Find the Latest Status about mi majha marathi kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, mi majha marathi kavita.
sahil tayde
|| गर्व मी मराठीचा || गर्व मी मराठीचा, गर्व मराठी मातीचा, गर्व मी महाराष्ट्राचा, गर्व मराठी बोलीचा. ही भाषाच नव्हे,तर माय मावली आहे आमची, ही बोलीच नव्हे, तर सावली आहे आमची. महाराष्ट्राची भूमी ही, मराठीच अस्तित्व आहे इथल्या मातीच्या कणाकणात, भाषा ही इतकी श्रेष्ठ की हिने जागा निर्माण केली प्रत्येकाच्या मनामनात. ऐकायला ही मधुर वाटते,कोणालाही लागेल याची गोडी, 6500 भाषा ह्या देशात पण त्यात, मराठी ही सर्वात श्रेष्ठ बोली. चढ उतार कितीही आले तरी ही भाषा राहिली उंच स्तरावर, मराठीची बोली आज आहे प्रत्येकाच्या मुखावर. संस्कृतीही श्रेष्ठ हीची, संस्कार ही हीने शिकवले, कुणासमोर ही झुकली नाही सह्याद्री सारखे मजबूत बनवले. चला सारे या बांधवांनो करू या मराठीचा प्रसार, एकमुखाने सारे मिळून चला करूया मराठीचा जयजयकार . || जय महाराष्ट्र || जय मराठी || - साहिल दिनकर तायडे ©sahil tayde mi Marathi #selflove
mi Marathi #selflove
read moreshailesh bade
नभ दाटून आले मोसमी वारे वाहिले वसंताचे पान सरले मेघ ऋतु चे आगमन झाले रिमझिम सरीत भिजले अंगणी मोर नाचु लागले चातकाचे प्राण सुखावले मेघ ऋतु चे आगमन झाले थेंबा थेंबातुन भिजले गंध मातीचे दरवळून गेले इंद्रधनू नभात दाटले मेघ ऋतु चे आगमन झाले बीज अंकुर पेरले ओल्या मातीच्या कुशीत रुजले हिरव्या शालूत सजले मेघ ऋतु चे आगमन झाले ©shailesh bade Marathi Kavita
Marathi Kavita
read moreprem patil
।।।। रंग नव्या प्रेमाचा।।।। रंग नव्या प्रेमाचा तिच्या हातावर रचत आहे.... विसरून जुने पुरण्या गोष्टी सुरुवात नवी होत आहे..... हसणं त्या गालावरच आता हळुवार मिटत आहे.... प्रत्येक गोष्ट तिची आता आठवण होत आहे.... फुलणं त्या पाकळीचं आता कोमजलं आहे.... स्पर्श तिचा आता नुसताच भास होत आहे..... तिने पाहिलेल्या स्वप्नांचं रान आता पेटत आहे..... अंधारलेल्या हृदयात तिच्या आता मन तीच निजत आहे.... आयुष्य तीच आता फक्त सुख दुःख मोजत आहे.... बोलणं तिच्या नजरेचं आता अबोल होत आहे... रुजणं त्या अंकुराच गर्भात तिच्या आता जगणं तिच होत आहे.... सोडलेल्या गर्दीत नातं ते माझं आता गुदमरत आहे.... #marathi #kavita
shailesh bade
मैत्री जोडले आहेस नाते मैत्रीचे जरा जपून ठेव चार चौघात टोमणे ऐकण्याची सवय ठेव नसले नाते जरी रक्ताचे तरी हृदयात ठेव चार सल्ले ऐकण्याची तयारी ठेव भेटतील सुखात अनेक थोडे अंतर ठेव उभे राहतील मित्र दुःखात थोडा विश्वास ठेवा वाटेल एकटे जेव्हा सोबत आठवणीची ठेव मिळेल उमेद जगण्याची मनात साठवून ठेव लावले आहेस झाड मैत्रीचे जिवंत ठेव लाभेल सावली सदैव थोडा विश्वास ठेवा येतील वादळे अनेक मातीत जखडून ठेव राहील अभेद्य मैत्री जरा जपून ठेव ©shailesh bade Marathi Kavita
Marathi Kavita
read moreप्रशिक लखमापूरकर
युगांत अस्थितवाच्या किनाऱ्यावर उगवतो असा सूर्य ...! गांभीर्याचें प्रतीक नसलेला आणि आणि मानवांची हेटाळणी करणारा...! विसरून जातो तो जात , धर्म , पंथ ,भाषा , प्रांत ...! आणि मिटवायला निघतो संस्कृती , परंपरा आणि मानवी अस्थित्व ...! संघर्षाची मशाल चेतविली तर सरसावतात...!! आणि निपचित पडल्या तर होतो युगांत... -- प्रशिक सोनवणे Marathi kavita
Marathi kavita
read more