Find the Best हातात Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutघेऊन या हातात हात, हातात हिंदी घेतात, हातात हात असणे अर्थ, हातात पैसा येण्यासाठी उपाय, हातात पैसे टिकत नाहीत,
शब्द शृंगार 9359164650
नको असतो प्रत्येक वेळी मला तुझा पैसा, तुझं स्टेटस, तुझी संपत्ती तुझ पद मग काय हवं असतं मला.... नक्की काय अपेक्षित असतं मला आपल्या नात्यांला.... काय पाहीजे असतं मला तुझ्याकडून नक्की मला ही सांगता येणार नाही पण हवे असतात तुझे दोन शब्द जिव्हाळ्याचे.... हवी असते ती एक नजर प्रेमाची.... हवा असतो तो एक नजरेचा कटाक्ष खट्याळपणाचा.... तुझ्या केसात गुंतलेल्या मनाला तो गुंता ही आवडतो कारण तो असतो तुझ्याच विचारांचा.... थकलेलो असताना हवी असतात तुझ्या हातांची बोटे माझ्या केसात अन् तो हात माझ्या डोळ्यांच्या पापण्यावर.... कधी कधी घाबरतो मी या निर्दयी जगाला वाटतं तु म्हणावं अरे मी आहे ना तुझ्यासोबत आणि मग हवा असतो तो हात मला माझ्या खांद्यावर, धीर देण्यासाठी खूप एकाकी वाटत कधी, हिरमुसायला होतं, रडायला येतं तेव्हा मात्र हवा असतो तो हात माझ्या हातात आधारासाठी, चालायचं असतं तुझा हात हातात घेऊन त्या शांत रस्त्यावरून, अनुभवायची असते तुझी सोबत त्या झाडाखाली बसून.... कधी तरी एकांतात अनावर होणाऱ्या भावनांना पाहिजे असतो तुझा तो अलवार स्पर्श जो मोहरून टाकतो मनासोबतच शरीरालाही.... मला ही गरज असते तुझी, मला ही हवे असतात ते धुंद मंतरलेले क्षण तुझ्या सहवासाचे, तुझ्या सानिध्याचे मग हळूच शिरावेसे वाटते तुझ्या मखमली कुशीत अन् हरवून जावं वाटतं स्वतः ला.... काही क्षण हवे असतात आपल्या फक्त आपल्या जाणिवांचें.... त्या विलक्षण अनुभुतिचे.... जगाला विसरुन तुझ्यातच गुंतायच असतं, विरघळायचं असतं पण नाही व्यक्त करता येतं मला माझ्या भावनाना शब्दात.... वाटतं तु समजून घ्यावसं मी काहीच न बोलता.... ओळखावसं मनातलं फक्त नजरेतूनच.... कधीतरी घे ना मला ही समजून.... कधीतरी दे ना मला ही ती आश्वासक नजर मला बघून... तु ही विसर ना कधीतरी या जगाला.... ये ना कधी तरी मोकळ्या मनाने आणि हो ना एकरूप माझ्याशी.... माझ्या विचारांशी.... माझ्या भावनांशी.... कधीतरी माझ्यातल्या माझ्याशी.... -निल इमरोझ
vikrant shelke, zankar
संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय लोकशाही वाचवायचीय.......... विक्रांत शेळके,मावळ ७३५०८८५७३४ लोकशाही वाचवायचीय ........ बांडगुळांच्या बलात्काराने देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय लोकशाही वाचवायचीय भडव्यांच्या भ्रष्टाचाराचे रोज पारावर बसून
लोकशाही वाचवायचीय ........ बांडगुळांच्या बलात्काराने देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय लोकशाही वाचवायचीय भडव्यांच्या भ्रष्टाचाराचे रोज पारावर बसून
read morepravin Wankhede
#_पुस्तक_मला_म्हणाले_ --प्रविणकुमार वानखेडे... काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले. विसरलास का मला किती दिवस झाले, अरे एक पुस्तक हातात सुद्धा घेतले नाही. हो विसरलोच हल्ली फार गुंतलेला असतोस त्या मोबाईलमध्ये. खूप कनेक्ट झाला जगाशी, कुठं काय घडत तुला लगेच कळतं.
#_पुस्तक_मला_म्हणाले_ --प्रविणकुमार वानखेडे... काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले. विसरलास का मला किती दिवस झाले, अरे एक पुस्तक हातात सुद्धा घेतले नाही. हो विसरलोच हल्ली फार गुंतलेला असतोस त्या मोबाईलमध्ये. खूप कनेक्ट झाला जगाशी, कुठं काय घडत तुला लगेच कळतं.
read moreशब्द शृंगार 9359164650
बेफाम उधाणलेला समुद्र, बेभान लाटा, सैरवैर गार वारा आणि हातात मऊ मुलायम तुझा हात.... साक्षीला पौर्णिमेची चंद्र, खिडकीखाली नक्षत्रांचा सडा पायी घेऊन उभा पारिजात, मंत्रमुग्ध रातराणीचा सुगंध आणि तुझ्या कमरेभोवती घट्ट माझा हात अन् बेधुंद राती दुलईवर चुरगळलेला मोगरा, बाहेर अंगणात पावसाची रिमझिम, अंगावर बरसणार्या सरी, चिंब चिंब भिजलेलो मी आणि हातात तुझा हात..... तुला काही आठवतयं...? निल इमरोझ निल इमरोझ
निल इमरोझ
read moreGokul Tapadiya
कोर्टात न्यायाधीशाने एका मुलीला सांगीतले तु सासरी नांदायला जा त्यावर उत्तर देताना मुलगी म्हटली साहेब एखाद्याला कारल्याची भाजी जर आवडत नसेल तर ती का खावी ...? न्यायाधीशाने सुंदर उत्तर दिले कारल्याची भाजी जर आवडतच नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला एक लक्षात ठेव मुली एक दिवस असा येईल की तुला कारल्याच्याच भाजीची गरज पडेल तीच भाजी तुला खावी लागेल , कारल्याची भाजी किती कडु असली तरी तिला चवदार बनवणे हे सुगरणीच्या हातात आहे ... यावरून आपल्याला एकच घ्यायचे आहे की संसारात सुख दु:खाचे कडु प्रसंग येतात म्हणुन संसार टाकु नये , या उलट तो कसा चवदार होईल हे आपल्या हातात आहे , मग त्याची खरी गोडी लागेल .... कोणत्याही परिस्थिति चा सामना करत राहिले पाहिजे ते ही सकारात्मक विचाराने ...🙏
सौ.अलका माईणकर
*देशभक्तीपर गीत* *भारतमाता* *********** सुर्यासारख प्रखर होऊन मला देशभक्तीत जळायचे आहे डोळे वर करुन बघ तर माझ्या आईला मला तिच्यावर जिव ओवाळायचा आहे........ एका हातात असेल तिरंगा एका हातात बारुद असेल कुणी भारतमातेला नष्ट करण्याची केली भाषा त्याची मात्र खैर नसेल........ अंगावर झेलीन बंदुकीच्या गोळ्या जरी शरीराची झाली चाळण तरी तिरंगा फडकवेन मी भारतमाते तुझ्यासाठी वीरमरण..... ह्या श्वासाच नात माझ्याच्याने तोपर्यंत तुटणार नाही बलिदान देईन राष्ट्रहितासाठी भारतमातेच्या चरणी लीन होई.....
Ashok Murgunde
*✍🏻...Nice Line :~* 🎋 *भाग्य* आपल्या हातात नाही, पण *निर्णय* आपल्या हातात आहेत. *भाग्य* आपले *निर्णय* बदलू शकत नाही. पण *निर्णय* आपली *परिस्थिती* बदलू शकतात. *🙏🏻 शुभ सकाळ🙏🏻*
vikrant shelke, zankar
लढण्यासाठी⚔⚔⚔⚔⚔ चला आता उठा बोलवा त्या कित्येक काळपुरुषांना उठवा त्या गाडलेल्या मुडद्याना पेटवा ती स्मशाने पुन्हा मशाली पेटवण्यासाठी चालायला लागा हातात मशाली घेऊन समोरचा सूर्य उगवण्याची वाट बघू नका काळ्या रात्रीच्या थोड्या लाचने तोही गद्दार झालाय तुमचा आमचा दिवस रात्रीत बदलण्यासाठी कफने बांधा डोक्याला घ्या हातात एखादा वाळका सोटा नसतील पादत्राणे तर चला नागवेच अंधारातल्या प्रकाशवाटा शोधण्यासाठी मारा लाथ त्या मुर्दाड जमिनीला पाणी काढण्यासाठी उभा वाराच गीळा गटागटा भूक भागवण्यासाठी द्या एकदाची काळ्या खडकावर ताणून आराम करण्यासाठी अन बाभळीला बांधलेला फाशीचा दोर घ्या आता खांद्यावर क्षितिजाचा कडा चढण्यासाठी पुन्हा एकदा आक्रंदत लढण्यासाठी
जयेश पवार
लक्ष नव्हते फारसे रस्त्यात दोघांचे , त्यामुळे झाले पुढे अपघात दोघांचे !.. आपल्या हातात नव्हते फारसे काही , आपल्या हातात होते हात दोघांचे !.. ©जयेश पवार #poem #shayari #मराठी #गझल ©जयेश पवार
poem shayari मराठी गझल ©जयेश पवार
read more#tushu
एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले,
read more