Nojoto: Largest Storytelling Platform

मराठी कविता | 100+ Best Marathi Kavita 2022

Find the Best मराठी कविता Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutमराठीकविता, हायकूमराठीकविता, मराठीकविता❤, मराठीकविताmarathi, मराठीकविता02,

  • 148 Followers
  • 8236 Stories

गोरक्ष अशोक उंबरकर

दिवाळी अन बोनस

read more
White 

घरच्यांच्या दुःखात स्वतःच 
सूख विसरून जातो.. 
कंपनीचा बोनस स्वतःला सोडून
सगळ्यांच्या वाट्याला येतो..

येणाऱ्या बोनसने साऱ्या
घराची स्वप्न रंगवतो..
स्वतःच्या स्वप्नांना नेहमी 
स्वतःच्या नजरेत च लपवतो..

दिवाळीचा बोनस हा 
भावनांचा भाऊ असतो..
बहिणीची भाऊबीज ..आईची साडी
कर्तव्याचा एक तो क्षण असतो...

©गोरक्ष अशोक उंबरकर दिवाळी अन बोनस

शब्दवेडा किशोर

#love_shayari

read more
White भेद
शब्दवेडा किशोर 
नर नारीत मांडला देह आकार वेगवेगळा
तोच चैतन्य उत्सव भिन्न रूपात नटला ||१||
तिला ठेवले चुलीला तो गेला रे शिकारीला 
पेशी एक एक असे नियमात बांधलेला  ||२||
त्याची वाढली ताकत तो रे झाला आक्रमक 
तिचे वाढले कौशल्य तिला सृजनी कौतुक  ||३||
मग झाले अवघड मूळ पदाला ते येणे 
तिच्या माथी ये गुलामी तया स्वामीत्व जन्माने  ||४||
त्याला सापडेना मूळ तिला सापडेना कुळ 
शत सहस्त्र वर्षाचा मग चाले दुष्ट खेळ   ||५||
रुप बंधन तिलाच योनी शुचिता वैभव
तो रे मात्र उधळे चौखूर नाही त्यासी कसला धरबंद ठाव ||६||

©शब्दवेडा किशोर #love_shayari

गोरक्ष अशोक उंबरकर

गाव

read more
White गावानं निरोप दिला 
तुला शहराने बोलावलं..
ऐकून घेताक्षणी मनातलं
सारं सुख हरवलं..

भिरभिरणाऱ्या मनाला
जबाबदारीनं समजावलं..
समजवताना डोळ्यांना 
पाण्याने मात्र भरवलं..

भरलेल्या डोळ्यानी
फिरून जगाकडे पाहिलं..
पाहता पाहता पाऊल 
क्षणात शहराकडे वळालं..

पाहता पाहता पाऊल 
क्षणात शहराकडे वळालं..

©गोरक्ष अशोक उंबरकर गाव

काव्यात्मक अंकुर

#निकट #निर्मळ #नाते #संबंध #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी Love #marathi #Relationship छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता

read more
निकट 
निर्मळ झाले मन
मोकळे झाले बंध
गुंतागुंतीचे नाते तोडून
निकट झाले संबंध

©काव्यात्मक अंकुर #निकट #निर्मळ #नाते 
#संबंध #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#मराठीचारोळी #Love #marathi #Relationship  छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता

Rajendrakumar Jagannath Bhosale

#Bhai_Dooj

read more
आदिनाथ अंशू आवडे सर्वांगावरती बभूत सापडे

निसर्गातील जीवसृष्टीचा अंत माझ्याच रंगात बदल होऊ संथ

नेई निरोप कबुत्र शांतीदूत रंग राखाडी शौभे आदीभूत

©Rajendrakumar Jagannath Bhosale #Bhai_Dooj

Abasaheb Patil

रब्बी हंगाम 2024-2025 पीकविमा भरण्यास सुरवात. आमच्याकडे खात्रीशीर ऑनलाइन फॉर्म भरून मिळेल. 7/12 ऑनलाइन सर्व्हिसेस, कुकटोळी आबासाहेब पाटील 91172683363 Everyone Products #followforfollowback #trendingreel #todaybestphotochallenge viralpost2024シ #trendingreelsvideo #premanandjimaharaj #viralreelschallenge

read more
Abasaheb Patil

©Abasaheb Patil रब्बी हंगाम 2024-2025 पीकविमा भरण्यास सुरवात.
आमच्याकडे खात्रीशीर ऑनलाइन फॉर्म भरून मिळेल.
7/12 ऑनलाइन सर्व्हिसेस, कुकटोळी 
आबासाहेब पाटील 
91172683363 
Everyone Products  #followforfollowback #trendingreel #todaybestphotochallenge #viralpost2024シ #trendingreelsvideo #premanandjimaharaj #viralreelschallenge

शब्दवेडा किशोर

White #अमर प्रेम
शब्दवेडा किशोर 
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते..त्याचं जरा जास्तच..तिच्यासाठी काय करु- काय नको असं त्याला झालेलं..पण त्याचा खिसा कायम फाटलेला..बिचारा..पण भलताच रोमॅटीक..तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.तिला काहीतरी गिफ्ट द्यावं असं त्याला वाटायचं पण द्यायचं काय ? कारण फाटका खिसा..शेवटी न राहवून त्याने तिला रंगीत कागदी फुलं वाढदिवसाला गिफ्ट केली..ती खुश होती..पण जास्त नाही. तशीही तिची त्याच्याकडुन फार मोठी अपेक्षा नव्हती.तो जे देत होता त्यात ती समाधानी नसतानाही समाधान मानत होती.तो सामान्य घरातलाच..जेमतेम नोकरी..भविष्यात काही करुन दाखवेल असं काहीही त्याच्यात तिला दिसत नव्हतं पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते..तिच्यापेक्षा तो जरा जास्त.. मात्र एक दिवस सगळा नुरच पलटला..तो तिला म्हणाला,"तुझ्याबरोबर आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडत कुढत जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..?सारं काय आहे तुझ्याकडे..पण तरी माझ्याबाबत सतत दुजाभाव वाटतो मला तुझ्या वागण्यातून ? त्यापेक्षा मी परदेशी जातो..पुन्हा कधी परतणार नाही..मला असं वाटतं तु मला विसरुन पुढे जावं..आजपासुन आपले मार्ग निराळे..माझा-तुझा संबंध इथंच संपला."तो कायम निघुन गेला व ही जराशीच मोडून पडली..जणु सर्व काही संपले तिच्यासाठी..दिवस सरले व तिच्या मनातली दु:खाची लाट ओसरून संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..तिने ठरवलं..त्याने पैशासाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पैसे कमवुन दाखवायचे..इतके की आपल्या पुढे सारं जग त्याला थिटं दिसलं पाहीजे.पुढे या जिद्दीने पेटली ती व झोकुन दिलं स्वतःला..कष्ट केले..मित्रांनी मदत केली.अनेक चांगले वांगले लोक भेटले व तीचे दिवस पलटून ती खुप श्रीमत झाली..स्वतःची कंपनी, पैसा,नोकरचाकर,गाड्या,मान सर्व कमवलं.विरहाच्या आगीतुन व प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन ती बाहेर पडून जगण्यासाठी धडपडली व यशस्वीही झाली..पण तरी तिच्या मनात चुटपुट कायमच होती..तो सोडुन गेल्याची..त्यानं नकारल्याची व आपल्या अविचारी वागण्याची तसेच साधेपणा व गरीबीचा अपमान केल्याची..त्याच्यावरच्या प्रेमाची जागा कधीच तिरस्काराने घेतली होती.एक दिवस ती तिच्या आलिशान गाडीतुन जात असताना बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.गाडीच्या काचेतुन बाहेर पाहते तर म्हातारं जोडपं एकाच छत्रीत भिजत उभं होतं.भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.तीने गाडी थांबवली आणि नीट पाहीलं तर ते त्याचेच आई-वडील निघाले.तीने गाडी थांबवून त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं तीला वाटत होतं पण लगेच मनातली सुडाची आग जागी झाली.त्यांनी आपली श्रींमती पाहावी..त्यांनी आपली गाडी पाहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकानं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं तीला मनोमन वाटतं होतं.त्याला धडा शिकवण्याच्या,अपमानाच्या घावांची परतफेड करण्याच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे तीला जाणवलं.ते दोघे मात्र स्मशानभुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहिले तसं ही सुद्धा गाडीतुन उतरुन त्यांच्यामागे गेली व तिथं जे काही पाहिलं त्यामुळं पूर्ण कोसळली..त्याचाच फोटो..तसाच हसरा चेहरा..कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली व तिने नकारलेली कागदांची फुलंसुद्धा तशीच..ही सुन्न झाली व धावतच कबरीकडे गेली.त्याच्या आईबाबांना विचारलं "काय झालं ते सांगा.." ते म्हणाले,"तो परदेशी कधीच गेला नाही.त्याला डॉक्टर लोकांच्या चुकीच्या उपचारामुळे कर्करोग झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते त्याच्या हातात..आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देऊन तो गेला..तू संतापुन उभी राहशील..यावर त्याचा विश्वास होता..म्हणुन त्यानं तुला सोडुन जाण्याचा नाटक केलं आणि तो दुसऱ्यासोबत पैसा व इतर गोष्टी भेटल्या म्हणून निघून गेल्याचं चित्र तुझ्यासमोर त्यानेच तर उभं केलं..आज त्याचं वर्षश्राद्ध.. म्हणून आम्ही इथं आलो".

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

#मी

read more
White #मी..
शब्दवेडा किशोर
भावबंधनाच्या या पाशातून
मिळवणार लवकर मुक्ती मी
सुखस्वप्नांची चव चाखण्या
घेईन नवा जन्म मी 
इतरांना रित्या ओंजळीने
सदा सुखं वाटली 
अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी
नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी 
नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा
असाच मनमौजी असणार मी
एक शापित जोकर ही माझी ओळख
तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी

©शब्दवेडा किशोर #मी

शब्दवेडा किशोर

#मराठी कविता

read more
White बाहेरून सदा शांत भासणारी व्यक्ती
मनात मात्र कायमंच
असंख्य अशा न उलगडल्या जाणाऱ्या
कोड्यांच्या वादळांशी एकट्यानेच
लढा देत असते..

©शब्दवेडा किशोर #मराठी कविता

Rajendrakumar Jagannath Bhosale

#happy_diwali

read more
इस्लामपूर मतदाराच्या हृदयातील 
 जयंतराव पाटील नेता लय भारी || धृ ||

 विद्याविभूषित शुध्द चारित्र्य प्रज्ञा वान 
किसान कष्टकरी जनतेमध्ये बहुमान 
 विरोधक ही देतात साहेबाना सन्मान 
 विकसित केली वळव्याची खोरी ।। ।

विजय पथाचा शिलेदार आमचा लोकनेता
 बहुजन कंठ गर्जतात तूच आमचा त्राता 
काळजातूनी हाक देते आज भारतमाता 
बहुमताने निवडून देऊ तुतारी  ll 211

कटिबद्ध हे महिलांसाठी सबलीकरण 
न्याय सत्यवादी नेता जपे स्वाभिमान
 संघर्षाने विश्वासाने समाज उद्धरण
  बहुमत देण्या करु मतदान  सारी ll ३ll
कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले 
९७६७७७७१०८

©Rajendrakumar Jagannath Bhosale #happy_diwali
loader
Home
Explore
Events
Notification
Profile