Nojoto: Largest Storytelling Platform

Best चाळीशीच्याउंबरठ्यावर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चाळीशीच्याउंबरठ्यावर Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories

₲₳₲₳₦ भेदी

प्रेम कधी कधी व्यक्त करण राहुन जातं ..
जवळ असुन ही एकमेकांत गुंतन राहुन जातं...
दोन लेकरांची मायबाप ते...
जवाबदारी पार पाडता पाडता एकमेकांच होण राहुन जातं..

दोघे ही चाळीशीत आले...
संसाराचा गाडा पार ओढता ओढता ..
मात्र एकमेकांसाठी वेळ काढणं अवघड झालं...
तो  कधी भाजी  तर कधी रेशन आणतो
मुलांसाठी खाऊ तर कधी त्यांची हौस पुरी करतो. 
राहुन जातो गजरा तिच्यासाठीचा जी राबते दिवसभर..

तीच ही तसच आहे...
मुलांना प्राधान्य देता देता त्याचा विसर  पडतो...
मुलांच्या फर्माईशीत त्याच्या आवडीचा मात्र विसर पडुन जातो..

साठी ओलांडलेल्या आई वडिलांचे कधी डॉक्टर दवाखाना तर कधी त्यांची देवाच्या वार्या...
तो मात्र वापरी ठीगाळ लावलेली बनियान ..
ती ही तीच्या इच्छा मनात ठेवी..
खर्चाच्या हिशोबात आवडलेली साडी लांबुनच पाहुन स्वत:च मन भरी....

चाळीशीतल्या प्रेमाची गोष्टच अनोखी आहे..
दुसर्यासाठी जगता जगता साथीदारासाठी काहीच करता येत नाही...
मन हसले रडले तरी जवाबदारी पोटी आसवं डोळ्यात कधी येत नाही...

तरी ही दोघे मात्र निर्भीड पणे संसार ओढी...
गाडीची चाके लांब असली तरी एकमेकांशिवाय दोघे ही अपुरी..
किती ही संकटांच्या खड्ड्यात दोघे ही  साथ कधी सोडत नाही ...
एकमेकांवर प्रेम व्यक्त जरी नाही झालं तरी त्यांची साथ कधी सुटत नाही...

©₲₳₲₳₦ भेदी #Relationship #चाळीशीच्याउंबरठ्यावर

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.

read more
शरीर थोडे थकते
पण मन मात्र थकत नाही
जसे पाने जरी गळून पडली 
तरी झाड गळून पडत नाही
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहे
पुढे साठीच्या घरात ही जाणार आहे.
पण माझ्यात काहीच फरक पडणार नाही,
कारण शरीर जरी म्हातारे झाले 
तरी मन माझे तरुणच राहणार आहे.
जसा मी आज आहे उद्या ही तसाच राहणार आहे,
कारण माझ्या मुलांमध्ये मी मला पाहणार आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय हे आता जाणवू लागले,
वाचन करताना जेव्हा अक्षरे अंधुक दिसू लागली नि डोळ्यातून पाणी येऊ लागले.
मन काही मानायला तयार नाही,
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय म्हणजे म्हातारे झाले,हे काही बरोबर नाही.
आता कुठे मुलांना समज येऊ लागली आहे,
आई वडिलांच्या मेहनतीची त्यांना जाण होऊ लागली आहे.
त्यांचं राहू द्या आपल्या आई बाबांना ही बघा त्यांच्यासाठी आपण अजूनही लहान आहोत,
आणि लोकं म्हणे आपण चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहोत म्हणजे म्हातारे झालो आहोत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर हे घाव होऊ लागले मनावर.
काही वर्षांपूर्वीपर्यंत भाऊ,दादा अशीच हाक यायची,
आता मात्र अंकल,काका असे आवाज येऊ लागले कानावर. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile