Find the Best येणार Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutयेणार का नाम, येणार का नाही, लिहिता वाचता न येणारा एक शब्द, येणार का, लिहिता वाचता न येणारी व्यक्ती,
Balaji Kale
सतवण्याचा मला तुझ्यात तो छंद नाही येणार ... वचन दे आता फोन तुझा बंद नाही येणार... सिमेंट च्या अंगणाची मी हाऊस नाही ठेवत, पावसाळ्यात मातीचा तो गंध नाही येणार..... प्रेम प्रेयसीला थोड उशिराच सांगावं, पुन्हा अगोदर सारखा आनंद नाही येणार... it's bk poetry.
it's bk poetry.
read moreकृष्णभक्ती...
ज्या प्रमाणे नापीक दिसणाऱ्या जमिनीत कधीतरी काहीतरी उगविणार या दृष्टीने जर पेरणी केली तर कालांतराने नक्कीच त्या जमिनीत सुपीकता येणार , त्याप्रमाणे कोणत्याही क्रियेत सकारात्मक दृष्टी किंवा विचार असतील तर त्या क्रियेतही सकारात्मकता येणार...
Changdev Musale
1.10am चा लास्ट vedio कॉल तो पण range प्रॉब्लेम मुळे connect न झालेला ,बोलणं तर लांबच पण बघणं सुद्धा नाही झालं ,त्या दिवशी पासून आज पर्यंत ? एखाद्या घनदाट जंगलाला आग लागावी आणि भर पावसात वणवा पेटवा इतकी या जीवाची तगमग सुरू आहे , कॉल नाही येणार message नाही येणार है सगळं माहिती असून सुद्धा एखाद्या पाखरांन रात्रीच्या वेळी घरट्याकडे झेप घ्यावी तशीच माझी नजर क्षणा क्षणाला या निर्जीव, संवेदनारहित मोबाइल कडे अपेक्षेने जाते आणि पुन्हा पुन्हा last seen check करते,पुन्हा तीच जीवघेणी वेळ 1.10am नजरेसमोरून जाताजात नाही तरी मी पुन्हा पुन्हा तेच करतोय, अत्ता फक्त माझं आणि त्या मोबाइल मधील last seen चं नातं उरलंय
Shrikrishna Chavan
वेदना तर हृदयात खूप असतात अशा-आकांक्षा त्यावर मात करतात लाटांशी लढणाऱ्या नौका असतात वाऱ्याच्या पाषात अडकून पडतात सोन्याला पिघळणाऱ्या भट्ट्या असतात तापवून चमकवणाऱ्या किमयागार असतात प्रत्येंच्छा गगनात निनादणार सुटलेला बाण नाही परतणार पेरलेल्या बिया रुजून येणार मोठ्या वृक्षात रूपांतरित होणार फेर धरीत सरी येणार पाण्याचे रूपांतर प्रलयात होणार वाहणारे जल ,नाही थांबणारे असो किती मग,बांध अडवणारे सागर नदीचा संगम होणार लाटा घोड्यावर स्वार होणार फेसाळलेला दर्या शांत होईल उगवलेला सूर्य मावळून जाईल वेदनांपेक्षाही सुंदर हे जग आहे म्हणूनच या जगण्याला अर्थ आहे..!! 📝✍️ श्रीकृष्ण विश्वनाथ चव्हाण,मुंबई🖋️8 दूरध्वनी क्रमांक:७०२१७५५९०१ वेदना!
वेदना!
read moreKishor Rokade
उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ आता कान्हा नाही येणार गं..! कुठवर आस तु धरशील या विकलेल्या वर्तमान पत्राशी गं.! रक्षण कोणते मागत आहेस.. भरलेत दु:शासन दरबारात गं..! स्वतः जे निर्लल्ज पडलेत ते अब्रु तुझी कशी वाचवतील गं..! उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ आता कान्हा नाही येणार गं..।।१।। काल पर्यंतचा आंधळा राजा आता मुका आणि बहिरा गं..! ओठ शिवलेत लोकांचे आहे कानावर पहारा गं..! तुच सांग ही अश्रु तुझी कोणाला काय समजवणार गं..! उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ आता कान्हा नाही येणार गं..।।२।। सोड मेहंदी आता बाहु संभाळ स्वतःचीच लज्जा वाचव गं..! डाव टाकुनी बसलेत शकुणी मस्तक सारे विकतील गं..! उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ आता कान्हा नाही येणार गं..।।३।। *अटलबिहारी वाजपेयी *मराठी अनुवाद श्री:किशोर ज्ञा.रोकडे.
Pawar Rohan
तुझी वाट पाहीन काल तुझ्या नकाराने जणू आभाळच कोसळलं. पावसाच्या माऱ्याने पुरात वाहणार गाव तसं माझं हृदय गेलं, सुंदर गाव, ओबड-धोबड वाढलेली झाड, जे ओसाड पडलेलं, पडलेल्या इमारती पाहून थक्क होणार मन, तुझ्या नाकारणं आज अस्वस्थ झालं, काय करावं, काय नाही काहीच कळतच नव्हतं, फक्त तुझा विचार चालू होता, मनात संघर्षाचं वादळ होत, खोल सागराच्या तळात मन डुबत होत, जगण्याची आस नव्हती, मरण्याची भीती नव्हती, मी तर सर्वस्व हरलो होतो, तुझ्या शिवाय हरवायला दुसरी कोणती गोष्ट नव्हती, तुला समजवून आता थकलो होतो, प्रेमात तुझ्या प्राण पणाला लावून बसलो होतो, फक्त एकच इच्छा मनात अजून हि वावरतेय, तू येणार, तू नक्की येणार, विश्वास मनी भासवतेय, क्षणामागून क्षण जातील दिसामागून दिस मृत्यूच्या दारात असूनही तुझी वाट पाहीन मी, आयुष्यभर... Rohan Pawar
Rohan Pawar
read moreVishakhaBorkar
बाबा मी जेव्हा हसणार तेव्हा तुम्ही पण दाद द्यायला येणार का? माझ्या चांगल्या गुणांवर पुन्हा शाबासकी मला देणार का? रुसलेच मी कधी तर लाडोबा मला मंननार का? सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का? बघते रोज मैत्रीणाला बाबांसोबत त्यांच्या बोलतांना बाबा माझे आसवे वाहतात तेव्हा तुम्ही पुसण्यासाठी येणार का सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का? शब्द गोठू जातात माझे फोटो तुमचा बघताना आठवणी असतात सोबती प्रवास जीवणानाचा करतांना प्रवासात थोडी साद देण्यास तुम्ही येणार का सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का? लाडकी मी तुमची असेच का सोडून गेले मला जाणिव होते तुमची ती परत तुम्ही पूर्ण करणार का सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का? आयुष्याच प्रवास अजून आहे खूप दूर जाणिव नाही एकटे चालण्याची तुम्ही परत माझे बोट पकडून चालवणार का सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का? तुमची लाडकी लेक अॅड.विशाखा समाधान बोरकर रा. ता.पातूर जी.अकोला
HB Angel
True love ❤ #Nojoto #nojotomarathi #Love ❤❤ सवय आहे... सवय...आहे... तुझी वाट पाहण्याची... तू येणार नसताना ही... सवय...आहे...🙂 तुझ्याशी गप्पा मारण्याची...
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited