Nojoto: Largest Storytelling Platform

Best निरोप Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निरोप Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutनिरोप समारंभ शायरी मराठी, 'निरोप समारंभ शायरी', शिक्षकांचा निरोप समारंभ शायरी, निरोप समारंभ मराठी कविता, निरोप घेताना कविता,

  • 16 Followers
  • 16 Stories

शब्दवेडा किशोर

#sad_shayari जीवन प्रवास

read more
White #निरोप घेतो जगा....
शब्दवेडा किशोर 
निरोप घेतो जगा आता आज्ञा असावी
चुकले हुकले काही माझे त्याची क्षमा असावी......
वेळ भरली माझी आता माझा अंतःकाळ जवळ आला
हसतच मज न्याया बघा तो काळ दारी उभा राहीला......
आजवर खुप छळले मी तुम्हा सर्वांना
मेल्यावरही शाप देऊ नका माझ्या आत्माला ही विनंती तुम्हाला......
शेवट माझा गोड व्हावा ही इच्छा तुम्ही धरा
नवा जन्म मज चांगला मिळो ही देवास कामना करा......
या जन्मी तुम्हा कुणासच मी सुख नाही कधी दिले
हे कर्ज आहे सदा माझ्या डोई
घेईन नवा जन्म फेडेन तुमचं कर्ज होईन त्यातून उतराई......
शापीत हा जन्म गेला त्याचा राग नाही मला
घेऊनी नवा जन्म फेडण्या तुमचे कर्ज
तो सर्वसुखे जगण्याचा ध्यास जिवासी लागला......

©शब्दवेडा किशोर #sad_shayari  जीवन प्रवास

Dileep Bhope

Kunal Salve

काही नसतं रे प्रेम वगैरे बोलून 
आज तिने निरोप घेतलाय
मी ही मनाला बोललो मग समजतंय का 
आज तिने निरोप घेतलाय  #निरोप 
#marathiquotes 
#prem 
#friendship

Ganesh Shinde

काय असते सांग निरोपाचे बोलणे,
'भेटू पुन्हा' असे उगाच सांगणे,
की भेटीची आठवण सोबत घेणे,
की सारे काही डोळ्यात साठवणे,
खोल खोल मनात जपून ठेवणे। #निरोप #समुद्र #yq_ gns

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं, कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे. तर मग आज निरोप कविता किंवा ओळी बाप्पाच्या नावी. चला तर मग लिहा #निरोपबाप्पाला #Collab करा #बाप्पा #निरोप #गणेशा

read more
मंदिरात येतो देवा आम्ही तुझ्या दर्शनाला 
वर्षातून एकदाच येतोस बाप्पा घरी भेटायला
दहा दिवस नसे उसंत आमच्या जिवाला
निरोप दिल्यानंतर तुला , ऊठे घर हे खायला
वाट पाहातो देवा लवकर या पुढच्या वर्षाला  प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं,
कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे.
तर मग आज निरोप कविता किंवा ओळी बाप्पाच्या नावी.
चला तर मग लिहा 
#निरोपबाप्पाला
#collab करा
#बाप्पा #निरोप #गणेशा

अल्पेश सोलकर

सगळ्या गोष्टी मला सोप्या वाटतात... पण निरोप घेणं खूप कठीण जात.. © अल्पेश सोलकर #निरोप

read more
सगळ्या गोष्टी मला
सोप्या वाटतात...
पण निरोप घेणं
खूप कठीण जात.. सगळ्या गोष्टी मला
सोप्या वाटतात...
पण निरोप घेणं
 खूप कठीण जात..
© अल्पेश सोलकर
#निरोप

Pratik Patil Patu

निरोप.... मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांसाठी #निरोप 12-7-2019

read more
निरोप....

मी चाललो आता
आनंदाने निरोप द्या
संगे मात्र माझ्या
आशीर्वाद असू द्या

मी येतो आता
चुका माफ असू द्या
संगे मात्र माझ्या
प्रेमाची थाप असू द्या

सर्वांना माझा नमस्कार
देवा कर चमत्कार
मी कुठे गेलो तरी
मला, कोणीच नाही विसरणार

पत्तू होता
पत्तू आहे
आणि पत्तू राहणार
सदैव तुमच्या मनात ( ही अपेक्षा)

मित्रांनो, तुम्ही सर्व आहात
मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा आहात
नातेवाईकांनो आणि कुटुंबियांनो
तुम्ही सर्व राहणार

माझ्याच सोबत
माझ्या मनात

जय जिनेन्द्र निरोप....

मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांसाठी
#निरोप 
#12-7-2019

Kaviraj

माझा निरोप #kavita #kaviraj #kavi #निरोप

read more

Rupali Jadhav

Shubhangi Sutar

शेवटाचा श्र्वास हा तुझ्या
कुशीत घ्यायच आहे
हा हात हातात असला पाहिजे
हे डोळे फक्त तुझ्याच कडे
रोखून ठेवायचे आहेत
आणि तू पणं माझ्याकडचं बघ...
तेव्हा मला काही म्हणायचं नाही हां
किती बघत आहे बास कर की
माझी शेवटची कविता 
देखील तुझ्याचसाठी असेल.
माझा हा शेवटचा श्र्वास देखील
तुझं नावं घेण्यासाठीच धडपडतील
शेवटी या देहाच्या राखेला देखील
तुझाच स्पर्श असू दे तेवढीच
ती आग शांत होईल.
तुझ्या स्पर्शाने ती पुन्हा 
एकदा शहारेल पणं
हात मात्र एकदमच सोडू नको हा
हळू हळू नकळतचं सोड
म्हणजे हा निरोप जड होणार नाही
सख्या अश्रु ढाळत बसू नकोस
मला तुझी कमजोरी न बनवता
शक्ती ताकद भक्ती बनव आणि 
हा प्रवास संपला की लवकर ये
मी तुझ्या वाटेकडे 
डोळे लावून बसणार आहे 
हे मात्र विसरू नकोस हां
चल जाते आता....

©Shubhangi Sutar #निरोप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile