Find the Best कसं Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutअभ्यासात मन कसं लावायचं, लाकडाचे घर कसं बनवायचं, सोनं कसं तोळा आहे, झेंड्याचे चित्र कसं काढायचं, जगावं कसं सरकार,
शब्दवेडा किशोर
#कसं कळावं.... रातीस या कसं कळावं तळमळणं माझं एकांतातील या उदास मनाचं जळणं माझं कित्येक आठवणींचा बाजार हा मनी दाटलेला अन् विरह वेदनेत सदा असलेलं हे शापीत होरपळणं माझं रातीस या कसं कळावं तळमळणं माझं एकांतातील या उदास मनाचं जळणं माझं.... तेजधार होऊनच चेतवतो येथे दुःखांचा अंगार मज क्षणाक्षणाला समजावं त्यास कसं धगीतलं ते शेकणं माझं जळता जळता राख होते माझ्या मनाची मजलाही ती कळेना मनही जाणतं हे असं उरलेलं जगणं माझं रातीस या कसं कळावं तळमळणं माझं एकांतातील या उदास मनाचं जळणं माझं.... सांगावं कुणा हल्ली बोलावं मी कुणाशी बहुदा वेगळेच होऊ लागलंय अस्तित्व हे माझं रातीस या कसं कळावं तळमळणं माझं एकांतातील या उदास मनाचं जळणं माझं.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माझ्या_मनातलं_वादळ
pooja d
तुझ्यावर प्रेम किती तुला कस सांगू,, प्रश्न पडला देवाकडे तुला कस मागू........ #कसं_सांगू #कसं #देवापुढे #चारोळी #प्रेम
#कसं_सांगू #कसं #देवापुढे #चारोळी #प्रेम
read moreprem maghade
......@अधुर स्वप्न माझं@..... #रोजचं बोलता बोलता जणू मला #तुझी सवयच होऊन गेली" #येत राहते रोज स्वप्नात माझ्या #विरह मला तो देऊन गेली" #आवडतेस सखे मला तू सांगू तरी #कसं" #अकांत मनाच्या #यातना मनात दाटून ठेवू तरी #कसं" #बोलणं वाटत असेल जरी सोप्प पण ते कधी #सोप्प मात्र कधीच नसतं" #बोललो असतो मी सर्वकाही माझ्या मनातल पण #तुला ते चुकीचं वाटलं असतं" #शब्द येत नाही ओठी माझ्या #तुला पाहतांनाच मागे सरतात" #बोलावे काय म्हणावे काय तुजला #शब्द माझे मात्र मनातच जिरतात" pravin Ek premveda 💔 #Heartbeat 💔ek premveda
#Heartbeat 💔ek premveda
read moreNeeraj Shelke
आयुष्यं हे देखील एक तारेवरची कसरतच़ आहे , ते कसं जगावं , किती जगावं , कुणाच्या मनाप्रमाणे जगावं , या आयुष्यात काय करावं , काय करू नये , कसं करू नये हे ज्याने जाणले त्याने आयुष्यावर विजय मिळवलाच़ म्हणून समजा. ©नीरज शेळके इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #life #quoteonlife
Yogesh Hiwrale
"होय तर तुला, म्हणावंच लागेल नाही म्हणून, कसं चालेल रोजची 'ती' सकाळ आजही आठवते पुढे तू ,पाठी मागे मी,असेच दिवस जात होते त्यावेळेस का नाहीस, मला थांबवलं गालात हसून, चार वर्षे सतत फसवलं इतक्या वेळा,प्रेमवेडाच कुणी फसेल म्हणून.. होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल आहे का काही उपाय सुचव तूच जरा एखाद्या अनोळखी पेक्षा मीच नाही का बरा तुझ्या ,पाषाण हृदयाला आता पाझर फुटू दे, तुझ्या प्रेमाची गाडी, माझ्या दिशेने सुटू दे या रस्त्यानं तुला स्वर्गसुख लाभेल त्यासाठी...होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल तुलाही कळते आहे प्रेम माझे तुझ्याच प्रेमाचे आहे काळजावर ओझे नाही म्हणून, अशी छळू नकोस विरहाच्या अग्नीत, अशी पोळू नकोस एवढ प्रेम तुला कोण गं करेल शेवटी.. होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल... #nahi#kasa#chalel#
अश्लेष माडे (प्रीत कवी )
बरेचदा आपण एखाद्याची स्थिती बघून त्याच्याविषयी नको ते विचार करायला लागतो. तो काय करतो, कसं करतो, कशाला करतो अश्या फालतू आणि निरर्थक बाबीकडे विशेष लक्ष देत फिरतो. ह्या धर्तीवर सगळे आपापल्या पद्धतीने जीवन जगतात. ज्याचं त्यालाच माहित असतं. तो कसं दिवस काढतो ते. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. म्हणून कुणावरही हसण्याआधी, बोट उचलण्याआधी दहा वेळा विचार करा. कारण, कधीकधी माणसाच्या आयुष्यात असे काही आघात घडतात की, अवघ जीवन बदलून जाते. आणि प्रत्येकाच्या जीवनात असे काही गूढ असतात की, तो कुणाला सांगत नाही. बरेच लोकं समोर हसतात पण डोळ्यातून निघणारे अश्रू लपवतात. माणूस परिस्थिती पुढे हतबल होतो. डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट पाहिजे तितकी सत्य नसते. म्हणून कोणालाही काहीपण बोलण्याआधी खरंच विचार करून बोला. तुमच्या एका शब्दामुळे समोरच्याला खूप त्रास होऊ शकतो. (प्रीत )
Shivali Shendge
लोक बोलतात काय समजू मन तुझे... कसं ओळखू तुझ्या वागण्याला... त्यांना आता कसं सांगू.... बोलनच तुमचं एवढं धारदार होत की ... माझं मन ... ते जाऊ देत पण मनातल्या भावना देखील जमीन दोस्त केल्या.... शिरच्छेद केला तुम्ही.... लोकांनो...😠 शिवाली शेंडगे. खरे लोक...
खरे लोक...
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
आपल्यात थोडं जरी बदल झालेलं दिसलं की, लोकं विचारतात की, तुझ्यात बदल कसं काय झालं.. तू इतकं कसं बदलालास, पण त्यांना कुठं माहित असतं, तुटलेल्या पानाचा रंग बदलतो तो पूर्वीसारखं नाही राहत.....(प्रीत ) बदल
बदल
read moreKiran Khade
कसं सांगू मी तीला-२ की काय काय घडलं, नकळत हे वेडं हृदय माझं प्रेमात तीच्या पडलं. झोंबला गार वारा तीला-२, तर हे वेडं कुडकुडलं, घ्याव तीला मीठीत असं काहीसच बडबडलं कसं सांगू मी तीला कि काय- काय घडलं.
प्रशांत हरिश्चंद्र चन्ने
जेव्हा पाहतो मी तुला माझ्यात मीच ना उरतो कसं सांगायचं ग तुला मी तुझ्यावर किती प्रेम करतो आकाशातील चंद्र तारे बघतांना मला तुझीच आठवण येते स्वप्नात होतो तूझ्या येण्याचा भास मनात तुझीच साठवण होते जग जिंकायचं सोडून मी फक्त तूझ्यासाठीच हरतो कसं सांगायचं ग तूला मी तुझ्यावर किती प्रेम करतो तुझ्यासाठी लिहलेले शब्द ओठांवरच राहून जाते तुझा फोटो पाहिल्यावर शब्दांचे काव्य तयार होते तुझ्यापासून सुरू होऊन शेवटी तुझ्यातच सरतो कसं सांगायचं ग तुला मी तुझ्यावर किती प्रेम करतो तूझ्या आणि माझ्या प्रेमाची कधी जुळेल का ग गाठ होऊन जीवनभराची सोबती देशील का मला तू साथ फक्त तूझ्या प्रेमासाठी सखे मी दिवसरात्र मर मर मरतो कसं सांगायचं ग तुला मी तुझ्यावर किती प्रेम करतो