Find the Best प्रणयगीत Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
pooja d
सांग ना राजा, कसा धीर धरू दिन सरला, चांदण्यांची ये जा सुरू।। आला चंद्रही, घेऊन मंद प्रकाश दरवळला कुंदही, चहूकडे मंद सुवास।। ये ना तू ही, अश्वावर स्वार होऊनी दारात उभी, तुझी "राणी"।। विश्रांती आज, सोबत घेऊया चल जरा, ताऱ्यांवर फिरून येऊया।। हृदयातील नावे, श्वासांवटे ऐकूया झोपेला आज, चकमा देऊया।। गात्र सारे, आज उसवशील? स्पर्शाची भाषा, मला शिकवशील?? கவிஞர்களே பதிவிடுங்கள் உங்களின் காதல் கவிதைகளை இப்படத்திற்கு பொருத்தமானதாக. #கவிதை_பலகை #கப்பல்_ #YQkanmani #YourQuoteAndMine Collaborating with கவிதைப்பலகை #प्रणयगीत
கவிஞர்களே பதிவிடுங்கள் உங்களின் காதல் கவிதைகளை இப்படத்திற்கு பொருத்தமானதாக. #கவிதை_பலகை #கப்பல்_ #yqkanmani #YourQuoteAndMine Collaborating with கவிதைப்பலகை #प्रणयगीत
read morepooja d
सख्या, उठल्यात लहरी आज रात्र प्रहरी येशील ना स्वप्नी माझ्या जवळी।। बसेन मी, सजूनी बनुनी तुझी नवरी बघता तू मजला जाईन मी शरमुनी।। दिव्याचा प्रकाश जरा मंद कर अत्तराचा थोडा शिडकावा कर।। हलकेच नजरेशी माझ्या तू नजर मिळवं हातात तुझ्या हात धरून मला अधीर कर।। येऊनि जवळ, कुंतल माझे मोकळे कर अधराने तुझ्या, अधर माझे कुस्कर।। #प्रणयगीत #प्रणय #प्रेम #yqtaai
pooja d
हा$$य, झाले मी फिदा सख्या, तुझ्यावर तुझ्या त्या पिळदार बाहूंवर..... त्या सावळ्या रंगावर...... तुझ्या त्या सरळ नाकावर.... तुझ्या ओठांवर.... तुझ्या दाढी वाढलेल्या गालावर...... तुझ्या ओठांवरच्या मिशीवर.....इश्श !! #प्रणयगीत #प्रणय_रात्रि
pooja d
ही रात्र अशी बेधुंद करणारी मदहोश करणारी तुझ्या मिठीत शिरणारी मोगरा फुलवणारी अधर आतुर करणारी गात्र उसवणारी प्रणयासाठी अधीर करणारी ।। #प्रणयगीत #प्रणय_रात्रि #प्रेम #मराठीकविता
#प्रणयगीत #प्रणय_रात्रि #प्रेम #मराठीकविता
read morepooja d
सख्या,बघूनी तुझी ती काया मन तयार होई भुईवरी लोटांगण घ्याया ।। #सख्या #प्रणय #प्रणयगीत #तीनओळी
pooja d
सरले आता कित्येक दिस आज तू स्वप्नात यायला हव ।। आतुरतेने मिठीत मला घ्यायला हव । घट्ट तुझ्या उराशी कवटाळाया हवं । शुष्क ओठांना ओलं करायला हवं । शिगेला पोहचली प्रणयाची उत्सुकता तिला आज तू पूर्ण करायला हवं ।। #प्रणयगीत #प्रेम #मराठीकविता
pooja d
सख्या, आज चंद्र ही उगवला इथे अन चांदण ही आहेत विखुरलेले मग, का केस माझे घट्ट बांधलेले ?? वारा ही सुसाट सुटलेला शहारा अंगभर पसरलेला तू का असा दूर उभा असलेला ?? रात्रीचा पहर हा मिळालेला एकांत हा हातातून जाऊ देऊ नको ना !! कुंदाचा सुगंधित तो गजरा माळ केसांत माझ्या होऊ दे प्रणयाला सुरुवात तुझ्या नि माझ्या....... #प्रणयगीत #प्रेमगीत #मराठीकविता
#प्रणयगीत #प्रेमगीत #मराठीकविता
read morepooja d
अधीर झाले मी सख्या, तुझ्या बाहुपाशात येण्यास, किती वाट बघावी लागणार ओठांना ओठांवर टेकवण्यास ।। अधीर होते मी सख्या कानावर 'राणू' हाक पडताच, कधी ऐकू येईल कानांना तुझ्या श्वासांचा आवाज ।। सख्या, वाटत आता बिलगाव तुला घट्ट वेलीसारखं, द्यावा झोकून देह माझा तुझ्यात खरच, दुसरं सुख नाही प्रणयासारखं ।। #प्रणयगीत #प्रेमकाव्य #मराठीकविता
#प्रणयगीत #प्रेमकाव्य #मराठीकविता
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited