Nojoto: Largest Storytelling Platform

Best भेट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भेट Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutभेटशील का, भेटल का, भेटणार का, भेटूया का, धावती भेट in english,

  • 42 Followers
  • 64 Stories

krunal.shwas@gmail.com

पहिली भेट मनात थेट
अगदी घर करून गेली
लवकरंच भेटूया पुन्हा 
नजरेने ती बोलून गेली







-✍🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त)

©krunal.shwas@gmail.com #भेट #नजर #मन

शब्दवेडा किशोर

#भेट
भेटीची ती उत्कट आस लागता उरी मनाने कशी साहावी ही आपल्यातील दूरी
सखे तुझ्या प्रेमाने चिंब चिंब मी होतो
का कळेना तुला गं सुखबहर माझ्या जीवनास तुझ्यामुळे येतो
तूझी साथ सुखाची त्यात पावसाची बरसात कळी उमलून येई मनी माझ्या
आपल्या प्रित भेटीची असे तुझी साथ सोबत तेव्हा प्रेमाची क्या बात आहे
साथीला अन् सोबत थोडासा फरक आहे नजरेचा पूर थांबेलही हृदयात त्याचा बांध आहे
मन माझे हे इवलेसे नकळे मज कधी तुझे झाले
तुझ्या येण्याने आयुष्यात इंद्रधनू रंग फुलून आले
तुच तर आता एक माझ्या मनीची आस आहे नाही तर
बाकी सगळा मजला जगीचा बहुधा आभास आहे
अंतरीचे तु न सांगता सखे जाणून घे संपतील सारे दुवे लवकरच
कर थोडी प्रतिक्षा अजुनी मिलनास आता अत्यल्प वेळ आहे
दुराव्यातच आता जरा सुख मानुन घे........
सखे मज नकोय तुजकडून चंद्रतारे अन् नको ते फुकाचे प्रेम जाळ्याचे निराळे पसारे
कधीतरी मनमीत बनुनी न सांगता भाव मनीचा जाणून घे
जराशी कळ सोस दुर राहण्याची आहे वाट्याला आलेला हा दुरावा तर
दुराव्यातच तु अजुन जरासा काळ सुख मानुनीया घे........
हदयी नवी ज्योत जागव लेखणीस तुझ्या मी सोबत नसतानाही धारदार बनव
घे श्वास नव्याने अन् मी अस्तित्वात तुझ्या नसतानाही
पुढं चालायची जिद्द उरात धगधगती ठेव नव्यानं
प्राजक्तासम तु हररोज मजशिवाय बहर घे
दुराव्यातच तु अजुन अल्प काळ सुख मानुनीया घे........
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #दुरावा_तूझ्या_माझ्यातला

Nikhil S. Kale

#भेट

read more
भेट झाली नाही......
आम्ही रोज भेटायचो,हसत खेळत आमचा दिवस जायचा.... पण एक दिवस ती आली नाही अन् मी...... एकटा पडलो......!!!
तो पूर्ण दिवस तिच्या विना खूप मोठा गेला......
रात्री घरी आलो न जेवता तसच झोपलो...... मनात म्हणत होतो ....उद्या माझी आणि तिची भेट होईल म्हणून ......झोपलो ...!!! पण मला झोपच लागली नाही , काय माहित मी खूप भित होतो..... खूप सारे प्रश्न माझ्या समोर उभे राहिले ??????? असच करत दिवस उजाडला पण मला काही झोप लागली नाही !!! 
मी उठलो,तयार झालो आणि निघालो .... माझ् मन आज ती मला नक्की भेटणार..... पळ लवकर..... मी पोहोचलो पण ती अजून आली नव्हती.....???  माझ मन मला सारखं सारखं प्रश्न विचारत होत ???
काय झालं ? काय झालं तर नसेल ना तिला ? ती ठीक तर आहे ना ? ..... असे खूप सारे प्रश्न पडायला लागले........ पण ती दुसऱ्या दिवशी पण आली नाही..... मी खूप भिलो...... !!!!! दुसरा दिवस ही मी एकट्याने घालवल.......माझे मित्र माझी चेष्टा करत होते.....पण मी त्यांच्या कडे दुर्लक्ष केलं......मला सध्याला ती इंपॉर्टन्ट होती .....बाकी मला कोणी काहीही म्हणू देत !!!!! त्याच्या दिवशी मी माझ्या घरी न जाता तिच्या घरी गेलो...... बाहेरून आवाज दिलो.....तेवढ्यात तिचे वडील आले........अरे नि** ये ना !!! माझी फाटली ..... तिचा वडील रागात होते.... मला अजून भीती वाटा लागली !!! ही तिच्या पप्पा ला काय सांगितली असेल म्हणून ...... तेवढ्यात मी धाडस करत होतो तेवढ्यात तिचा आवाज आला आणि माझे हात पाय गळाले..... रोज एवढं बड बड करणारी .....ही चा आवाज अस का ????? 
ती - *** आत ये !!! 
मी - आलो !!!! तिचा पप्पा मला जाम रागाने पाहत होता ....... मी आत तिच्या कडे गेलो तर काय ??? तिला खूप ताप होता ..... तिचा चेहेरा खूप बारीक झाला होता ..... मला राहवल नाही...... मी तिथून निघून गेलो.......माझ्या घरी आलो ........!!!! परत न जेवता तसाच झोपी गेलो.......
तिसऱ्या दिवशी मला ताप आला ...... काय माहित काय झालं अचानक ????? मी तसाच झोपून राहिलो .......तेवढ्यात तिचा फोन आला !!!!
ती - काय रे अचानक निघून गेला त्या दिवशी ???? 
मी - नाही !!! ते मी !!! असच !!!! मी हळूच विचारलो आता कशी आहेस तू......🥺...
ती - आता मी एकदम ठीक आहे .........
मी - thank u देवा...... काय झालंत तुला ??? 
ती - ते मी सांगेन नंतर !!! तुला काय झालंय ???? 
मी - काय नाही आपल असच !!!! ती खूप मोठ्या ने असू लागली आणि मी खूप आनंदी झालो ...... 
ती - ये उद्या भेटू..... मी वाट पाहते तुझ ...... ठेवते फोन.....येड्या.....!!!
मी - ही अस का म्हणली मला ???? आणि अस का म्हणली सांगते म्हणून ???? उद्या विचारतो थांब ???? फक्त अवढ्याच माझ्या आणि तिच्या संभाषण मुळे मी कधी बरा झालो कळलं नाही !!!! उद्या भेटतो मग बोलतो तिला ........
पुढची गोष्ट लवकरच ........

©Nikhil S. Kale #भेट

@wr. pallavi

#भेट

read more

Shankar Kamble

कसे ओळखावे तुला भेटल्यावर?
कसे शांत होणार रान पेटल्यावर?

दवाचे सडे आज भिजले अवेळी
नको पान तोडू पुन्हा जोडल्यावर..

गेले लयास मोठे स्वप्नातले मनोरे
तलवार म्यान केली खिंडीत गाठल्यावर..

जुजबी बनाव होता जगण्यातला कसा हा
गिळले वादळांनी पंख दोन्ही छाटल्यावर..

फिरूनी कितीदा गिरवतोस काय पुस्ती?
होतात खुणां गहिऱ्या पुन्हा खोडल्यावर..

जुळवून आज घेते सुखाचे उखाणे
अडवतो उंबरा का माप ओलांडल्यावर?

भरभरून श्वास आता लाभले परंतु
ठेवू कशात भरुनी क्षणगंध सांडल्यावर?

©Shankar Kamble #walkingalone #तू #भेट #भेटली_ती_पुन्हा #भेटतुझीमाझीस्मरते #गझल #मराठीशायरी #कवी #मराठीकविता

pooja

#भेट

read more

Kunal Salve

किती तरी दिवसांनी ते भेटले 
ती साडीत समोर दिसता मग त्यानं,
तिच्या साडीचा पदर होणंच पसंद केले ! Pc: Google
#भेट 
#पहिलीभेट1 
#yqmarathi 
#yqtai

Kunal Salve

आतुरले होते डोळे पाहण्यासाठी तुला 
तु नाही आलीस आणि पाहा,
पापणीही रुसली जेव्हा थेंब तिचा 
तुझ्यामुळं मातीस बिलगला !  #भेट
#प्रेम
#पापणी

Kunal Salve

भेटणं झालं,आणि मिठीतही ती आली 
उद्या येईल मी भेटायला बोलली ती आणि,
हातात हात तिचा येता काय माहीत?
सकाळ कशी काय झाली !  #भेट #सकाळ

Kunal Salve

आज पण नजर तुला शोधायला तिथं जाते, 
जिथं पहिली भेट आपली, आणि दोघांच्या हृदयात काहूर माजत होते____ #नजर 
#भेट 
#पहिलीभेट 
#प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile