Nojoto: Largest Storytelling Platform

Best करणारा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best करणारा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutसारासार विचार करणारा, चांदण्यावर प्रेम करणारा पक्षी, स्वतःचे काम स्वतः करणारा, काचेचा मुलामा देण्याचे काम करणारा, दगडावर कोरीव काम करणारा,

  • 7 Followers
  • 17 Stories

MRk(love)

teacher day #Happy teachers day

read more
तोच घडवणारा 
तोच माफ करणारा 
गुरू हा असा 
ज्ञानाची पूजा करणारा....
MRklove... #teacher day #happy teachers day

अश्लेष माडे (प्रीत कवी )

ग्रामविकास बद्दल

read more
*सरपंच कसा असला पाहिजे? 
        1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 
2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 
3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा.  शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा  ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 
4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 
5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
#OpenPoetry कितीदा सांगावं ह्या वेड्या मनाला 
नको जावू त्या प्रेमाच्या वाटेवर पुन्हा 
जिथे तुला फक्त यातना मिळतात.., 
तर हा मन सुद्धा म्हणतो, 
भरपुर साठा आहे माझ्याकडे प्रेमाचा, 
मला प्रेम वाटून यातना मिळाल्या तरी चालेल. 
कारण, हल्ली लोकांजवळचा प्रेमाचा साठा सध्या अपुरा होत चाललाय, 
प्रेम करणारा प्रेम करतोच, 
कितीही तिरस्कार मिळाला, कितीही यातना मिळाल्या तरी..

कुठे ना कुठे, कधी ना कधी माझ्या प्रेमाची कदर करणारा 
कोणीतरी मिळेल मला.. ही आशा आहे मला.. 
(प्रीत )

Sonal Darunkar

पाऊस...

read more
पाऊस 

वारा मायेचा, वारा प्रेमाचा
पालवीला अलगद हलविणारा
ढगात आसमंत दडलेला
असतो तो पाऊस.

मनाला वेड लावणारा
हळूच ढगासोबत नेणारा
ओलाचिंब भिजविणारा
अंगाला शहारे आणणारा
बोलकं करणारा
सोबत खेळणारा
असतो तो पाऊस

मातीचा गंध दरवळणारा
झाडांना ओल करणारा
पक्षांना बोलकं करणारा
काजव्यांना कुजबुजवणारा
आयुष्याला जपणारा
असतो तो पाऊस पाऊस...

Monu Pujari

#पाऊस

read more
#DearZindagi #पाऊस

पाऊस हा मन ओल करणारा असावा
कधी मन तर कधी विचारांना भिजवणारा असावा
कधी सोबत तर कधी सोबती होणारा असावा
पाऊस हा मन ओल करणारा असावा...

लहानपणाची अलगद आठवण करुन देणारा असावा
वाहुन आलेल्या मातीचे घर करुन देणारा असावा
छोटेसे का होईना पण हसु देणारा असावा
पाऊस हा मन ओल करणारा असावा...

फुलांच्या कळ्यांना उमलणारा असावा
दारिद्र्य सर्व धुवुन टाकणारा असावा
गरिबांच्या चेहर्यावरच्या आनंदाच कारण असावा
पाऊस हा मन ओल करणारा असावा...

                                                        -मोनु पुजारी #पाऊस

Aashutosh Shinde

लौकिकार्थाने एखादा जीव जन्माला घालण्यापूरताच बाप असत नाही. एखाद्याचे पालनपोषण करणारा, रस्त्यावरच्या भटक्यांना सावली देणारा, अनाथ मुलांना मायेचं छत्र देणारा, भटक्या, जंगलातल्या प्राण्यांना जीवदान देणारा, कलेचं संगोपन करणारा, चळवळींना बळ देणारा, कलाकार घडवणारा, एखाद्या नव्या संकल्पनेला जन्म देणारा, नवा शोध लावणारा हादेखील बापच असतो. एखाद्या कामात, क्षेत्रात ज्याचा कोणी हात धरू शकत नाही, तोदेखील बापच असतो. #Quotes#father#love#everythinh

prem patil

आहे तो मित्र असाच
उगाच काळजी करणारा......
आहे तो मित्र असाच
न सांगता मनातलं समजणारा.....
आहे तो मित्र असाच
दुःखात हि हसणारा......
आहे तो मित्र असाच
माझ्या हृदयात असणारा .....
आहे तो मित्र असाच
डोळ्यातले अश्रू लपवणार....
आहे तो मित्र असाच
सदैव माझ्या सवयीवर प्रेम करणारा.....
आहे तो मित्र असाच
जन्मभर साथ देणारा.... #कविता #मित्र #मराठी #nojoto


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile