Find the Best दुष्काळ Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutदुष्काळ meaning in english, दुष्काळात तेरावा महिना in english, दुष्काळ opposite word in marathi, दुष्काळ in english, दुष्काळाची कविता,
Abhijeet Jagtap
मंत्रिपदाच्या चढा ओढीत गावच्या गुरा-ढोराकड थोड लक्ष राहुद्या.. स्वतःच घर भरण्यापेक्षा माणुसकीचा झरा वाईसा वाहुद्या.. दुष्काळाचे संकट डोकावता हवालदिल झाला माझा बळीराजा, अन्नदात्याचे रक्षण करण्या साथ सगळी देऊया.. खुर्चीसाठी भांडत बसण्यापेक्षा दुष्काळा वर थोड बोलूया.. असता मुबलक पाणी किंमत नाही मनी पाऊस पडता लांबणीवर तांडव राहतो कुनब्याच्या घरी.. ना कोणाचे ना कोणा पडले स्वतः च धोतर सावरून काई एक पसार झाले.. एकमेकांची जिरवण्यापेक्षा पाणी थोड जिरवूया.. आप्तजनात भांडत बसण्यापेक्षा .. दुष्काळावर थोड बोलूया.. दुष्काळावर मात करून मातीतून सोन पिकवल असत , अन् तिशी ओलांडलेल्या बंड्याच माझ्या दोनाच चार केलं असत.. शेतकरी म्हणून डावलेल्या पोरींना कष्टाच्या कमाई ने सोन्या चांदीने मढवल असत.. सुखाची पहाट बघण्यासाठी पाणी नियोजनाची गाठ बांधूया.. हे माझ्या सवंगड्यानो दुष्काळावर थोड बोलूया.. ©Abhijeet Jagtap #दुष्काळ#महाराष्ट्र #Drought #MaharashtraPolitics #maharashtra #village
कविराज धनंजय
लई दिसाचं रान तान्हेल जातंय करपून कोळशावाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! मिरोग संपून महिनाभर झाला न्हाई अजून हित थेंब बरसला अवस्था आमची केविलवाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! वाढवेळ झाला पेरणी उरकून बिया बी येऊ लागल्या माती उकरून आग ओकाया लागला सूर्य आगीवाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! कोठं कोठं म्हणे तू महापूर आणला आमच्याच माथी का मग हा दुष्काळ हाणला? बरसतुया तिकडं तू ढगफुटीवाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! ©कविराज धनंजय #दुष्काळ # #कविराज_धनंजय #KhulaAasman
#दुष्काळ # #कविराज_धनंजय #KhulaAasman
read moreVinod Umratkar
तुझ्या माझ्या प्रेमात आज शब्दाचा दुष्काळ पडला। कारण शब्दांपेक्षा आपण आज नजरेचा खेळ मांडला। नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे दुष्काळ... #दुष्काळ #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes अप्रतिम रचना वाचा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे दुष्काळ... #दुष्काळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes अप्रतिम रचना वाचा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreShankar Kamble
_*रितं डोळं नी आभाळ*_ *_पाणी पापणी सुकलं*_ *_ओढ कोरड मातीला*_ *_हिरवं सपान लोपलं*_ *_ताफा ढगांचा रुसला*_ *_चौमुलखी पांगयीला*_ *_हात ठेऊनी निढळी*_ *_किती आर्जवू तयाला*_ *_गेला मिरग कोरडा*_ *_काळजाला ओरखडा*_ *_कूस सूनी वांझ माती*_ *_किती उदरी गुताडा*_ *_कोंब कोवळ जळालं*_ _*भेगा दाटल्या मनांत*_ *_सुखं चांदणं तोरणं*_ *_घर राहिलं उन्हांत*_ *_मेघ सावळ्या दयाळा*_ *_आतां बरसं धुधारी*_ *_किती जीव काकुलती*_ *_वात फुलव शिवारी*_ *__सुखं पेरलं मातीत*__ *_ओटी भरीन मोत्यानी*_ *_सारा भार तुझ्यावर*_ *_माळ सजव सोन्यानी*_ ©Shankar Kamble #पाऊस #पाऊसधारा #दुष्काळ #वारा #वळीवाचापाऊस #मृग #पाऊस #dewdrops
संतोष विजय उईके
■ पावसाळा दावून पाठ पळतो बापास पावसाळा पाण्याशिवाय छळतो शेतास पावसाळा..! झालेत खूप गोळा गगनी थवे ढगांचे कोराच वाटतो हा बकवास पावसाळा..! दुष्काळ पावसाचा शेतात नेमका हा अन् चिंब चिंब करतो शहरास पावसाळा..! शेतातल्या पिकाला वाहून पूर नेतो नजरेत मग बळीच्या नापास पावसाळा..! देतो रुजू बियाणे मातीत वावराच्या.. मग मारतो दडी का हमखास पावसाळा..! दुष्काळ आज ओला हा कोरडा उद्याला करतो असा तसाही उपहास पावसाळा..! आहेस तूच त्याचा आधार पावसा रे देतो सुहास्य अंती कुणब्यास पावसाळा..! ©संतोषकुमार विजय उईके #पावसाळा
Sarita Sawant
रिमझिम रिमझिम बरसत तो हाहाकार माजवतो चिंबचिंब भिजवुनी जातो कुठे ओल्याचिंब सुखाच्या सरी बरसवतो तर कुठे दुःखाच्या लहरी कोसळवतो कधीतरी वाटतं बरसणाऱ्यालाही कळावं कधी,कुठे अन किती बरसावं काळ्या मातीत मोत्याचा दाण पिकांव शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं गूढ संपावं लेकरांचा त्यांच्या आधार कधी न सुटावा लेकी सुनांना त्यांच्या कधी ना यावं वैधव्य बरसणाऱ्याने थोडी दया त्यांच्यावरही करावी राबतो तो रात्रंदिवस, त्याच्या हक्काचा न्याय त्याला मिळावा घराटं त्याचंही आनंदानं बहराव कोरडं रान त्याच्या स्वप्नीही न दिसावं बरसणाऱ्याला थोडं तरी समजावं शेतात घाम गाळून भरतो सर्वांचं पोट रणरणत्या उन्हात त्याने ना फिरावं आभाळाकडे आस लावून वाट पाहायची वेळ त्यावर ना यावी सुख समाधानी आयुष्य त्याचही व्हावं आनंदाचं झाड त्याच्या अंगणी वाढावं बरसणाऱ्याला कळावं कधी,कुठे अन किती बरसावं निसर्गा पुढे आपण आहोत हतबल सारे मदतीचे दोन हात आपणही सरकवावे उपकाराचे दान फेडता आले तर फेडावे बरसणाऱ्याला कळावे कधी, कुठे अन किती बरसावें. सरिता सावंत #पाऊस #शेतकरी#दुष्काळ #मराठीकविता
#पाऊस #शेतकरी#दुष्काळ #मराठीकविता
read moreShashikant Kendre
आर्चीला किती मार्क पडले आहे दिवसभर दाखवतील पण मराठवाड्यांत पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या आया-बहिणीची अवस्था एकदाही दाखवणार नाही #मिडिया रे #मीडिया #मराठवाडा #दुष्काळ #पाणी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited