Find the Best एकटेपणा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutएकटेपणा quotes, एकटेपणा शायरी, एकटेपणा मराठी कविता, एकटेपणा वर कविता, एकटेपणा कविता,
Rashmi Hule
कळतो आता काय अर्थ मौनातला सुकून गेला नात्यांचा ओलावा जीवनातला... होती धडपड सारी जपण्यास नातीगोती उरलो शेवटी एकटाच अन् हरवलेली नाती... मौन का अर्थ अब समझ आ रहा है. रीश्तों में जो नमी थी वो सुख गयी है. बहुत जद्दोजहद की रीश्तों को बनाए रखने की, लेकिन अब सिर्फ मै अकेला हूँ. और रीश्ते गुम हो गये है सब. #हरवलेलीनाती#एकटेपणा #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
मौन का अर्थ अब समझ आ रहा है. रीश्तों में जो नमी थी वो सुख गयी है. बहुत जद्दोजहद की रीश्तों को बनाए रखने की, लेकिन अब सिर्फ मै अकेला हूँ. और रीश्ते गुम हो गये है सब. #हरवलेलीनाती#एकटेपणा #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
read morevaishnavi chingale
एक वेळ अशी येते कोणीच सोबत नसतं... आपण एकटे असतो... ऐकटयानेच सोसावं लागत ... अन एकट्यानेच पुन्हा चालायचं असतं.... #वसू #मनातलंमाझ्या #मनातलंवादळ #मनातल्यागोष्टी #एकान्त #एकाकी #एकटेपणा
#वसू #मनातलंमाझ्या #मनातलंवादळ #मनातल्यागोष्टी #एकान्त #एकाकी #एकटेपणा
read morevaishnavi chingale
जो मनुष्य आपल्या मनाची वेदना, मनातील दुःख स्पष्टपणे सांगू शकत नाही, त्याला अधिक राग येत असतो. #राग #वेदना #दुखः #एकटेपणा #एकाकीपणाआणिएकांत
#राग #वेदना #दुखः #एकटेपणा #एकाकीपणाआणिएकांत
read morepooja d
देवा, आजच्या दिनी द्यायचं असेल काही तर, एखादं हक्काचं माणूस दे, ज्याला माझं हसणं, रडणं, अस्वस्थता दिसेल।। अस कुणीतरी दे, ज्याचा हात सदैव माझ्या डोक्यावर असेल, छत म्हणून ।। #एकटेपणा
pooja d
एकटे पणात पुन्हा नाही रमायचं मला प्रत्येक वळणावर तू सोबत देशील ना मला ?? #एकटेपणा #सोबत_तुझी #मराठीलेखणी
#एकटेपणा #सोबत_तुझी #मराठीलेखणी
read morepooja d
आजकाल खूप एकटेपणा जाणवतोय रे, भरल्या गर्दीतही एकट असल्याचं भासतंय रे...... जीवनात एक पोकळी निर्माण झालीय ती भरून निघणार कशी, याचाच विचार करतीय...... तुला दिसत नाही का रे माझं एकट असणं तुला ऐकायला येत नाही का शब्द झालेले मुके...... अस वाटतंय तुझ्या सोबत घडाघडा बोलावं पण, तुझ्या माझ्यातली खोल दरी मध्ये येते अन, सगळं मनातच ठेवावं वाटत....... #एकटेपणा #मनातील_वादळ #मनातील_भावना
#एकटेपणा #मनातील_वादळ #मनातील_भावना
read moreशब्दवेडा किशोर
आयुष्याच्या प्रत्येक पाऊली एक नवा धडा मी शिकतो आहे दुःख क्षणाचे स्वागत करताना अन् सतत जनमाणसात जगताना मी खरंच मनातून हसलो आहे कितीक पाहिली रंगीत स्वप्ने मी अन् आहेत कितीतरी अजूनही माझ्या मनीच्या सुप्त आशा त्या जगताकडे जाता जाता वाट नेहमीच मी चुकलो आहे बालपणाच्या गोष्टीत ऐकला होता एक परी राज्याचा देश मी आज त्याच देशीच्या वेशीवरी येता मी किती जास्त थकलो आहे महाद्वार बंद अन चोख पहारा तटाबाहेर अंधार निवारा सुप्रभातीचे पहिले कोवळे किरण येता मी नेहमी तयापुढे झुकलो आहे त्या देशाची रमणीय कहाणी गाऊन सांगे पक्षी गाणी त्या दुनियेची अनोखी अनोळखी ती सफर कराया मी कधीचा बसलो आहे जीवन माझे व्यर्थ गेले अजूनही तिला न डोळ्यांनी पाहिले आहे कधी करील का ती मनधरणी माझी मी तर कधीचा रुसलो आहे गोड बोलणे लडिवाळ ते हसणे अन् नयनांचे ते विभ्रम देखणे अशा बहुरूप्यांचे भेद जाणण्या मी नेहमीच आजवर फसलो आहे अन् जनमाणसात राहूनी सतत मी आजही माणसांच्या गर्दीतला एक शापीत जोकर हीच माझी नित्य ओळख मोठ्या अभिमानानं जपतो आहे आयुष्याचा प्रत्येक पाऊली एक नवा धडा मी शिकतो आहे ©शब्दवेडा किशोर #एकटेपणा
शब्दवेडा किशोर
एकांत.. ज्याला हवाय त्याला न मिळणारा अन् ज्याला नकोय त्याची साथ कधीही न सोडणारा.. एकांत.. नदीकिनारी,निसर्गाच्या सानिध्यात हवाहवासा वाटणारा अन् रात्रीच्या वेळी कुत्र्याच्या रडण्याप्रमाणे काळजात घर करणारा.. एकांत.. मनाला वाऱ्याच्या हिंदोळ्यावर अलगद डोलावणारा अन् खवळलेल्या समुद्रात त्याच मनाला हेलकावे घ्यायला लावणारा.. एकांत.. आपणहून सुखाच्या गर्तेत गुंग होऊ पाहणारा अन् त्याच चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा.. एकांत.. पक्ष्यांचा चिवचिवाट मधुर गाण्यासारखा भासणारा अन् तोच चिवचिवाट कधीकधी जीवन किती बेसूर बनवतो याची जाणीव करून देणारा.. एकांत.. येणाऱ्या आयुष्याकडे आशेने पाहायला शिकवणारा अन् आयुष्यभर होऊन गेलेल्या चुकांचा शोक करत बसणारा.. एकांत.. चेहऱ्यावर हास्याची रेघ ओढणारा अन् तीच रेघ हळूच आसवांनी मिटवणारा.. एकांत.. निर्जीव जीवाला जगणं शिकवणारा अन् जगणाऱ्याला शांततेत आतल्या आत मारणारा.. एकांत.. ©शब्दवेडा किशोर #एकटेपणा
Jayesh Sawant
स्वतःला एकटं करण्यामागे आपल्या स्वतःचा हातभार जास्त असतो #स्वतः #एकटेपणा