Find the Best कुणी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutनाही कुणाचे कुणी मराठी अभंग lyrics, एकटीच आहे मी घरात नाही कुणी, नाही रे कुणी कुणाचे, नाही कुणाचे कुणी अभंग, नाहिरे नाही कुणाचे कुणी,
मानससूत्र
जगणं शाश्वत नाहीये तरीही आपल्याला कुणी "100 वर्षे जगा" म्हटल्यावर आपण खुश होतो.. आणि मरण शाश्वत आहे तरीही आपल्याला कुणी "मर" म्हणलं तर आपण नाराज होतो.. जीवनाचं सत्य ओळखा #जीवन
Rutuja Dorwat
कुणी म्हणतं की काय तो एक चित्रकार आहे मामुली, कुणी म्हणत ती काही फुटकळ लिहीत बसते, कुणी म्हणतं वेळेची बरबादी करतो तो, कुणी म्हणत की दुसरं काही जमत नाही म्हणून करतो हे तो, लोक काय म्हणत रहातात हो, काही वाईट गोष्टी बोचणाऱ्या, तो शृंखला चितारतो हो पिंजऱ्यात बंद असताना, ती करते शब्दसाधना शब्द संपलेले असताना, कोण सांगणार त्या शिकलेल्यांना अभिनय सोपा नसतो, कोण सांगणार नुसतं फोटो काढणं आणि चांगला फोटो यात फरक असतो, अहो कलाकाराचं दान घेणं सोपं नाही, उगाच कुणीही उठून कलाकार बनत नाही, आधी जखम करून घ्यावी लागते, त्यावर पाणी मारून ती चिघळावी लागते, जखमेवर मीठ चोळलं की जखम परत भळभळते, त्याच जखमेच भांडवल जगाच्या बाजारात केलं, की उपाधी कलाकार मिळते। कलाकार होणं सोप्प नाही हो, फक्त कलेचं वेड जपता आलं पाहिजे। - ऋतुगंधा #art #artist
Anurag Sonawane
||श्री|| प्रति, अनुराग सोनवणे स. न. वि.वि प्रिय अनुराग, पत्रास कारण की, आज तुझ्याशी काही बोलावस वाटतय. अनुराग तु नेहमी तुझ्याच विचारात गुंतलेला असतोस. आजकाल तु फारस कुणाशी बोलत नाही. सतत अबोल असतो समजल. याचे कारण मला माहीत आहे. तुझे विचार खुप जगावेगळे आहे. तु फक्त तुझ्याच दुनियेत रमलेला असतो. तुझ जग निस्वार्थी आहे. तु जरी खुप रागीट असला पण तुझ्या रागवण्यात मायेचा झरा नक्कीच असतो. पण तो कोणाला दिसत नाही हे मोठे तुझे दुर्दैव आहे. तुला समजून घेणारे कुणी नाही म्हणून तु गप्प असतो. कारण तुला समजायला समाज अजुन तेवढा समजदार नाही. तुला कौटुंबिक जबाबदारी कुणी सांगावी इतका तु असमजदार नक्कीच नाही. पण तुझ्या दोघेही पायात अडचणीच्या बेड्या आहेत हे अंधळ्या लोकांना दिसत नाही. पण एवढे मात्र नक्की की इतक्या साता समुद्राच्या संकटातून तु पैलतीरी येण्यासाठी तु दम टिकवून ठेवलायस याच खुप कौतुक आणि अभिमान वाटतो. तु जन्माला आला तेव्हा पासूनच संकटांना हरवतोय आणि त्यांना तु नेहमीच हरवशिल याची मला पूर्ण जाणीव आहे. तुझा प्रिय मित्र विश्वास माझे पत्र मलाच.
माझे पत्र मलाच.
read moreMadhavi तुळसकर
प्रेम. ही एक अशी भावना आहे.. .कुणाला कळुन न कळलेली...,कुणाला पहिल्याच भेटित उलघडलेली..👨❤️💋👨.,तर कुणी आयुष्यभर मनातच लपवलेली...,कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली..तर कुणाची तरी गंमत झालेली...,कुणाचे आयुष्य उभारणारी..,तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी...😢
Mahesh Lokhande
#OpenPoetry धुके शुभ्र धुके ते दिसे सभोवती अंधुक दिसती झाडे अंधुक रस्ते अंधूक गाड्या अंधूक दिसती वाडे दूरदूरचे दिसे न काही गाड्याही धावती संथगती लाईटी लावूनी झाली तरी चालकांची ती कुंठीत मती कान बांधूनी स्वेटर घालुनी हात खिशात बंद केले चौकाचौकात करूनी शेकोट्या शेकत हो कुणी बसले हात गारठले कान गारठले थडथडती दात सर्वाच्या मुखातून पाहिली वाफ ती जात चहा काॅफीचे कप रिचवले आज पहाटेला हिवाळ्याने धुक्याचा हा चमत्कार केला अंग हालती शब्द न बोलती अशी धुक्याची करणी हिवजादूगारे रूप घेतले आज जणू अवनी हरितवनांवर दवबिंदूंचा पडू लागला सडा शुभ्रनभातून शुभ्रधुक्याचा पाऊस आला बडा सगळे फिरती रस्त्यावरती तरी न कुणी भिजती हातकान ते सुंभ होऊनी नाकास येते भरती सूर्य उगवता पूर्वेला प्रकाश तेजस्वी आला जादूगारे पाहूनी धुक्याचा खेळच संपवला धुके
धुके
read moreMahesh Lokhande
कृष्णामाई निळ्या निळ्या पाण्यामध्ये निळी निळी शांतता संथ वाहते कृष्णामाई निळी ती अथांगता हिरवे हिरवे वृक्ष उभे हात जोडूनी तटा फुलेवेली फुलूनिया सज्ज दिसती स्वागता कुणी करती प्रातःस्नान कुणी करते अर्ध्यदान पोटी घेते सर्व घाण करूनी खरी स्वच्छता धन्य ती क्षमावान भागवते ती तहान पशूपक्ष्यांचे जीवन ही जणू जलदेवता लाख उठती तरंग पाहूनी मन झाले दंग वस्त्रधुता वाजे मृदंग पाहूनी ती एकता कृष्णामाई
कृष्णामाई
read more