Find the Best आठवणींच्यापुस्तकातुन Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
आठवण येता तुझी डोळे माझे अनाहुतपणे पाणावले असे की नकळत तुझ्याशी स्नेहबंधमय नाते हे जुळले सोशल मीडियाचा आधार त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही नव्हता पर्याय बोलावं कसं एकमेकांशी अन् पाहावं कसं एकमेकांना फक्त फोनच आपल्याला दुवा होता तुझ्या आठवणी या असे कधी सुखद तर कधी दुःखद कधी गोड स्वप्नं तर कधी फक्त एकटेपणा कधी सुरमैफलीची गीतं तर कधी वादळी दुःखरुपी डोहसागराचा मी पणा माझ्यासोबत असूनही तू माझी नसे हा भास मजला का बरं होई तुझ्या आठवणी मज फक्त त्रासच देई अशातंच एक तो सुवर्णमय दिवस उगवला तुझ्या माझ्या भेटीचा क्षण तो रंगला फोनवरचे आपण प्रत्यक्षात भेटल्यावर खूपच वेगळे ठरलो आधीपण एकमेकांचे होतोच आपण तरीही पहील्या त्या सोनसळी नजरेतच नव्यानं एकमेकांच्या हृदयी वसले गेलो नियतीला आपलं एकरूप होणं मंजूर नव्हतं ते म्हणतात ना की सारं काही सुरळीत चालू असताना नियतीचं वेगळंच चक्र फिरतं अगदी तसंच घडत होतं काळ आला होता अन् वेळही ती जुळली होती प्रेमाच्या या प्रीतपखरांना जणु कुणाची नजर लागली होती अनाहुतपणे त्या रात्री नियतीचे उलटे फासे पडले एका क्षणभरातच दोन जीवांना कायमसाठी वेगळे व्हावे लागले परी होती तु माझ्याच मांडीवर श्वासबंधाची माळ त्यागली नियतीनं कशी ही काळरात्र आपल्या दोघांसाठी आणली अन् मग पुन्हा सुरू झाला खेळ तो जुना आठवणींचा तिच्या हृदयबंधाच्या नात्यात त्याचा अडकायचा अन् शापीत म्हणूनच जगायचा आजही मी साऱ्या जगास हेच सांगत असतो की.. आठवण येता तुझी डोळे माझे अनाहुतपणे पाणावले असे की नकळत तुझ्याशीच कायमसाठी माझे स्नेहबंधमय नाते हे जुळले ©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन
शब्दवेडा किशोर
नाटक संपतं..पडदा पडतो.. पण काही कलावंत अन् त्यांनी केलेल्या भुमिका ह्या कायम लक्षात राहतात.. आयुष्यात येणाऱ्या काही व्यक्तीसुद्धा अशाच असतात.. जोवर आपल्या आयुष्यात त्यांची भुमिका असते तोवर ते ती भुमिका अगदी जीव ओतुन करतात..एकदा का त्यांची भुमिका संपून पडदा पडायची वेळ येते तेव्हा ते आपली भुमिका चांगली निभवुन आपल्यातुन Exit घेऊन जातात..मात्र जाताना आपल्यासाठी पाठीमागे ठेवून जातात त्यांच्या आपल्या आयुष्यातील काही कडू गोड आठवणी.. त्या आठवणी देणाऱ्यातल्या काही जणांना आपण चांगल्या रितीनं लक्षात ठेवतो तर काही जण आपल्याही स्मृतीमधून विसरल्या जातात..असेच होते आमचे आदरणीयश्री.विक्रम चंद्रकांत गोखले.. वयाच्या ७७व्या वर्षापर्यंत म्हणजे अगदी रूग्णालयात दाखल होईपर्यंत त्यांनी अभिनयाचा त्यांना भेटलेला वारसा सातत्याने चालवला अन् नव्या पिढीसाठी एक नवा अध्याय लिहुन गेले.. शरीररूपी जरी ते आपल्यातुन गेले असले तरी त्यांच्या दिलेल्या शिकवणीतुन ते आज आणि कायमसाठी आपल्या आठवणीत राहतील.. अनाहुतपणे देवानं आपल्यातुन नेलं ते आपलं दुर्दैव.. देव त्यांना चिरःशांती देवो.. विक्रम काका आम्ही तुमची आठवण आणि शिकवण सतत आमच्या आयुष्यात कायम ठेवू.. We all miss u vikram kaka ©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन
शब्दवेडा किशोर
ही सांजवेळ तुझ्या आठवणींची कातरवेड्या माझ्या जीवाची काहीली झाली नजरेसमोर तुझी प्रतिमा आजही मज दिसे अन् आता नाही उरणार सोबतीस तुझ्या मी असं बोलून तु अलगद् बेसावध क्षणी निघुन गेली तुज काय ठावे जाताना माझं आयुष्य तु घेऊन गेलीस आपल्या प्रेमबंधाला पूर्णविराम देऊन गेली माझ्या आनंदास नजर लावून गेली अशीच होती ती जीवघेणी सांजवेळ जेव्हा तु मला माणसांच्या गर्दीत एकटेपणाचा शाप देऊनी गेली पुढं कसा चालू मी कळतंच नाही मजला तु असं मला हे शापीत एकटेपण देऊन गेलीस तु गेली तेव्हाच गेलाय जीव माझा आता फक्त ही सजीवातली निर्जीव माझी मुर्त राहीली आज चौदा वर्ष झाली तु आमच्यातुन अनाहुतपणे निघुन गेली येता मज आठवण तुझी मी तुला ही काव्यरूपी शब्दसुमनांची श्रद्धांजली वाहीली ©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन
शब्दवेडा किशोर
आठवणी.. फार विचित्र असतात ना ?? आठवणींचं असं वेळीअवेळी येणे.. कधी सुखद अनुभूती देणे तर कधी नकळत आसवे गाळणे.. कधी कधी वाटतं आठवणी उगाच येतात छळायला.. तर कधी कधी असंही वाटतं की आठवणी हव्यात हळुवार पाळायला.. कोणत्याही पाहुणचाराची अभिलाषा न बाळगता किंवा कोणत्याही अपमानाची तमा न बाळगता आठवणी निरंतर येत राहतात सुख दुःखाचे हिंदोळे नित्यनेमे त्या घेत राहतात.. आठवणी नकळत घेऊन जातात वर्तमानातून भूतकाळात तसेच भूतकाळातून भविष्यात.. क्षण येतात आणि क्षण जातात आठवणी मात्र निरंतर सावलीसम सोबत असतात.. ©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन #आठवणींच्या_साठवणी
#आठवणींच्यापुस्तकातुन #आठवणींच्या_साठवणी
read moreशब्दवेडा किशोर
आठवणीतला एकांत अन् एकांतातल्या आठवणी.. शांत संध्याकाळी समुद्रकिनारी तुझी वाट बघत मी बसलो होतो दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी एकटाच बोलत बसलो होतो रोजचेच झालंय आता एकांतामध्ये माझं असं जाणं अन् तुझ्या आठवणीत एकांतात कुठंतरी स्वत:ला विसरुन बसणं झाली आता माझ्या सावलीलाही सवय तुझ्या आठवणींची आठवणीतंच तुझ्या पांघरून घेण्याची आठवणीतंच तुजसवे मनमोकळं विहार करण्याची एकटेपण स्वतःचं स्वतःनेच वाटून घेण्याची सवय झाली आहे आता मज तुझ्याविना आठवणीत जगण्याची पाने आयुष्याची थोडी थोडी मग मी रोज चाळून पाहतो चाळताना जीवाची होते काहिली तरी पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपतो तरीही मज एक खंत रोजच क्षणोक्षण भासते माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी सतत मजला जाणवते ©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन
Dipak kolaskar
|| एकदा || मनातल्या त्या भेटीमध्ये भेटून घेतो तुला एकदा रडुन घेतो मिठीत तुझ्या मी भेटशील का मला एकदा. अरश्यातला मीच हरपलो तूच उरली एकटी तुझीच मागणी कवितेस माझ्या सांग लिहु का तुला एकदा. आजही पाऊस तुला शोधतो बरसतो उगा तो तुला शोधण्या फुलांचाही गंध हरपला आता सांग तुझ्या नावाने तोडू का एकदा. मीच माझ्यात उरलो नाही तुच ध्यानी मनी असतेस चंद्रास विचारतो तुझ्या खुशाली त्या ताऱ्याला तुला मागू का एकदा. सांगायचे होते मला तुला काहीतरी तुला पुन्हा सांगणं मला जमेल का खुप काही आहे मनात साठलेले झालीच कधी भेट तर बोलशील का मला एकदा. दिपक कोळसक ©Dipak kolaskar #आठवणींच्यापुस्तकातुन
Dipak kolaskar
त्या जुन्या वाटा…. सहज निघून जातो दिवसा मागुन दिवसं हा वेळ कुणाला धरताच आला नाही कळलेच नाही कसा लोटला काळ आयुष्याच्या गाडीला थांबता येत नाही. छान होती कहाणी त्या राजा अन राणीची शाळेत त्या राणीची भेट मला झाली व्हायला ओळख तिच्याशी वेळ थोडा लागला मग हळू हळू आमची सूत्र जुळू लागली. वर्गातल्या मंडळीशी ओळखी होऊ लागल्या त्या गर्दीत आमचा संवाद नजरेने होऊ लागला अधून मधून भावना आता पत्रात कळू लागल्या मग रुसवा फुगवा मात्र हक्काने होऊ लागला. पुस्तकाची अदलाबदल होन स्वाभाविकचं होत लपून छपुन चॉकलेट वगैरे देन तस सुरूच होत हातावर नाव काढण्यात तर वेगळाच आनंद यायचा सहज जुळून आलेलं ते नात प्रेमाच खूप छान होत. कधी तीही बोलली नाही कधी मीही बोललो नाही प्रेम होतं एकमेकांवर पण कधी व्यक्त केलं नाही भासलीच नाही कधी गरज भावना व्यक्त करण्याची ती म्हणायची,मला तू आठवशील का तुला मी आठवणार नाही? कळलेच नाही त्या नात्याचा शेवट कसा झाला सरले ते वर्ष पुन्हा भेटण्याचा योग नाही आला आजही आठवतो तो चेहरा अन मन भरून येते त्याच वाटेने आजही तिची चाहूल कानी पडते. दिपक कोळसकर ©Dipak kolaskar #आठवणींच्यापुस्तकातुन
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited