Nojoto: Largest Storytelling Platform

Best आषाढी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आषाढी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

शब्दवेडा किशोर

#आषाढी सरल्यावर....
आषाढी सरल्यावर रिती होई ही पंढरी
अन् ओस पडे ते विठुरायाचं रे राऊळ
अशी एकाकी का व्हावी एकादशी ll१ll
मग नसे तयाठायी हरीनामाचं गुंजन
नसे मग तिथे टाळचिपळीचा ब्रम्हवेणुनाद
घरोघरी परतसे तेव्हा संचिताचे सुख घेऊनी
अमुचा तो राजीयांचा राजा वारकरी ll२ll
तुझी लीला म्हणु की म्हणु देवा ही माझी सत्वपरिक्षा
सोपान हा दुजा ज्ञानदिप जणु नवा लावतसे
सदा तुझ्या आत्मतत्वाचा रे पांडुरंगा ll३ll
तुझ्या लेकरात अन् तुझ्यात जाणुन-बुजुन तु ठेवी रे अंतर
अंतरीचा विठोबा आम्हास गवसण्या ll४ll
फिरूनी नव्यानं भेट होई जव तुझी आम्हा विठुराया
प्रत्येक भेटीत तु तुझे विश्वस्वरूप ते सावळे दावतसे ll५ll
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझा_विठोबा

Ramdas Narwade

भंक्तांची आषाढी 

कोरोना मुळे बंद आहे पांडुरंगाची वारी 
टाळ मुर्दांगात दुमदुमत नाही ती पंढरी 
कमी असेल हर्षउल्हासित सहकीर्तनाची 
विठू नामस्मरणाची लाखो मधुर वाणी 
हरीभक्त पारायण वैष्णवांची गोड गाणी 

विठूनामाचा गजर करणारे वारकरी 
माय बाप विठ्ठल चित्ती ध्यानी मनी 
घरीच मनोभावे साजरी करे भक्तांची आषाढी 
भक्तीच्या जोरावर पंढरीनाथा साद घाली 
विटेवरचे पाऊल उचलून भक्त दर्शना येती माऊली  
दर्शन भक्ता देउनी धन्य करी महा एकादशी 

माय विठ्ठल...बाप विठ्ठल.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

®रामदास नरवाडे #आषाढी #एकादशी #विठ्ठल #पंढरपूर #वारी 
#corona #lockdown

Mukul Mukund Khodey; कर्मकवी...

#विठू_माऊली तू; माऊली जगाची... हरी ॐ #विठ्ठल_रखुमाई... #आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..🌺🙏🏼😇 https://m.starmakerstudios.com/d/playrecording?app=sm&from_user_id=5629499488717157&is_convert=true&recordingId=5629499350871964&share_type=more

read more
#विठू_माऊली तू; माऊली जगाची...

हरी ॐ #विठ्ठल_रखुमाई...

#आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..🌺🙏🏼😇

https://m.starmakerstudios.com/d/playrecording?app=sm&from_user_id=5629499488717157&is_convert=true&recordingId=5629499350871964&share_type=more

vijay jagtap

चंद्रभागेच्या किनारी वारकरी न्हाहली,
आपल्या पाप -पुण्य तुन मोकळी जाहली,
विठूच्या दर्शनाने त्यांना पंढरी पावली,
सगळीकडे एकच जयघोष माझा विठू माऊली...

सगळ्यांवर आहे तुझी छत्र छाया,
तुही लावलीस तुझ्या लेकरांवर माया,
मस्तक ठेवितो मी तुझ्या पाया,
तूच आमचा माय-बाप,तूच आमचा राया...

ज्ञानेश्वरांना दिलास विद्येचा भंडार,
तुकारामांना घडवलेस देऊन अंकुशाचा मार,
इतरांनाही दिलास तू आयुष्याचा सार,
या मातीतून घडलेल्या शरीराचा, तूच आहेस कुंभार...

गजर होत आहे तुझ्या अभंगाचा,
लोकांवरही प्रभाव आहे तुझ्या भारुडांचा,
स्वामी आहेस तू तिन्ही युगांचा,
उठून दिसतोस तू सावळ्या रंगाचा...

पालखी सोबत निघते सगळ्यांची वारी,🚩
घोड्याची पण असते सोबत सवारी,🐎
गोल रिंगणाची तर बातच आहे न्यारी,⭕
सगळ्यांच्या मुखात फक्त पांडुरंग हरी...🙏 माझा विठू माऊली #विज #VJ #माऊली #आषाढी #विठ्ठल #हरी #शब्द_लहरी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile