Nojoto: Largest Storytelling Platform

Best सरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सरी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutसरी meaning in english, सरी meaning in marathi, सरीवर सर, सरी meaning, सरी,

  • 5 Followers
  • 5 Stories

Shankar kamble

*दशाक्षरी काव्यरचना.* 
 *मेघ दाटले....* 
 *मेघ दाटले काजळ काळे* 
 *मनी हर्षाचे झुले उमाळे* 
 *मोर पिसाचे फुलले डोळे* 
 *मातीचाही गंध दरवळे* 

 *वाट पाहिली चातकापरी* 
 *अलवार येती मृगसरी* 
 *तनां-मनां या भिडल्या धारा* 
 *सूर अवचित ओठावरी* 

 *थेंब नाचे टपटपणारे* 
 *खळखळ नादे जळभारे* 
 *अवखळ चंचल हे वारे* 
 *सृजनाला ये उधाण सारे* 

 *बीज अंकुरे धरणी पोटी* 
 *येती जुळूनी मीलन गाठी* 
 *साज मखमली झऱ्या काठी* 
 *इंद्रधनू मग येई भेटी* 

 *पानोपानी छटा उमटल्या* 
 *गर्द पोपटी हिरव्या ओल्या* 
 *बहरून आल्या नभांगणी* 
 *घन सावळ्या हरिणी न्हाल्या*

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#पाऊसाततुझीआठवण 
#पाऊस_पडून_गेल्यावर 
#पाऊसाला 
#थेंब 
#थेंबाचे 
#सरी

Asha...#anu

विसरून भान...
होउन लहान...
सरीच्यां  सुरात छान...
बेधुंद होऊन भिजा रे....!!!

नको बंधन मनाला...
विसरा या जगाला....
आनंद हा मोलाचा...
बेधुंद होऊन ह्या रे...!!!

निर्मल सरीत..
होईल निर्मल मन...
नका गमवू हे अमूल्य क्षण...
बेधुंद होऊन नाचा रे..!!! #पाऊस 
#सरी

Shilpa ek Shaayaraa

#sari #TpWritting #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 #सरी प्राजक्ताच्या तीच्या दारी धकधक असे माझ्या ऊरी सुख साता जन्माचे रे लाभावे देवा माझ्या परी #Shilpa

read more
सरी प्राजक्ताच्या तीच्या दारी
 धकधक असे माझ्या ऊरी
सुख साता जन्माचे रे
लाभावे देवा माझ्या परी
#Shilpa #Sari #TpWritting #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
#सरी प्राजक्ताच्या तीच्या दारी
 धकधक असे माझ्या ऊरी
सुख साता जन्माचे रे
लाभावे देवा माझ्या परी
#Shilpa

रोशन पाटील 7066644485

सदर कविता माझी नसुन ती त्या कवियत्रीच्या सांगण्यावरून मी एडीट केलीय, कवितेबाबतचे सर्व हक्क कवीयत्री कडे राखीव. . . 🙏🙏😊

read more
ये गं ये गं सरी

              ये गं ये गं सरी
              ऋतु पावसाळा
              मृगसरीं कोसळून
              बुडू दे माझी शाळा

             चार दिवस मिळून सुटी
             घरी ठेव मारकुट्या बाईंना
             गृहपाठ मी केला नाही
             भिजवून टाक गुरुजींना

               पीटीच्या सरांना असु दे 
               उघडीप पावसापासून 
               खेळू नाचू गाऊ आम्ही 
               दे सुट्टी अभ्यासातून

             शाळेत येऊ दे रोज
             कला नि संगीत सर
               काढू चित्र करू गायन
             संगीताचे गावू सप्तस्वर

           ©  सौ.भारती सावंत सदर कविता माझी नसुन ती त्या कवियत्रीच्या सांगण्यावरून मी एडीट केलीय, कवितेबाबतचे सर्व हक्क कवीयत्री कडे राखीव. . . 
 🙏🙏😊

सुरज रतन जगताप

 #सरी #marathi #love #charolya


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile