Find the Best आयुष्याच्या_वाटेवर Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutआयुष्याच्या या वळणावर, आयुष्याच्या या पायरीवर, उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा,
शब्दवेडा किशोर
White #अमर प्रेम शब्दवेडा किशोर त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते..त्याचं जरा जास्तच..तिच्यासाठी काय करु- काय नको असं त्याला झालेलं..पण त्याचा खिसा कायम फाटलेला..बिचारा..पण भलताच रोमॅटीक..तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.तिला काहीतरी गिफ्ट द्यावं असं त्याला वाटायचं पण द्यायचं काय ? कारण फाटका खिसा..शेवटी न राहवून त्याने तिला रंगीत कागदी फुलं वाढदिवसाला गिफ्ट केली..ती खुश होती..पण जास्त नाही. तशीही तिची त्याच्याकडुन फार मोठी अपेक्षा नव्हती.तो जे देत होता त्यात ती समाधानी नसतानाही समाधान मानत होती.तो सामान्य घरातलाच..जेमतेम नोकरी..भविष्यात काही करुन दाखवेल असं काहीही त्याच्यात तिला दिसत नव्हतं पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते..तिच्यापेक्षा तो जरा जास्त.. मात्र एक दिवस सगळा नुरच पलटला..तो तिला म्हणाला,"तुझ्याबरोबर आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडत कुढत जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..?सारं काय आहे तुझ्याकडे..पण तरी माझ्याबाबत सतत दुजाभाव वाटतो मला तुझ्या वागण्यातून ? त्यापेक्षा मी परदेशी जातो..पुन्हा कधी परतणार नाही..मला असं वाटतं तु मला विसरुन पुढे जावं..आजपासुन आपले मार्ग निराळे..माझा-तुझा संबंध इथंच संपला."तो कायम निघुन गेला व ही जराशीच मोडून पडली..जणु सर्व काही संपले तिच्यासाठी..दिवस सरले व तिच्या मनातली दु:खाची लाट ओसरून संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..तिने ठरवलं..त्याने पैशासाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पैसे कमवुन दाखवायचे..इतके की आपल्या पुढे सारं जग त्याला थिटं दिसलं पाहीजे.पुढे या जिद्दीने पेटली ती व झोकुन दिलं स्वतःला..कष्ट केले..मित्रांनी मदत केली.अनेक चांगले वांगले लोक भेटले व तीचे दिवस पलटून ती खुप श्रीमत झाली..स्वतःची कंपनी, पैसा,नोकरचाकर,गाड्या,मान सर्व कमवलं.विरहाच्या आगीतुन व प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन ती बाहेर पडून जगण्यासाठी धडपडली व यशस्वीही झाली..पण तरी तिच्या मनात चुटपुट कायमच होती..तो सोडुन गेल्याची..त्यानं नकारल्याची व आपल्या अविचारी वागण्याची तसेच साधेपणा व गरीबीचा अपमान केल्याची..त्याच्यावरच्या प्रेमाची जागा कधीच तिरस्काराने घेतली होती.एक दिवस ती तिच्या आलिशान गाडीतुन जात असताना बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.गाडीच्या काचेतुन बाहेर पाहते तर म्हातारं जोडपं एकाच छत्रीत भिजत उभं होतं.भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.तीने गाडी थांबवली आणि नीट पाहीलं तर ते त्याचेच आई-वडील निघाले.तीने गाडी थांबवून त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं तीला वाटत होतं पण लगेच मनातली सुडाची आग जागी झाली.त्यांनी आपली श्रींमती पाहावी..त्यांनी आपली गाडी पाहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकानं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं तीला मनोमन वाटतं होतं.त्याला धडा शिकवण्याच्या,अपमानाच्या घावांची परतफेड करण्याच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे तीला जाणवलं.ते दोघे मात्र स्मशानभुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहिले तसं ही सुद्धा गाडीतुन उतरुन त्यांच्यामागे गेली व तिथं जे काही पाहिलं त्यामुळं पूर्ण कोसळली..त्याचाच फोटो..तसाच हसरा चेहरा..कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली व तिने नकारलेली कागदांची फुलंसुद्धा तशीच..ही सुन्न झाली व धावतच कबरीकडे गेली.त्याच्या आईबाबांना विचारलं "काय झालं ते सांगा.." ते म्हणाले,"तो परदेशी कधीच गेला नाही.त्याला डॉक्टर लोकांच्या चुकीच्या उपचारामुळे कर्करोग झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते त्याच्या हातात..आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देऊन तो गेला..तू संतापुन उभी राहशील..यावर त्याचा विश्वास होता..म्हणुन त्यानं तुला सोडुन जाण्याचा नाटक केलं आणि तो दुसऱ्यासोबत पैसा व इतर गोष्टी भेटल्या म्हणून निघून गेल्याचं चित्र तुझ्यासमोर त्यानेच तर उभं केलं..आज त्याचं वर्षश्राद्ध.. म्हणून आम्ही इथं आलो". ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White मी मेल्यावरंच लोकं जाणतील मला माझं अस्तित्व मिटल्यावरच लोकं मानतील मला जे आज माझ्या रस्त्यात काटेरी रक्तचंदन पसरवतात शेवटी तेच चंदनफुलं वाहतील मला शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White #मी.. एक शापित जोकर शब्दवेडा किशोर भावबंधनाच्या या पाशातून मिळवणार लवकर मुक्ती मी सुखस्वप्नांची चव चाखण्या घेईन नवा जन्म मी इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी मी नित्यनियमाने हसत हसत वाहिली नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा असाच मनमोजी असणार मी एक शापित जोकर ही माझी ओळख तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White उत्तरं देणं अवघड नसतं.. पण वाद होऊन नातं तुटू नये म्हणून कधीकधी गप्प बसावं लागतं अन् चूक नसतानाही खूप वेळा खूप काही ऐकून घ्यावं लागतं ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White चलो.. आज सबसे माफ़ी मांग ही लेता हूँ.... क्या पता.. कल मैं रहूँ या ना रहूँ..?? शब्दभेदी किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White #सावरले घरटे एक एक शब्दवेडा किशोर सावरले घरटे एक एक अश्रू टिपत जखम वेदनेची हळुवार अश्रू पुसत मनाची भिंत ढासळत ||१|| जेव्हा आपलेच सोडून गेले नाती रक्ताचीच घरट्यातून अलगद उडून गेले पंख लावुन आकाशी ||२|| बंध नात्याचे तोडून ठेवले होते का मीच नाती जपून ढासळलेल्या घराची एक एक वीट रचून ||३|| सावरले जेव्हा सारे तेव्हाच मज मृत्यूने कवटाळले... सोडून जग सारे इथेच राहिले ||४|| उलगडले नाही सत्य मज नात्याचे मोहातलेच होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य अन् क्षणात संपणारे सारे ||५|| ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White #आता ना वैर कुणाशी.... शब्दवेडा किशोर आता ना वैर कुणाशी ठेवणार ना कुणाचा राग मनी जपणार संकेत मिळाले आहे आज मज माझ्या निजधामीच्या गमनाचे आता कधीही न संपणाऱ्या प्रवासाला मी निघणार ll१ll प्रवास हा असेल कधी न संपणारा ज्याच्या सुरवात केल्यानंतर माझ्या माघारी जी उरतील त्यांच्यावर असेल कदाचित दुःखाचा मारा काय माहित मज नवा अंश होता येईल का काय माहित मज पुन्हा नवं अस्तित्व मिळवता येईल का पण तरीही आता आनंदाने त्या अस्तित्वहीन असलेल्या आयुष्याची सुरवात मी आता करणार आता कधीही न संपणाऱ्या प्रवासाला मी निघणार ll२l ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White आता ना कुणाशी वैर ठेवणार ना कुणाचा राग मनी जपणार संकेत मिळाले आहे आज मज माझ्या निजधामीच्या गमनाचे आता कधीही न संपणाऱ्या प्रवासाला मी निघणार ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White तो वरचा देव असे पायलट.. शब्दवेडा किशोर माहित नाही रंग रुप काही माहिती नाही स्वभाव खास त्याचा तरीही आपण ठेवतोच ना विश्वास आपल्या आयुष्य नामक विमानाच्या पायलटवर कायमचा........ ll१ll तिकीट काढून बसतो या आयुष्य नावाच्या विमानात पण आयुष्याच्या प्रवासाबद्दल नसते काही माहिती तरीही असते ना खात्री त्याबद्दल नसते कुठली चिंता किंवा भिती........ ll२ll नाही वाटत कधीच कुठलीच काळजी किंवा नाही घेत कुणीही कधीच कुठलीही शंका निर्धास्तपणे बसतो विमानात मात्र असतो त्याबद्दल विश्वास पक्का........ ll३ll असाच ठेवुया दृढ विश्वास आपण सदा अशीच ठेवु त्या परमेश्वरावरही श्रद्धा सहजपणे जगु आपण जीवन मग नाही होणार आपल्याला कधीच कुठलीही बाधा........ ll४ll करत रहातो आपण सतत चिंता काळजी भूत भविष्याची जीवनात आपण का नाही ठेवत देवावर श्रद्धा भाव तोच भवसागरातून नेईल तारुन........ ll५ll जगाचा सोडावा विचार प्रत्येकाने स्वतः वर प्रेम करावे फक्त आपण मात्र देवावर हवी श्रद्धा भक्ती पूर्ण मग तरंगत राहु आनंदात सर्वजण........ ll६ll जसा ठेवतो आपण त्या विमानाच्या पायलटवर विश्वास तसाच विश्वास असला पाहिजे आपला त्या परमेश्वरावर मग नाही करायची कधी काळजी कसलीच तो नेईल बरोबर आपल्या आयुष्याला सन्मार्गावर........ ll७ll ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
hemlata mandle
BeHappy शुक्र करो गुनाह की बदबू नहीं आती! वर्ना ये दुनिया रहने के काबिल ना होती,!! ©hemlata mandle #beHappy#life #Life_experience #आयुष्याच्या_वाटेवर #आयुष्य_जगताना
#beHappylife #Life_experience #आयुष्याच्या_वाटेवर #आयुष्य_जगताना
read more