Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझं_आयुष्य Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझं_आयुष्य Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 9 Stories

शब्दवेडा किशोर

#माझं एक आयुष्यातलं अर्धवट राहिलेलं पत्र....!!!
माझं एक आयुष्यातलं अर्धवट राहीलेलं पत्र..पोहचेल का कधी तुमच्यापर्यंत ??..
किती सहजपणे भुतकाळरूपी नदी प्रवाहात वाहुन गेलेल्या काळात
रमण्याची शक्ती आपल्याला देवानं दिली आहे नं..??
त्याच जुन्या आठवणीत पुन्हा पुन्हा आपण जगतो,रडतो,हसतो अन् नव्याने जगत असतो....
पण त्यावेळी जिवंत असतो का आपण....? मुळात जगणं अन् जिवंत असणं
ह्यातला फरक ओळखायच्या भानगडीतच पडत नसतो...बस चाललेय नं तर चालू द्या..
याच विचारात आपण बरेचदा आयुष्य जगणं कायम ठेवत असतो..पण नाही हं..
मी जगताना तर फक्त मी गमावलेल्या माझ्या सर्व माणसांच्या आठवणीत जिवंत होतो.
मग मी मला आयुष्यात जगण्यासाठीचे बाकीचे क्षण वाया गेले असं समजु का..???
तेच क्षण पुन्हा कधीतरी डोळे मिटण्याआधी एकदा तरी दिसतील का ??..
भेटतील का ??..बोलतील का ??.. ह्या अन् अशा कित्येक प्रश्नचिन्हासोबत रडत कन्हत
काढलेल्या आयुष्याचं मी काय आणि कसं गणित मांडायचं...??
खूप काही राहुन गेलंय..
माझं माझ्या त्या खास असलेल्या सगळ्याच लोकांशी बोलणं..
माझी कुणाशी तरी ती अल्लड बालिश मस्ती अन् कुणावर असंच रुसणं रागवणं..
हजार चेहऱ्यातुन कुणा एकालाच माझ्या अस्तित्वाच्या आरशात बघणं अन्
ते माझं असं बघताना चारचौघात अडखळणं..
सगळंच तर राहुन गेलंय ना..??
मला असं वाटतंय की बहुतेक खरंच जिवंतपणी माझं जगणंच राहुन गेलंय....
पण आता ना ती लोकं आहेत...ना तो त्यांच्या बरोबरचा घालवलेला बरा वाईट काळ....
जन्माला येताना रित्या हाताने आलो अन् आता
आयुष्याचा अस्त होत असताना सुद्धा
मी रित्या ओंजळीनेच जातोय....
खंत मनी हीच राहील...
माझं एक आयुष्यातलं अर्धवट
राहिलेलं पत्र..
पोहोचेल का कधी तुमच्यापर्यंत..??
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझं_आयुष्य

शब्दवेडा किशोर

हा खेळ प्राक्तनाचा..
शब्दवेडा किशोर

हा खेळ प्राक्तनाचा
कधी कुणा न कळला
कुणा मिळते सुख पांघराया
कुणी फक्त दु:ख ल्याला..

हा खेळ प्राक्तनाचा
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला..

हा खेळ प्राक्तनाचा
कधी कुणा आयुष्यातल्या भावविश्वाचा
थांगपत्ताच न लागला
दुःख आले नशिबी अन् तो
दारिद्रयातंच खितपत मेला..

हा खेळ प्राक्तनाचा
कधी कुणा सर्वसुखाचा दैवानं
सागर हाती दिधला
पण असे तयाची दुर्बुद्धी अशी की
त्या सुखाने भरलेल्या
आयुष्यात तो खुप माजला
अन् स्वहस्ते त्याने स्वतःच्या
आयुष्याचा सारीपाट उधळला..
हा खेळ प्राक्तनाचा..

©शब्दवेडा किशोर #माझं_आयुष्य

शब्दवेडा किशोर

दुःखाचे डोंगर कोसळले तरी  
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले..
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे  
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवले.. 
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध  
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवले.. 
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
अन् आयुष्याने पुन्हा नव्यानं जगायला शिकवले..

©शब्दवेडा किशोर #माझं_आयुष्य

शब्दवेडा किशोर

आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाही
तर दुरावा वाढतो..अंतर वाढते.
यात चूक त्याची पण नसते अन् तिचीही नसते.
चूक असते काळ अन् वेळेची..
 
       यावर एकच उपाय उरतो.. 
      त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या की
तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण
त्या व्यक्तीच्या
एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील.
जीवाला जी देणारी माणसं 
खूप कमी असतात.. 
आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते.
पण कित्येकदा अनेकांच्या नशिबी
माणसांच्या गर्दीतला एकटेपणा येतो.
अन् मग सुरू होतो त्यांचा 
आयुष्यातील एकटेपणाचा शापीत प्रवास..

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून 
#माझं_आयुष्य  uday pawar

शब्दवेडा किशोर

स्वप्नांच्या मागे धावु नकोस,
स्वप्नं सगळीच पूर्ण
होत नाहित..
उरतात ते फक्त उसासे,
अश्रु सुद्धा खाली 
ओघळत नाहित..
कुठल्याच मला भावनांचा थांगपत्ता
मजला लागत नाही,
क्षणभरही मनाला मग तेव्हा
उसंत मिळत नाही..

©शब्दवेडा किशोर #माझं_आयुष्य

शब्दवेडा किशोर

हा खेळ प्राक्तनाचा कोणता
कधी कुणा ना कळला..
कुणा मिळते सुख पांघराया
कुणी फक्त दु:ख ल्याला..

हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणा ना कळला..
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला..

©शब्दवेडा किशोर #माझं_आयुष्य

शब्दवेडा किशोर

किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले 
किती ऋतू तसे पावसात चिंब झाले..
कळले नाही मला कधीही ते सारे 
कधी कसे अन् का माझ्या मनात
आठवांच्या आसवांचे मेघ हे घनदाट दाटले..
जुन्या आठवणी आल्या 
मनाला क्षणभर मोहरून गेल्या
अनंत दुःखांची पुन्हा नव्याने
खपली काढुनी गेल्या..
आठवांचं हे सोनेरी प्रतिबिंब
अजूनही मनी दाटलेले..
सुखदुःखाचे क्षण आयुष्याचे
त्यात गुपित म्हणूनी साठलेले..
ते गुपित कसे अन् कधी
आभाळभर हे पसरले..
अन्
कधी कसे अन् का माझ्या मनात
आठवांच्या आसवांचे मेघ हे
घनदाट दाटले..

©शब्दवेडा किशोर #माझं_आयुष्य

शब्दवेडा किशोर

पंख नाहीत मजला 
तरीही  
उडण्याची स्वप्न जरूर बघेन.. 
असेलही लाभलेलं मजला कमी आयुष्य हे तरीही  
मी ते भरभरून जगेन.. 
जन्मा आलो रित्या हाती पण 
जाताना मात्र भरली ओंजळ घेऊन जाईन..
ओंजळीत त्या नात्यांची श्रीमंती भरून मागे माझ्या गोडू आठवणींचा सागर ठेवीन.. 
अन् दिल्या रूपी माणसाने आहे तसेच नैसर्गिय सौंदर्य टिकवून जगावे 
नको फार पैसा नको फुकाची श्रीमंती अन् नको तो गर्व  
नात्यांची श्रीमंती हीच खरी दौलत  
हा पाठ माघारी राहीलेल्यांना शिकवुन जाईन..
आहे इच्छा मनी एवढीच की 
मी जाताना कुणी रडू नका 
शोक करूनी माझ्या आत्म्याला विणाकारण भटकायला लावु नका.. 
मी गेल्यावरही सगळ्यांनी होतं तसंच हसतखेळत आयुष्य सुरू ठेवा.. 
कारण..  
फिरूनी नव्यानं जन्म घेऊनी मी पुन्हा एक मोठी भरारी आयुष्यरूपी वादळावरी घेईन.. 

मी..माणसांच्या गर्दीत एकटेपणात जगणारा एक शापीत जोकर..
तुमचा..शब्दवेडा किशोर..

©शब्दवेडा किशोर #माझं_आयुष्य

सुनील ईश्वर होडगे

काहींना जवळ करतो काहींना दूर सरतो...
माझ्या अहंकारावर मी सगळं मोजमाप करतो...
काहींच कौतुक करतो काहींना उधळून लावतो...
मी माझं मत एकाच दृष्टीने मांडतो...
काहींवर जीवापाड प्रेम तर काहींचा जन्मोजन्मीचा द्वेष ठेवतो...
मी माझा कंफर्ट झोन बघतो...
काहींना ऍड तर काहींना ब्लॉक करतो...
मी माझी माणस शोधून शोधून निवडतो...
असलो जरी फेक नाही मनात कसला खेद...
माझ्या मस्तीत मी गुंग करतो स्वतःचा निषेध...
आहे तत्वांशी एकनिष्ठ त्यात बेडर वृत्ती...
मी एकमताचा नाही कसलीच दूरदृष्टी...
कोण आपलं कोण परकं हे स्वतःस सांगतो...
मी माझ्याच गुर्मीत आत्मकेंद्री होऊन स्वतःच आयुष्य मांडतो...
स्वतःच आयुष्य मांडतो.... #माझं_आयुष्य #Night #Thoughts


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile