Nojoto: Largest Storytelling Platform

Best पंढरीचीवारी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पंढरीचीवारी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 6 Stories

gaurav

🙏🚩🚩🚩🚩 पुंडलिक ऊभा विटेवर नजर भक्तांवर..... ,🚩🙏🙏🙏🚩😇

read more
विठु सावळा माझा , कटेवरी हात चक्षु नयन विटेवरी ऊभा.
चंदन कपाल माला, वैष्णव पताका पायदली वाट पंढरी..‌
 गमन वाटे वाटे पाई दिंडी सोहळा , पाहीन कधी मुखकमल दर्शनी....
चालत विठुमाई जय घोष पंढरीची वारी, बुक्का माऊलीचीया भाळी.‌‌...
 डोई कळस माऊलीच्या आजी रुक्मीणी शोभती, डोई तुळस वृंदा पंढरी वाट पाही....
जय घोष वाटे गजर भक्ती नामाचा,रथ संताचा लाख मोल माणिक मोती‌...
रथ पादुकांचा अभिषेक पुष्प रंगवली, बैल जोडी अंगावर मोठी चांदणी...
ठेवा संस्कृतीचा आजी माझी पातळ नऊवार, नथणी नाका जणु रुक्मिणी आई शोभती....
वैष्णवांचा गजर ज्ञानदेव तुका नामे उच्चार,भरूनी चंद्रभागा आई वाट भक्तांची पहाती...
काकडा गजर किर्तन रंगी, शोभुनी अनोखा सोहळा पालखी लाखमोलाची....
फुगड्या टाळ ,मृदुंग, विणा पाऊले पंढरीच्या वेगान..
महाभंडारा मोठ मोठा भंडारा प्रसाद.....
रिंगण संतांच्या नामाचे, गोड आनंद ना ओळख कोण कोणाचे....
नटली जशी पंढरी रंगबेरंगी नऊवार नेसली.....
देहु, आळंदी, त्रिंबक आणि बहुत येती विठुच्या भेटी....
 सोहळा दिंडीचा पालखी आनंदी डोई......
कोणीही ना असे येती भेटी आषाढी एकादशी पुण्यवान पाहिजे जातीचे....
तळमळ भेटण्या विठुरुक्मा आई,बोलवने तुझेच घेऊ आनंदाच्या भेटि गाठी.....
प्रणीपात तुम्हाचरणी ना येती असे कोणीही.....
बोलवतो विठु भेटण्या त्या वाळवंटी पंढरी...
 प्रसाद तुझ्या ओढ जीवाला..
   मऊ लागती पाऊल सावळ्या विठ्ठला.... 🙏🚩🚩🚩🚩

पुंडलिक ऊभा विटेवर नजर भक्तांवर.....


,🚩🙏🙏🙏🚩😇

gaurav

आठवण वारिची .... साधुसंत परंपरेची ..... 😇😇 पांडुरंगी नाम कर जोडोनियि ..... #पंढरीचीवारी #पांडुरंगाची_हाक

read more
नामघोष मुखी मृदुंग टाळ सोबती...
  अभंगे भजणाची साथ 
     पांडुरंगी नामे हाक....
बालगोपाल फुगडी हात लहान जरी
  विखुरलेली रंगे अंगणी ....
   घेईन कुशीत मजला विठु माऊली....
   वारकरीचे चरण लागे पंढरी....
  पाहिन डोळा पंढरी , बुक्का लाविया भाळी....
  विणा आनंदी करती ...साधुसंताचा भास ना होई ..
  विठा रखुमाई...बोल‌ बोबडी..तुझिया नामे बहारी....
   कंठ डाटला पांडुरंगा पाहुनी मुर्ती तुझी ....
 ना पाषाण तु
स्यंभु प्रकटि .विठु माय सावली ......

🙏पांडुरंगी जयघोष हा....
    हौस वारीची ...येईन‌ पंढरी .....🙏🙏☺️
    
  आठवण वारिची ....
   साधुसंत परंपरेची .....
 😇😇
पांडुरंगी नाम कर जोडोनियि .....
    

#पंढरीचीवारी 
#पांडुरंगाची_हाक

yogesh atmaram ambawale

भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ, चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.

read more
दर्शनाची तुझ्या मला लागली आस,
टाळ,चीपळी,मृदंग सह घालितो मी साद.
पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज,
निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
थकवा नाही जरा ही,आहे दूर जरी अंतर पंढरपुरी,
तुझ्या दर्शनाच्या ओढीने,नव चैतन्य संचारते उरी.
जाणतो तू आपल्या ह्या आबालवृद्ध भक्तांची हाक,
तूच सांभाळून नेशील,जरी स्तब्ध उभा कटेवरी ठेवूनिया हात. भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही..
तरीही आज प्रयत्न केला..
#वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक 
#yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल 
दर्शनाची तुझ्या मला लागली आस,
टाळ, चीपळी,मृदंग सह घालितो मी साद.
पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज,
निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.

Shankar kamble

*पंढरीच्या वाटे।धावे मन वेडे।* 
 *संसाराचे कोडे।सोडवी तू।* 

 *डोळा वाहे नीर।सुटलासे धीर।* 
 *पाहण्या अधीर।सावळ्याला।* 

 *बहु तापलो मी।संसार या तापे।* 
 *जमविली पापे।नानाविध।* 

 *नेत्रांची काहिली।तूच करी शांत।* 
 *आता ना उसंत।क्षणभरी।* 

 *चरणाशी मिठी।देवू अलिंगन।* 
 *हृदयाची खूण।हृदयाला।* 

 *गण गोत्र तोची।भीमा तटी उभा।* 
 *चैतन्याचा गाभा।शोभतसे।* 

 *पामर पतित।कैसा येवू पुढे।* 
 *विषयां सवडे।निरवावे।* 

 *पुण्याची शिदोरी।आज फळा* *आली।* 
 *भेटाभेट झाली।पांडुरंगे।* 

 *मागणें न काही।आता उरे काय।* 
 *समरस साय।दुग्धासवे।*

©Shankar kamble #विठ्ठल #वारी #पंढरीचीवारी #विठू_माऊली #विठ्ठल_रखुमाई

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#prayer #पंढरीचीवारी #मराठी #MarathiKavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे पंढरीची वारी..त्यातीलच एका महिला वारकऱ्यांच मन मांडण्याचा हा प्रयत्न..

read more
ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर,
काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर..

दिलंस मला तू सोन्यासारख ते रान,
रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन...

तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास,
मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस..

दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट,
तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer 
#पंढरीचीवारी 
#मराठी 
#marathikavita
#marathi 
#martahipoem 
मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे पंढरीची वारी..त्यातीलच एका महिला वारकऱ्यांच मन मांडण्याचा हा प्रयत्न..

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile