाले मोरपिसी मन - मनिष ज्ञानदेव कानडे #होळी#रंगपंचमी
V G
माझ्या प्रेमाचा गुलाल तुझा सुंदर चेहऱ्यावर लावशील का ? बोल ना प्रिये हया होळीत माझ्या प्रीतीचा रंगात रंगशिल का? थोडी मस्ती थोड मजाक होईल माझ्यावर तु रागवशील का ? केलं भरपुर प्रेम मी तुझ्यावर न सांगता डोळ्यात पाहून समजशिल का? माझ्या प्रेमाचा गुलाल तुझा सुंदर चेहऱ्यावर लावशील का ? प्रेम देणे प्रेम घेणे सन आहे होळीचा तु माझ्यावर प्रेम करुन आपल्या काळजात जपुन ठेवशील का ? नको दारू भांग चा मला नशा तुझ्या गुलाबी डोळ्यांची नशा करु देशील का ? बोल ना प्रिये हया होळीत माझ्या प्रीतीचा रंगात रंगशील का ? तुझ्या सोबत हया होळीला मला प्रेमाची होळी खेळू देशील का? ( स्वर्णविजय) विजय वि गजबे ©V G #प्रेमाची होळी
#प्रेमाची होळी
read morekrunal.shwas@gmail.com
होळीच्या शुभेच्छा😍 ती अशा काही देऊन गेली रंग तिच्या ओठांचा💋 माझ्या ओठांवर ठेऊन गेली होळी अन् धुलीवंदनाच्या कृणालमय शुभेच्छा -✍️🏻कृणाल कृष्णा सावंत.....(ऋणप्राजक्त) #होळी💋
होळी💋
read moreकवी दिपक सोनवणे
विविध रंगाप्रमाणेच आपलं जीवन रंगलेले असावं ज्याने पाहिलं त्याला फक्त आपलं एक एक रूप दिसावं रंगांची होळी
रंगांची होळी
read morenisha Kharatshinde
अलोर्यातील होळी काय सांगू गम्मत तेव्हा आमच्या लहानग्यांच्या होळीची शेणी,शिवरी,लाकूड अन् जागा आठवड्याआधीच शोधायची वर्गणीसाठी वही घालून मंडळी झाडाखाली बसायची कधी काकांकडून कधी काकूंकडून वर्गणी दोनदा मागायची फुगे,नारळ,चिरमुरे,पताका लिस्ट मोठी असायची कधी सुटते शाळा एकदा घाई होळीभोवती भेटायची वर्गणी गोळा करत करत दिवस उजडायचा होळीचा ढोल..ताशा..वाजवत आम्ही आई तयार नेवैद्य घेऊन पोळीचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बोंबा होळीभोवती मारायचो चुकलं माकलं गार्हाने घालून माफीचा नारळही फोडायचो ✍️निशा खरात/शिंदे(काव्यनिश) ©nisha Kharatshinde अलोरयातील होळी
अलोरयातील होळी
read more