Find the Latest Status about कसे शिकवतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कसे शिकवतात.
प्रकाश साळवी
कसे सांगू !! काय करु मी तुला कसे सांगू माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू ** हे मनाचे ओझे झाले परी हलकें करूं कुणाला कसे सांगू ** दाही दिशांना आभाळ काळे संकटांत मी कुणाला कसें सांगू ** कालचे गंध फार लाचार होते आजचे काय असतील कसें सांगू ** शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या मी एकला भाग्यशाली कसे सांगू ** भिजले होते रान आसवांनी तुझ्या अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू ** पंख लावूनी उडायचे बेत होते छाटले तू पंख माझे कसे सांगू ** दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!
कसे सांगू !!
read moredr . Sandip Pawar
काय झाले ,काय होऊन बसले कोरोणोच्या आजाराने सर्व काही गमावून बसले आम्ही हातावर कमावणारे पोट कसे भरणार काम नाही ,धंदा नाही पोरांना खाऊ कुठून देणार रस्ते झाले उजाड ,गाडी नाही जायला पोलिसांचा थाफा जाऊ देत नाही घरला सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला..... लोकडाऊनच्या या जगात लोके ही दुरावली घराकडची वाट आम्हाला ही परकी झाली वाटेल त्या वाटेने धाव आम्ही घेतली पाय थकले ,स्वास ही रोखला ,रस्ता ही अडला सरकारने मात्र आमचा ट्रक की अडवला सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.... डोळयांतीळ अश्रू डोळयांतच सुखले अखेर रस्त्यावरती मदतीचे हात देवा सारखे आले एक वेलची भूक भागली ,पण मन नाही मानले घराकडे जाण्यासाठी टाहो फोडीत राहिले गरिबांने आता मारावे की जगावे तुम्हीच सांगा परदेशी गेलेल्या लोकांना प्लेननि घरी आणले आम्हाला मात्र साध्या बसने ही नाही आणले सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.... निघू ना ,घरीच थांबा आम्हला ही पटते आजाराच्या भितेने आमचे आभाळ ही फाटते कसे होणार आमच्या मुलांचे या भीतीने मन मेले गावाकडे नुसती पेज पिऊ तरी आम्ही जगणार तुम्हीच सांगा जाणार नाही तर आम्ही काय करणार सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.... कवी- संदीप पवार कसे जाऊ घरला
कसे जाऊ घरला
read moreउद्याचे हवामान
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य ©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल
उद्याचे हवामान कसे असेल
read moreShraddha Yadav
जीवनाला नाही कशाचाही रंग जीवन जगण्यात सर्व असतात दंग कधी होईल जीवनाचा भंग जीवन हे असे कसे। -श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।
जीवन हे असे कसे।
read moreDileep Bhope
घडवायच्या दंगली, पेरायचे पैसै बोलायचे खोटे, मिळवायची मते गावोगाव सारे कसे, खरे चाललेले! वाकडी कधी तिरपी, चाल बेरकी बेरीज फायद्याची, वजा माणुसकी सौद्यावर सौदे, तसे बरे चाललेले! कुणी भाजले जळाले, कोण पळाले कोणास पाळले, कोण गळाले पर्वा नाही, पण बरे चाललेले! रोज चढाई बढाई, एकमेकास बधाई स्वस्तात लढाई, सांगा कुठे महागाई? रात्रंदिन गात अंगाई, बाळ झोपलेले! उचला याला त्याला, बंदी घाला माणसांचा खुला सोपा व्यापार झाला लाचार थोडे, बाकी बरे चाललेले! गावोगाव सारे कसे खरे चाललेले! ३०/३/२३ ©Dileep Bhope #गावोगाव सारे कसे खरे चाललेले!
#गावोगाव सारे कसे खरे चाललेले!
read more