Nojoto: Largest Storytelling Platform

Best पावसाचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पावसाचा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutया वर्षी पावसाचा अंदाज, या वर्षीचा पावसाचा अंदाज, पावसाचा पहिला दिवस निबंध, पावसाचा अंदाज 2020, येत्या 24 तासात पावसाचा अंदाज,

  • 5 Followers
  • 5 Stories

सौ.अलका माईणकर

read more
आठवणीतला पाऊस

तू मी नी पाऊस
मस्त भिजायचो ना,
चिंब चिंब भिजताना
मस्त हसायचो ना. !!

 तो झोंबणारा वारा
अंगावरचा शहारा,
पावसाचा मारा
थेंबांच्या धारा..!!

गुंतलेल्या केसातला
पावसाचा चाळा,
जणू अडकायच्या
मोतीयांच्या माळा..!!

उडवायचो पाण्याला
तुडवायचो चिखलाला,
थांबायचो टपरीवर
भजी नि  चहाला..!!

थांबताच पाऊस
अल्लड पणा थांबायचा,
सभ्यपणाच्या बुरख्याआड
तो हळूच लपायचा. !!

तुझ्या माझ्या आनंदाला
लागली का रे दृष्ट,
सोडून गेलास मला
न सांगता काही स्पष्ट..!!

पाऊस आला की
आठवण येते तुझी,
साठवण केली होती ना
मनात या पावसाची..!!

वेगळेच ते रसायन
तू ,मी नी पाऊस,
भेटू ना एकदा तिघे
भागवू ना आपली हौस..!!
©®सौ.सायली सुहास देशपांडे
अहमदनगर
📱9420953924

राकेश डाफळे...

*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं,

read more

Govinda Polad

read more
देवा आधीच त्रास होता डोळ्यातल्या पावसाचा 
आता पूर घेत आहे दरमानसी प्राण दिवसाचा 

ती मायमाऊली बिचारी पाण्यात पोर शोधत बसली
सोड रे गैरसमज सगळे बस तूच एक पोर नवसाचा 

आधीच गावात सगळा आठवणींचा सागर होता 
मग का आखला तू आणखी बेत पूरपावसाचा 

तुझ्याचसाठी सगळे त्यांचे वारीउपवास होते 
मग उगाच का झाला तू शिरजोर माणसाचा 

मानले ही मी तू गरजेला कधी पाऊस देत नसतो 
पण शेतीच मारणारा कसला अत्याचार पावसाचा

सोड सोडनारे आता तुझे जीवघेणे हट्ट सगळे 
दे आवाज संकटांना अन कर विचार पावसाचा 

                   - गोविंद अनिल पोलाड
                 ( विद्रोही कवी विचारमंच )

Pankaj Javalekar

-- *पावसाचा परवाना* --

झालं बियाणं पेरून
आता वाट पावसाची
बोली लावली ढगांशी
त्यानं त्याच्या जिंदगीची

कैक दिस आले गेले
साधं टिपूस ही नाही
फक्त टिटवी ओरडी
रान कोरडं गं बाई

कशी करू मशागत
मले सुचनाचं काही
अश्रू ढाळून ढाळून
ओलावली उशी माही

कर्ज डोई वर झालं
मनी ईचार फासाचा
आवळला गळा घट्ट
दोर सावकी पाशाचा

गडी आतून खचला
केला ईचार मनाशी
विष पिऊन झोपला
पोरा घेऊन उराशी

पहाटेला जाग येता
फेस तोंडातून वाही
तिचा मोठा हंबरडा
पोरा कळनाच काही

त्याची बांधुनी तिरडी
केला ढगात रवाना
पाहू मिळतो का त्याला
पावसाचा परवाना

✍️ पंकज जावळेकर #OpenPoetry #shayri#marathi

Prasaad Shendage

#पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#

read more
पावसाचा थेंब हळूच गालावरून ओघळतो..
दमलेला जीव माझा एका क्षणात विरघळतो..
©प्रसाद✍
@| सुचलेल्या ओळी | #पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile