Find the Best कधी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutकधीच in english translation, कधी meaning in english, कधी in english, थांबला न सूर्य कधी, कधीही नाश न पावणारे,
Mahendra Dhivare
कधी कधी मनाला दुर..... अस घेवुन जाव एकांतात जावून हसवाव स्वतःसाठी स्वतःला रमवाव हरवलेले दिवस आठवाव. कुठ तरी चुकत जीवनाचा निर्णय म्हणुन मनातल्या भावना घेत लेखणीचा निर्णय. ©Mahendra Dhivare #कधी कधी मनाला दुर..... अस घेवुन जाव एकांतात जावून हसवाव
#कधी कधी मनाला दुर..... अस घेवुन जाव एकांतात जावून हसवाव
read moreSujata Darekar
कधी हरवली वाट धुक्यात कधी हरवली कुशीत रे गंध फुलांचा दरवळ होऊन निजले स्वप्न उशीत रे निळ्याशार डोळ्यांमधली शाई सरसर गळू लागली अन् स्पंदनांचे वेग कसे ते राहिले ना मुशीत रे कुजबूज झाली अधरांची गजबजले हे हृदय वेडे आनंदल्या आज असंख्य मनभावना खुशीत रे रगडता हे देह ओले वसंताची ती रम्य पहाट प्रसन्न झुलती वादळ वारे राहिले ना दुषीत रे स्वच्छ भोर निरभ्र नभी चांदण्या या खुलू लागल्या आलावरच्या खळीमधूनी सांगून गेल्या गुपीत रे सुप्रभात मित्रानों आजचा नवीन विषय आहे कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ, कधी हरवली वाट... #कधी #हरवली #वाट #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
gauri kulkarni
कधी कधी मी मांडते जुन्या आठवणींचा पसारा हरवते काही क्षण मिरवते काही क्षण कधी कधी उलगडतो पट अलवार जपलेल्या नात्यांचा गुंत्यात गुंतते नकळत मन सापडतात मग सोनेरी पान कधी कधी झेपत नाही अपेक्षांचं ओझं लुटुपुटूच्या भांडणात होतंच की तुझं-माझं अश्रूंचा बांध फुटला की आवरता आवरत नाही अन् अबोल्यातुन काही सावरता सावरत नाही कधी कधी मात्र आकाश निरभ्र असतं स्वच्छशा मनाच्या तळाशी प्रेमच साठलेलं दिसतं हळुवार हातांनी तू त्या प्रेमाला कुरूवाळतोस स्पर्शाच्या भाषेतून सगळं दुःख विरघळून टाकतोस कधी कधी भेटतो आपण अनोळखी होऊन अन् वळणावरून चालताना जातो एकमेकांत हरवून तुझं माझं अस्तित्व आता वेगळं उरत नाही सुखं दुःख वाटून घेताना आयुष्य आपल्याला पुरत नाही #कधी कधी
#कधी कधी
read morepooja d
मी हाक देईल तू साद दे या 'राणू' ला शब्दांचा आधार दे ।। मी हरवले तर मला शोधायला ये हरवणार नाही म्हणून गाठ बांधून घे ।। कधी रडलेच तर मला जवळ घे तुझ्या मिठीत सामावून घे ।। #प्रेमकविता #कधी #मराठीकविता #yqtaai
#प्रेमकविता #कधी #मराठीकविता #yqtaai
read moreDhananjay_4_You
कधी कधी भाग्य देखील संकटाचं रूप घेऊन येतं ©Dhananjay_4_You #desert #भाग्य #संकट #रुप #भाग्योदय #कधी #कधीकधी
Aarya Rathod
किती कष्टानि लहान हुन मोठ केलाय ताई तुला... तुझ्या मनात दुःखाच डोंगर साचलाय सांगना तू ,ह्या तुझ्या भावाला... किती कष्टानि लहान हुन मोठ केलाय ताई तुला... तुझ्या मनात दुःखाच डोंगर साचलाय सांगना तू ,ह्या तुझ्या भावाला... मला तुझी खुप आठवण येत आहे ताई कधी येशील तू राखी बांधायला... मला तुझी खुप आठवण येत आहे ताई कधी येशील तू राखी बांधायला... 😢😢😢😢😢 ©Aarya Rathod #कधी येशील ताई राखी #कधी बांधायला
Dr Sushil
🌿🍂🌿🍂🌿🍂🌿 *का कधी ?* का मनात काहूर दाटतो? गर्दीतही एकटेपणा वाटतो करावे मन मोकळ जिथं तो ही परकेपणात भेटतो कधी प्रश्नांचा बाजार भरतो कधी भावनांचा बांध फुटतो भुतकाळ वर्तमानास जाळतो अन् भविष्याला अंधार गाठतो समाधानाने जगावं आयुष्य रोज नवीन प्रश्न मनात पेटतो स्वप्नांचा पाठलाग करताना सुंदर क्षण का कधी सुटतो? सुख-दु:खा च्या वादळात नव्या स्वप्नाने रोज उठतो... ✍️ *डॉ.सुशिल सातपुते* गातेगांव लातुर 🍂🍂🍂🍂🌿🌿🌿 9405733112 ©Dr Sushil #marathi #कविता #का #कधी #Sushil #Satpute
omprakash panchal
कधी कधी वाटते स्वतःवरच रागवावे.. तर कधी वाटते स्वतःवरच रुसावे.. कधी वाटते ललकारावे साऱ्या जगास .. तर कधी वाटते आपण हून लढावे स्व:तास.. कधी वाटते वाट पाहत राहावे .. तर कधी वाटते आता आपण हून निघावे.. - ओमप्रकाश पांचाळ #कधी वाटते
#कधी वाटते
read moreDr. BHAGYASHRI
मासिक पाळी.... आज नेहाची आई , तिला ओरडताना दिसली , इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ देवाला तर नकोच शिवू .... तशी नेहाही वेगळीच वागत होती ...कधी रडत होती तर कधी चिडत होती...... खूप वेळच्या अबोल्यानंतर बोलली नेहा शेवटी आता झाली मी मोठी ....नाही खेळणार आळी- मिळी गुपचिळी मला आली मासिक पाळी .... मग माझ्याच मनात चालू झालं विचारांचं युद्ध शुद्ध असलेलं रक्त कस होत अशुद्ध जर रक्तच असेल अशुद्ध तर कसे जन्मले फुले ,गांधी,आंबेडकर गौतम बुद्ध विचारच असतील अशुद्ध तर काय करणार ही तर निसर्गाची देणगी रक्त तर वाहणार .... _sensitive_ink_of bhagyashree with kajal menstrul hygiene
menstrul hygiene
read more