Nojoto: Largest Storytelling Platform

New वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध.

Stories related to वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध

वंदना ....

# विचार #मनोगत

read more

dhanashri kaje

"2020" तु आलास आणि आमचं आयुष्यच बदललं तु आमच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घेऊन आलास तर काही वाईट तुझ्या येण्या बरोबर तु घेऊन आलास ते कोरोनाच महा संकट . ज्याचे पडसाद कदाचित आम्ही आयुष्यभर भोगू.
हो पण यावेळी तु एक काम खूप छान केलंस बर का, यावेळी तु आलास आणि येताना भरपूर पाऊस घेऊन आलास या पावसाने सगळी जमीन हिरवीगार बनली आहे. आपले शेतकरी देखील सुखावले आहेत. पण या पावसाळ्यात आजारपण ही आणलस रे . या पावसामुळे आम्ही सर्दी खोकला ताप सारखे आजार ही पाहिले. निराशा आत्महत्या ही पहिल्या फक्त तुझ्यामुळे. असा कसा रे तु आमचं आयुष्य बदललंस आणि का?
 #मनोगत  #paidstory

मानससूत्र

फूल ने भी अजीब सी ख्वाहिश जता दी आज.
हमेशा तोड़ने आते हो ..
कभी पास बैठकर बात भी किया करो.!! #सदिच्छा#मनोगत

Narendra

"माडाचे मनोगत"

read more
कणा पोखरला तरी,
अजूनही आहे ताठ!
जगण्याची जिद्द मोठी,
जरी मरणाशी गाठ!

माझ्या कण्याकण्यामधे,
किती रहातात पक्षी!
जणू बासरी वाटावी,
अशी काढलेली नक्षी!

त्यांच्या टोचायच्या चोचा,
मला पाडताना भोक!
त्यांची पहायचा कला,
माझा आवरून शोक!

वारा येतो तेव्हा वाटे,
त्यांचे कोसळेल घर!
सरावाचा झाला आहे,
त्यांच्या टोचण्याचा स्वर!

जाता गाठाया आकाश,
नाही जमीन सोडली!
पूल करून देहाचा,
माती-आकाश जोडली!

वय जाणवते आता,
माझा नाही भरवसा!
जगण्याच्या कौलातून,
मरणाचा कवडसा!

घरं सोडा सांगताना,
करकरतो मी मऊ!
पाखरानो शोधा आता,
माझा तरूणसा भाऊ!

सावळांचा भारी भार,
आता मला पेलवेना!
तरी निरोपाचा शब्द,
काही केल्या बोलवेना!

पंख फुटलेले नाही,
नाही डोळे उघडले!
अशा पिल्लासाठी माझे,
प्राण देहात अडले!

जन्म माहेरीचा सरे,
आता चाललो सासरी!
भोकं म्हणू नका देहा,
मी त्या कान्ह्याची बासरी!

कवी - श्री. प्रमोद जोशी - देवगड.

©Narendra "माडाचे मनोगत"

कवी - के. गणेश

भाकरीचं मनोगत..

read more
भाकरीचं मनोगत..

मातीत दाणे उपजून
काळ भूकेचा आला,
अन् टीचभर पोटापाई
जन्म माझा झाला..

श्रीमंत असो वा गरीब
भाकरीवाचून पारखा आहे,
जगातल्या प्रत्येक घरात
आकार माझा सारखा आहे..

मातीशी इमान राखून
मी दुष्काळही भागवलाय,
कधी अर्धी-चतकोर होऊन
इथं माणूस जगवलाय..

घामाच्या प्रत्येक थेंबाला
सुखाचा वास येतो..,
इथं प्रत्येक राबणारा 
भाकरीचा घास घेतो...

जेंव्हा रस्त्यावरचा भिकारी
मला पोटभरून खातो,
माझ्या भाकरीच्या जन्माचा
तेंव्हा ऊर भरून येतो...

आजच्या चमचमीत पदार्थांनी
माझा जीव गुदमरतोय..
अन् खऱ्याखुऱ्या भुकेपाई
भाकरीचा तुकडा थरथरतोय..
                copyright गणेश खरात, जालना
                                     ९०२८११०५०९ भाकरीचं मनोगत..

AVINASH JUMADE

आघातविषयीचे मनोगत

read more

Vishal Chavan

मनोगत...

जरा वेळ काढून, बस एकटाच स्वतःसोबत..
दुसर्‍यांचा विचार सोडून दे, ऐकून घे स्वतःच मनोगत...
तू  असा बसल्याने, काहीच थांबणार नाहिये..
तसचं सुरु राहील, जसं सुरू होतं सारं जगत...

तुला काय वाटतंय, जीवनाची काय कमाई झाली..
कुणाचं हृदय प्रसवलं, कोण कुणाची आई झाली...
काही नाही झालं रे, बाळ जन्मले अन बाळ गेले..
असे कित्येक कोष न उमलता, अळीच राहून मेले....

अळी फक्त वळवळते, फुलपाखरा सारखं उडणार नाही..
कोशात राहून पोषण होईल, पण जगाचं दर्शन घडणार नाही...
जगाची फिकीर सोडून, जरा स्वतःच्या जिंदगीची गोळाबेरीज कर..
मरताना हृदयात आनंद राहील, असा हातचा ह्रदयी धर..


Vishaal/Aadinaath 
05-07-2021














.

©Vishal Chavan #मनोगत 
#seashore

Vishal Chavan

Sarika Kadam

पृथ्वीचे मनोगत

read more

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile