Nojoto: Largest Storytelling Platform

Best थेंब Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best थेंब Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutथेंब meaning in hindi, अश्रूंचा एक थेंब, थेंब आज हा पाण्याचा कविता lyrics, थेंबा थेंबा न लावणी, थेंब आज हा पाण्याचा,

  • 10 Followers
  • 10 Stories

Kunal Salve

तो येईल मी होऊन एकदा त्याला भेटशील 
चेहरा नसेल,बोलणं नसेल फक्त मनसोक्त भिजून तु
त्याला थेंब थेंब तुझ्यातून ओघळून देशील ! #pc_google 
#पाऊस 
#मी 
#थेंब

Rishikesh Malgaonkar

ढगांना थेंब जड झाले... #ढग #थेंब #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. असचं लिहीत राहा आणि मजेत राहा.😍 #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आई

read more
आभाळ आता काळे झाले
काळ्या आभाळाला पाहून ह्या
मला ते आईवीणा 
माझे जीवन वाटले  ढगांना थेंब जड झाले...
#ढग #थेंब 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
असचं लिहीत राहा आणि मजेत राहा.😍 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #आई

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखिकानों वर दिलेल्या ओळीतुन कुठल्याही शब्दावरुन तुम्ही लिहु शकता किंवा त्याच्या समोर पण तुम्ही लिहु शकता. आजचा विषय आहे ढगांना थेंब जड झाले... #ढग #थेंब #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. असचं लिहीत राहा आणि मजेत राहा.😍 #YourQuoteAndMine

read more
निसटले तेथून आणि
आपल्या अंगणी येऊन पडले,
जसे नयनांनी अश्रू जड होतात
तसेस ढगांना थेंब जड झाले. सुप्रभात लेखक आणि लेखिकानों
वर दिलेल्या ओळीतुन कुठल्याही शब्दावरुन तुम्ही लिहु शकता किंवा त्याच्या समोर पण तुम्ही लिहु शकता.
आजचा विषय आहे
ढगांना थेंब जड झाले...
#ढग #थेंब 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
असचं लिहीत राहा आणि मजेत राहा.😍 #YourQuoteAndMine

अत्रंगी रे...!!!

Shankar kamble

*दशाक्षरी काव्यरचना.* 
 *मेघ दाटले....* 
 *मेघ दाटले काजळ काळे* 
 *मनी हर्षाचे झुले उमाळे* 
 *मोर पिसाचे फुलले डोळे* 
 *मातीचाही गंध दरवळे* 

 *वाट पाहिली चातकापरी* 
 *अलवार येती मृगसरी* 
 *तनां-मनां या भिडल्या धारा* 
 *सूर अवचित ओठावरी* 

 *थेंब नाचे टपटपणारे* 
 *खळखळ नादे जळभारे* 
 *अवखळ चंचल हे वारे* 
 *सृजनाला ये उधाण सारे* 

 *बीज अंकुरे धरणी पोटी* 
 *येती जुळूनी मीलन गाठी* 
 *साज मखमली झऱ्या काठी* 
 *इंद्रधनू मग येई भेटी* 

 *पानोपानी छटा उमटल्या* 
 *गर्द पोपटी हिरव्या ओल्या* 
 *बहरून आल्या नभांगणी* 
 *घन सावळ्या हरिणी न्हाल्या*

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#पाऊसाततुझीआठवण 
#पाऊस_पडून_गेल्यावर 
#पाऊसाला 
#थेंब 
#थेंबाचे 
#सरी

FalgunWords

#leaf

read more
#थेंब
मातीचा सुवास पेटलायं, 
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..

त्याचा पाऊस, धरेस आधार,
माझा पाऊस, मलाच भार..
एक पाणी, पडून गोड धार,
एक पाणी, पडून खारे क्षार..
कुठल्या धारेत भीजायचं  मी,
कि अंग क्षारेत सुखवायचं मी..
सांग मला सत्वर, प्रश्नाचं ह्या उत्तर..
थेंब अजून उदास पडलायं,
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..

त्याचं बरसणं, बूलंद दणक्यात,
माझं बरसणं, मंद हुंदक्यात..
त्याच्या संगे विजेची लय कडकडणारी,
माझ्या संगे मनाची सय तडफडणारी.. 
त्याचं कोसळनं, पूराचे पाट,
माझ्या पूराची, छोटीशी वाट..
त्याच्या सप्तरंगाचा, नभी मुक्तछंदाचा..
इंद्रधनु तो झकास पडलायं..
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..

त्याच्या गाण्यांत, चिवचिवाट वणातला,
माझ्या गाण्यांत, शुकशुकाट मनातला..
त्याचं संगीत, जणु सुरांचा मळा,
माझा येथ, अजून कोरडा गळा..
खुलवेल कळी, कोण जाणे कोण वेळी..
प्रत्येक थेंब खास पडलायं,
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..
मातीचा सुवास पेटलायं, 
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..                              :- "फाल्गुन." #leaf

Priyanka

Kiss Day quotes  ओठ माझे तुझ्या ओठांवर येऊन विसावतात,
ते क्षण एकांतात आठवले तरी लाजवतात☺️
काही थेंब तिच्या ओठांवर थांबले ,
क्षणभर मी पाहतच राहिलो;
आणि, आयुष्यात पहिल्यांदा 
थेंब व्हावे से वाटले 🥰
थेंब होऊन तुझ्या सोबत जगताना 
क्षण सारे फुलून आले,
तुझ्या सोबत सांगड घालताना 
ढग ही वाहून आले😘

 - प्रियांका ओव्हाळ #poem #थेंब#

Vrishali G

....

read more
थेंब थेंब पाण्याचे करतात आठवणी जाग्या ..
आपल्या सहवासाच्या 
     आपल्या मैत्रीच्या 
               आपल्या प्रीतीच्या ❤ 
                          आपल्या एकांताच्या 
                        आणि आता 
                                 आपल्या  
                                         विरहाच्या .. ....

Apritam

read more
नातं जुळतं सहजपणे,
नातं टिकतं सहजपणे,
नातं तुटतं सहजपणे,
परंतु तुटल्यानंतर
डोळ्यातील थेंब ही गळतात
सहजपणे, ... 

औघळलेले थेंब पुसता येतात सहजपणे,
मगआठवणी का जात
नाहीतसहजपणे,
कारण ...
त्या कोरलेल्या असतात मनामध्ये
नकळतपणे....

akshu


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile