Find the Latest Status about धावून ये विठ्ठला सत्वरी अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धावून ये विठ्ठला सत्वरी अभंग.
pooja d
बा, पांडुरंगा का असा? डोळे मिटुनी तू बसला उघड ते नेत्र, नि बघ भक्त तुजविण किती रडला?? #विठ्ठला
प्रा.शिवाजी ना.वाघमारे
हे विठ्ठला धाव रे विठ्ठला भक्ताला पाव रे विठ्ठला.. संकट सर्व तुझ्या नावानी तरतील हे भाव माझ्या मनी ते खरे कर रे विठ्ठला भक्ताला या भाव रे विठ्ठला.. ©शिवाजी हे विठ्ठला...
हे विठ्ठला...
read morenitsmit penshanwar
अरे विठ्ठला जरा बघ दिसतो असा काळा मेघ गर्जतोय जसा वर्ण तुझा बघता भक्त होई वेडा पिसा असा कसा तु पांडुरंगा विठेवर युगे अठ्ठावीस उभा पाय नाही का दुखले तुझे करी हात ठेवतोय जसा रुक्मिणीच्या डोई दिला तुळशी वृंदावनाचा वसा का रे विठ्ठला तीच्या पासुन रूसलास तु असा तुकाराम आवडला आणि इंद्रायणी ला पुर आला असा गोर्या कुंभाराला वेड लावले बाळ तुडवले मातीत समजुन चिखल जसा नामदेवाची चाकरी केली संत सखुला भाकरी दिली असा पंढरपूर चा राजा शोभतोय तु बघ कसा अरे विठ्ठला आता तरी बघ आमच्या ही कडे असा रुक्मिणी वाचुन तुझा संसार चालायचा नाही सहज असा एकटी उभी आहे तुझ्या शेजारी तीच्या कडे वळुन बघ तरी थोडसा अरे विठ्ठला ...... नितस्मित (पेंशनवार) ©nitukolhe smitnit विठ्ठला #DilKiAwaaz
विठ्ठला #DilKiAwaaz
read morenisha Kharatshinde
विठ्ठला आज अडलोय विठ्ठला तुझी वारी ही चुकली घालव ही संकटे येईन मी पाऊली.. घेऊनी तुळस डोई येईन नाचत नाचत टाळ-मृदुंगाचा गजर येईन गाजत गाजत फेक वीट तू स्वत:च अन् रहा उभा त्यावरी जे जे दर्शनासी अतुर कर पूरी त्याची वारी ✍️(निशा खरात/शिंदे) (काव्यनिश) ©nisha Kharatshinde विठ्ठला
विठ्ठला
read morevaishali
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼 मनमंदिरात | तूच आहे देवा || सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| कर जोडुनिया | तुला विनविते || साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे || आहे हे सांगणे | तुजपाशी ||३|| कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || दरवळे गधं | चोहीकडे ||४|| तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ || साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५|| 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #
# अभंग #
read moreMohan Somalkar
लावियल्या ज्योती (अभंग) लावियल्या ज्योती ॥ डोळ्यात भक्तीच्या॥ हरी भजनाच्या ॥ पांडुरंगा॥१॥ आळवितो तुला ॥ भक्तीत रंगतो॥ अभंगातुनि गातो॥ नाम तुझे॥२॥ दया, क्षमा,शांती ॥ तुझ्या ठायी भेटे॥ चित्त शांत वाटे ॥ तुझ्या ठायी॥३॥ नको राग -द्वेष ॥ नको मनी क्रोध ॥ भजनातुनी बोध ॥ घेऊ दे रे॥४॥ मन माझे लागे ॥ धावे तुझ्याकडे॥ गावया आवडे॥ गीत तुझे॥५॥ हरी मुखे म्हणा॥ झेंडा हाती धरा॥ पहाट प्रहरा ॥ नाम घ्यावे॥६॥ एक तरी ओवी॥ रोज म्हणा घरी॥ हरीपाठ दारी॥ नित्यदिनी॥७॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #अभंग
Mohan Somalkar
ऑडिओ- उपक्रम अभंग -४ ( एकादशी) ज्ञानीयाची वाणी॥ आणा आचरणी ॥ आनंद गगनी ॥ धावघेई॥१॥ मनन चिंतन ॥ अध्याय प्रत्येक ॥ पान ऐकऐक॥ करा नित्य॥२॥ मराठीची जाण ॥ भाषेचा सन्मान ॥ बाळगुया मान ॥ सदा मनी॥३॥ आज एकादशी ॥ उद्याची द्वादशी ॥ पुजुया तुळशी ॥ आज उद्या॥४॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar # अभंग
# अभंग
read more