Find the Best श्री_स्वामी_समर्थ Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
#माझ्या श्री स्वामी समर्था...... तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पूरत नाही एकेक मणी मोजून अन् नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला तु अन् ब्रम्हांड व्यापूनही उरलेला तु मग अशा तुझ्या विश्वरूपी स्वरूपाला समजावं तरी कसं ? अन जपाच्या त्या एका माळेत तुझ्या विश्वव्यापी स्वरूपाला मोजावं तरी कसं ? जपमाळ म्हणजे एक अवीट बंधन मनाला स्थिर करण्याचं ते आहे साधन मजला या बंधनापल्याड जायचंच तुझ्या अखंड नामात रंगुन जायचंच नाम यावं तुझं माझ्या मुखात अगदी सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नामजयघोष व्हावा फुलाबरोबर जसा असतो मधुगंधस्वरूप सुवास @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #श्री_स्वामी_समर्थ
शब्दवेडा किशोर
#मी आहे तुझ्या पाठीशी मी म्हणालो स्वामींना तुम्ही माझे आहात कोण ? स्वामी म्हणाले वत्सा तू आणि मी नाही दोन मी म्हणालो जीवनाची वाट माझ्या असेल कशी ? स्वामी म्हणाले भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी...... मी म्हणालो स्वामींना सांगा तुम्ही कुठे असता ? जाते माझी नजर जिथे तिथे तुम्हीच कसे दिसता ? स्वामी वदले मी वसतो भक्तांच्या हृदयापाशी कधी ही भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी...... मी म्हणालो स्वामी माझा हात हाती घ्याल का ? चुकलो मी जरी कधी साथ मला द्याल का ? नामस्मरण करत राहा मग चूक होईलच कशी ? स्वामी म्हणाले चालत राहा मी आहे तुझ्या पाठीशी...... मी पुसले प्रकट दिनाचा सोहळा कसा करावा ? कशी करावी सेवा तुमची काय बेत आखावा वदले स्वामी नको सोहळा तू स्मरशी मजला मनाशी भिऊ नकोस सदासर्वदा मी आहे तुझ्या पाठीशी...... कळली मला चूक माझी मी उगा प्रश्न पुसले या जीवनी क्षणोक्षणी स्वामी सामोरे दिसले मी तुझा नी तू माझा स्वामी वदले मजसी भिऊ नकोस क्षणोक्षणी मी आहे तुझ्या पाठीशी...... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #श्री_स्वामी_समर्थ
शब्दवेडा किशोर
#सांग ना स्वामी आई कसा होऊ मी उतराई.. सांग ना स्वामी आई कसा होऊ मी तुझ्या मजवरच्या उपकारातुन उतराई मन भ्रमीत हे झाले जग वाटे खोटे सारे जीव तुझ्या ठायी लागे मग तुच सावरशी आपसुक सारे तुझी कृपा ठाई ठाई सांग ना स्वामी आई कसा होऊ मी तुझ्या मजवरच्या उपकारातुन उतराई माझ्या ठाई असे अठरा विश्व दरीद्रय अन दोन घासाची ही भ्रांत तरी जेव्हा मी नाव घेता तुझे माझ्या ओठी तेव्हा क्षणभराचाही विलंब न लावता देशी तु मज रोज तूप रोटी तुझी भक्ती कशी वाया जाई सांग ना स्वामी आई कसा होऊ मी तुझ्या मजवरच्या उपकारातुन उतराई व्यसनाधीन मानव शाप असे घरासाठी मग होशी तू कठोर अन् येई तेव्हा हाती तुझ्या काठी धाक तुझा बघ त्यास नवा जन्म देई सांग ना स्वामी आई कसा होऊ मी तुझ्या मजवरच्या उपकारातुन उतराई नाना आजाराने त्रस्त असे माझे नश्वर शरीर काही होईना सहन कसा धरावा मी धीर ध्यास लागे तुझा तशी माझी सारी पिडा जाई सांग ना स्वामी आई कसा होऊ मी तुझ्या मजवरच्या उपकारातुन उतराई नाही ठावे यज्ञ याग कुठे काशी अन् कुठे प्रयाग मज जप तप नाही ठावे अन् नाही ठावे मज भक्ती आणि त्याग माझे ब्रह्मांड असे फक्त तुझ्या ठाई सांग ना स्वामी आई कसा होऊ मी तुझ्या मजवरच्या उपकारातुन उतराई तुझ्या नावाचा बाजार मांडती कैक लोक पैका हवा तरी कशा पाई खरं तर देवा तुला भक्तीचीच भूक का चुकीच्या गं ठायी तुझी भक्ती वाया जाई सांग ना स्वामी आई कसा होऊ मी तुझ्या मजवरच्या उपकारातुन उतराई स्वार्थापोटी बघ कुणी छळवाद हा मांडला निष्पाप भक्त तुझा असा कसा रे गांजला दाव मार्ग त्यांना आता तरी काही सांग ना स्वामी आई कसा होऊ मी तुझ्या मजवरच्या उपकारातुन उतराई @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #श्री_स्वामी_समर्थ
शब्दवेडा किशोर
श्री स्वामी समर्थ माझ्या द्वारी येऊनी बसले क्षणभर अन् हसले माझे सद्गुरू श्री स्वामी आयुष्याची ज्योत सदा तेवते माझी त्यांच्यामुळे असे माझे कृपाळकेशव श्री स्वामी समर्थ अनाहुत असाच मी मनाच्या हिंदोळ्यावर जेव्हा गात बैसलो स्वामीमय अभंगवाणी गाता गाता हर क्षणाक्षणाला पाही देव तो मी माझ्या अंतर्यामी मंद मंद पवनाच्या त्या लहरी प्रसन्न करिती सदा जिवितास भारी अनुभव घेतो तेव्हा मी दैवी सुखाचा मनात आनंदाच्या येती ऊर्मी निळ्या नभाला बिलगून खाली नक्षत्रांची ती दिसली स्वामीकृतनगरी त्या ठायीच्या उंबऱ्यात बैसोनी घेतले तृप्तीचे मी हर क्षण दान पदरी तेजोमय गुरू प्रकट जाहले झालो तयांच्या दर्शनाने मी कृतार्थ असे दिव्यतेजललाटसंपन्न आहेत माझे गुरूराया कृपाळकेशव श्री स्वामी समर्थ ©शब्दवेडा किशोर #श्री_स्वामी_समर्थ
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited