Find the Latest Status about paus padla nahi tar from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, paus padla nahi tar.
Amol Gaikwad
पाऊस पहिल्या प्रेमाचा तु होतीस मी होतो पाऊस पडत होता फार वारा तुझ्या पदारासोबत खेळत होता थंड गार तु नखशिकांत सजलेली, तु चिंब चिंब भिजलेली बिलगून मला प्रिये डोळ्यांमध्ये लाजलेली नजर तुझी लाजेनं पापण्यांआड लपली होती या रात्रीची आस प्रिये मी मनामध्ये जपली होती पाऊस सारा जणू तुझ्या ओठांमध्ये लपला होता मीही तो पाऊस सारा ओठांनीच टिपला होता श्वास तुझा उसवलेला उरात माझ्या भरत होतो ओठांवरची लाली तुझ्या मी ओठांनीच चरत होतो स्पर्श तुझा ओलावलेला कुठेच होत नव्हता स्थिर माझ्या मनाला तरी आता कुठं उरला होता धीर तु मी अन पाऊस सगळं कस अधीर होतं नव्हती तमा कशाचीच दोघे पुरते बधिर होतो अंग अंग शहारले होते तुझे नि माझे प्रेमाने तु मला भिजवत रहा तुझ्या चंदेरी यौवनाने सगळं कस शांत झालं पाऊस पडून गेल्यावर ये पुन्हा मिठीत माझ्या आभाळ भरून आल्यावर अमोल गायकवाड #paus
Rohini kadam
Rain quotes messages in hindi मृग हस्ताच्या रुजणाऱ्या पावसापेक्षा मला व्हायचंय तुझ्या आयुष्यातला वळीव... सुखाचा गारवा देणारा... तुझ्या अबिर मनावरचा थकवा वाहून नेणारा... अन् तुझ्या हास्याला मृद्गंधात धुंद करणारा ❣️ #Valiv Paus
#Valiv Paus
read more