Find the Best मिठीत Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutमिठीत तुझ्या कविता, मिठीत, मिठीत घेना,
Kunal Salve
एकदा का ती मिठीत आली मला काही भान नसायचं ! आता पुढं काय सांगू ? पाऊसात सारं रान पेटायचं ! #मिठीत #प्रेम
yogesh atmaram ambawale
केसांची बट कपाळावरी, सुंदर हास्य गालावरी, त्यातही मोहक ती खळी, तिरपी नजर ही वार करी, ह्या अदांवर लिहू वाटे सुंदर एक शायरी. #yqtales #yqquotes #yqmarathi #मिठीत घेतले कसून#वेदना पळाली हसून #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana Halge केसांची बट कपाळावरी, सुंदर हास्य गालावरी, त्यातही मोहक ती खळी, तिरपी नजर ही वार करी, ह्या अदांवर लिहू वाटे सुंदर एक शायरी.
#yqtales #yqquotes #yqmarathi #मिठीत घेतले कसूनवेदना पळाली हसून #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana Halge केसांची बट कपाळावरी, सुंदर हास्य गालावरी, त्यातही मोहक ती खळी, तिरपी नजर ही वार करी, ह्या अदांवर लिहू वाटे सुंदर एक शायरी.
read morePallavi Phadnis
*त्या आभाळाला निरोप* त्या आभाळाला द्या माझे निरोप त्याच्यावर आज खूप झालेयत आरोप किती वाट पाहायची त्याने भरून यायची वाट पाहायची घराच्या दारात , आत्ता येईल आणि गर्द ओल्या मिठीत घेईल मी आपले सावरुन बसायचे आणि ह्याने मात्र मयसभाच उभी करायची मग जरा बागेत जावून ,फुलांवर मोती साठलेत का पाहायचे ,आणि ह्याने मात्र आत्ता येतो सांगून गरगर फिरायचे ह्याला फक्त एक निमित्त असते,यायचे म्हणून गडगडाट करतो,आधी पाठवतो वाऱ्याला आणि त्याच्याशीच भांडतो ह्यात मात्र हे लबाड आभाळ हळूच घर सोडते आणि हळूच पुढे निघून जाते ह्याला कुठे माहितेय ,हे आभाळ दिसले की सगळ्या सृष्टीला येते भरून ,तो चातक बसतो शाखेवर,आणि मयूर फिरतो रानभर, छोट्या छोट्या पाखरांची घरट्यात परतण्याची घाई , पदर सावरुन बसलेलीअसते वनराई , सगळ्यांच्या डोळ्यांची होतात निरांजने, ह्याचे मात्र आगंतुक येणे ह्याच्या खेळात सगळेच सामवतात, आमच्यासारखे ही लेखणी घेऊन कल्पनेत रमतात, किती त्याचे लडिवाळ चालतात चाळे ,सगळीकडे सृष्टीच्या डोहाळपणाचे सोहळे आता ह्या आभाळाला आणखी एक प्रेमळ निरोप , येशील तेंव्हा सुख घेऊन ये नाहीतर तुझ्यावर होतील सावत्रपणाचे आरोप तुझे नी धरतीचे नाते अनोखे आम्ही का ठेवावे तुझे लेखेजोखे तू कधी हि ये पण येताना अनुरागी आनंद घेऊन ये ,तुझ्या भरल्या कृष्णशितल ,शाश्वत मिठीत मला अलगद गोजांरुन सामावून घे पल्लवी फडणीस,भोर✍
rashmi londhe
जेव्हा जेव्हा पाहाल तुला, वाटल जवड घ्यावं तुला तुझ्यासाठी बनवलेत चंद्रयान मिशन पण तू का रे नाही घेत मिठीत आम्हाला केल इतकी तपस्या तुझ्यासाठी वाटल आता तरी समजणार तुला पण तू तर चंद्रमा आहेस कस देणार रे इतक्या लवकर जागा आम्हाला पण तू विसरू नको आम्ही कुणी परके नाही लवकर घेणार तू मिठीत आम्हाला आणि मनणार हो रे भारता तुझ्यामुळे कळलं विकास मला ...... रश्मी चंद्रयान मिशन फक्त तुझ्यासाठी
चंद्रयान मिशन फक्त तुझ्यासाठी
read morePrakash Gore ( Raj )
परी तू माझी विसरशील सारं जग, एकदा माझ्या मिठीत मिठीत येऊन बघ......... राज. राज......
राज......
read moreकिशोर
मी गोपिकात दंग तु येऊन करतेस त्याचा भंग.. म्हणतेस कान्हा हा तुझा बाहाणा मी म्हणतो नाही राधे मी तुझाच दिवाना... तुझ्या डोळ्यात तरलतात आसु मी गहिवरून करतो हासु.... तु बिलगतेस हळूवार मिठीत अनं मी तुझ्या मिठीत.....
Roshan Balbudhe
ती चांदणी रात्र सखे, सोबत तु साथीला... तुझे निखळ सौदर्य पहात, मी हा असा झिंगलेला... शृंगाराची शय्याही ती, बघ ना कशी सजलेली... तुही अशी तिच्यावरती, नव्यानवरीसम नटलेली... निळेशार कुंतल तुझे, मानेवरती रुळलेले... मनही माझं वेडच ते, त्यांच्यातच गुंतलेले... गौरवर्णीय अंगकांती , थरथरनारे ओठ तुझे... ओठ तुझे मिठीत घ्याया, ओठ माझे आसुसले... तुझ्या सागरी डोळ्यांच्या, डोहात पार मी बुडलो... नकळले मला कधी मी, तुझ्या बाहुपाशात जखडलो... तुझ्या गालांवर लाली, बघ ना कशी फुलली... तुझ्या गालांची मधुर खळी ती, माझ्या ओठांआड दडली... तुझ्या मधाळ ओठांशी, माझे ओठ जुळले... तुझ्या घट्ठ मिठीत नखांचे, माझ्या पाठीवर व्रण उमटले ... तुझी घट्ट मिठी ती, तुझे उष्ण श्वास... ती मनमोहिणी रजनी, आणि मी मदहोश... रोशन दिल की बाते
दिल की बाते
read moreRavi R.Jadhav
माँ आई दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई, ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी, वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
Amol Marchande
काल मध्यरात्री अचानक मला जाग आली…… आणि क्षणार्धात तू माझ्या मिठीतून विलग झालीस... तुझ्या शांत निजलेल्या कायेकडे मी एकटक पहात होतो... सगळीकडे अंधारच अंधार होता... तरी देखील खिडकीतून येणारा मंद प्रकाश अलगद तुझ्या चेहऱ्यावर पडतं होता... त्यामुळे तुझ्या त्या सौंदर्याच्या मोहात मी अधिक गुंतत होतो... हळूहळू तुझ्या माझ्यातील अंतर लुप्त होत होतं... शांत झालेला हालचालीने जाग आली तुला, पुन्हा………………… पण क्षणभरातच तू लडिवाळपणे माझ्या मिठीत आलीस... तुझा चेहरा माझ्या मिठीत अधिकाधिक बध्द होत गेला... अन माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर प्रेमाचा वर्षांव त्या मध्यरात्री चालू होता... #gif