Find the Best त्यांना Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutत्यांना रानी के गाना, त्यांना का, त्यांना in english, त्यांना मीनिंग इन हिंदी, त्यांना english mean,
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreVaishali Zope
WhatsApp आणि Facebook वर स्टेट्स टाकता येतात. बरेच जण सुविचार टाकतात,जणू काही त्यांना त्यांचे स्टेट्स सांगायचे असते की आम्ही किती छान विचार करणारे किंवा छान विचारांचे लोक आहोत; पण खरच असते का असे.सुविचार तर लहानपणापासून शिकत आलो पण खऱ्या आयुष्यात त्याचा कितपत वापर केला, आणि ज्यांना जिवंत भावना समजत नाही त्यांना स्टेट्स तरी काय समजणार. हं काही असे ही म्हणतात की आम्ही नाही टाकत स्टेट्स काय ते स्टेट्स टाकायचे नसते रिकामे उद्योग पण कधीतरी आहे त्याचा फायदा घेत आनंद लुटायचा ना! आपल्याला आवडते ते टाकायचे आणि स्टेट्ससाठी देखील लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा आपला आनंद आपण घ्यायचा.जे नाव पाडणारे आहेत,उगाच सल्ले देणारे आहेत,जे उगाच काय स्टेट्स बघायचे अश्यांसाठी स्टेट्सचे शेवटचे option वापरायचे.
महेश...
आज संध्या समयी आठवण पुन्हा तिची आली होती अलगद घ्याव जवळी इतकी ती गोड होती एकांताच्या त्या चार क्षणांत मी पुन्हा तिच्यात हरवलो होतो आजही संध्या ती तितकीच सुंदर होती फक्त गोड त्या हसण्या सोबत अलगद पश्चिमेस विसावत होती तांबूस ते ढग गुलाबी गालांसम भासत होते अलगद त्यांना मी स्पर्शाव त्या हवेस ते सांगत होते मंद पिवळ्या किरणांना ही आज का चकाकी आली होती तिच्या डोळ्यांच्या स्पर्शाची मला ती बहुधा साद होती संध्या आज खूप सुंदर होती का..... मी नसताना खरच ती आज आनंदी होती लालसा त्या गोड निरागस हसण्याची राणी आज तू भागवत होती माफ कर.. पन त्या हसण्याची गोडी आज तुझ्यातही नव्हती राणी प्रेम तर तुझ्या सौंदर्यावर कधी केलच नव्हत तुझ्या या निरागसतेनेच आता पर्यंत मला घायाळ केल होत तुझ्यातल बालपणच मला तुझ्याकडे ओढत होत बहुधा याच मुळे तुझ्या गोड ओठांना पाहण्याचही धाडस केल नव्हत वर्णाव काय त्या ओठाना ज्यांना पाहून कित्येकांची मने हसली होती त्यांना नाराज करण्याची आजवर कोणाची हिम्मत झाली नव्हती गोड तुझ्या साथीचा अंत काळोखातच होणार होता तरी अजुनही कळल नाही साला हा दिल का पागल झाला होता 💞 ...... 💌💬 सांज
सांज
read moreRushikesh Ankushrao
तू सारखा असा येऊ नकोस रे. हे पावसा तू सारखा असा येऊ नकोस रे, मुंबईला माझ्या पाण्यात डुबवु नकोस रे, येथील जनता अनेक कामात व्यस्त आहे रे, त्यांना नेत्यांचा कारणाने त्रस्त करु नकोस रे. त्यांना जलमय मुंबई दिसेनाशी होते, जनता पण बेहरेपण स्वीकारते रे, कारण हे रडगाणे कोणाला सांगायचे रे, म्हणून तुलाच म्हणतो तू सारखा असा येऊ नकोस रे. तू पडल्याने त्रास होतो म्हटल्या, सांगतात ते जनतेस तुला बंद करण्या, अशा वक्तव्यांना तरी जरा घाबर रे, आणि तू सारखा असा येऊ नकोस रे. तुला पडायचे आहे तर मनमोकळेपणाने पड रे, देशातल्या त्या दुर्गम भागात जिथे दुष्काळ आहे रे, जिथे फक्त तुझा येण्याची आस आहे, तुला बदनाम करण्याचा कट नाही आहे, तिथे जाऊन धो-धो पड रे, पण इथे तू सारखा असा येऊ नकोस रे. #poem #poet #rain #mumbai #today #marathi #mumbaikar
poem poet rain mumbai today marathi mumbaikar
read morePramod Chandekar
☎ *टेलीफोन वाडी* 📞 🍃बा•ल•क•वि•ता🍃 टेलीफोन वाडीत खूप आहे रूसवा, जो तो घेतो म्हणे मोबाईलचं नवा•••• टेलीफोन रूसून कोपऱ्यात बसलेत, उचलून कुणीही त्यांना नाही घेत•••• चुकूनचं वाजतो ट्रिंगssट्रिंग फोन, नाहीतर कशाला घेतो त्यांना कोण••••? टेलीफोनला रोज वाटते खूप वाईट, मोबाईल झाला ना सगळीकडेचं हिट•••• टेलीफोनला एकदा म्हणाला मोबाईल, प्रत्येकाचा दिवस रे येईल आणि जाईल•••• टेलीफोन वाडीत मग पसरला आनंद, रूसवा सगळ्यांचा झालाच बंद••••! प्रमोद जा.चांदेकर चंदगड/कोल्हापूर मो-8530849956
सौ.अलका माईणकर
आमच्या ग्रुपचे समुह संस्थापक गजानन तुपे सर ते आहेत मोठे पत्रकार त्यांचा आम्हाला अभिमान फार......अभिमान फार.... सर आहेत प्रेमळ मनाचे जणु थेंब हे मधाचे सगळ्यांना करीती आपलेसे चुक होता कुणाची त्यांना न खपे....त्यांना न खपे..... अभ्यास दांडगा हा सरांचा साहित्यात जपावा वारसा त्यांचा समजावती सगळ्यांना आपलेपणाने स्वभाव दिलखुश असे हो त्यांचा......असे हो त्यांचा.... सरांचा अभिमान आम्हाला असा गुरु आम्हाला लाभला समुहासाठी जीव तळमळतो सारा वेळ देती सांभाळून स्वतःचा पसारा...स्वतःचा पसारा....
Prasad Raj
तु चाल तुझ्या वाटेवर...एकटा चालायला शिक. कोणी सोबत असो नसो वाईट वाटून घेऊ नकोस. तरी जे लोक सोबत आहेत त्यांच्यावर प्रेम कर.जे सोबत नाहीत त्यांचा द्वेष नको करू पण त्यांना महत्व देऊ नको. तुझं आयुष्य तुला एकट्याला घडवायचं आहे.काही लोक गरजेपुरता तुझा वापर करतील आणि काही तुला त्यांच्या प्रत्येक गोष्टींत सहभागी करून घेतील, त्यांना महत्त्व दे. जे तुला सदैव उंचावर जाण्यासाठी प्रोत्साहित करतात अशांना महत्त्व दे.पण प्रत्येक गोष्ट विचार करून कर. कारण तू जेव्हा कूठे चूकशील तेव्हा हजार जण तुझ्याकडे बोट दाखवायला तयार असतील. म्हणून स्वतःवर प्रेम करत आणि स्वतः च्या क्षमतेवर विश्वास ठेऊन क्षितिजाला भिडन्याचा प्रयत्न कर... -©प्रसाद
vijay jagtap
सगळ्या परिवाराला घेऊन पोटी, जमवावी लागेल त्यांना आयुष्याची रोटी, जेव्हा तुमची माणुसकी असेल मोठी, आयुष्यभर राहील तुमचे नाव ओठी 😊 मदत करताना एकच ठेवा भान, दुखला नाही पाहिजे कोणाचा स्वाभिमान, माणुसकीच्या नात्याने वाढवा सगळ्यांचा मान, पण स्वतःच्या नावाचा गजर करून नका घालवू माणुसकीची शान...😑🙏 पूरग्रस्तांना देऊया सगळेजण हमी, काहीही पडू देणार नाही त्यांना आपण कमी, ज्यांनी पुढाकार घेतला पुढे व्हा तुम्ही, सतत मदतीचे हात घेऊन सोबत आहोत आम्ही...🙏 सगळ्यांची साथ,मदतीचे हात #कोल्हापूर #सांगली #पूरग्रस्त #मदतीचे_हात #VJ #विज #शब्द_लहरी
सगळ्यांची साथ,मदतीचे हात #कोल्हापूर #सांगली #पूरग्रस्त #मदतीचे_हात #vj #विज #शब्द_लहरी
read moreGokul Tapadiya
जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत . एक आपलं फळ स्वतः हुन देणाऱ्या उदा आंबा, पेरु, केळी इ. दुसरी - आपलं फळ लपवून ठेवणाऱ्या. उदा. गाजर ,मुळा,बटाटा,कांदा इ. ज्या आपली फळे स्वतःहुन देतात त्यांना सर्वजन खत पाणी देऊन आपला जीव लावतात. अन् ज्या आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं. तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो तो समाजात मान सम्मान मिळवण्यात प्राप्त ठरतो. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते. याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो मुळासगट उपटला जातो
Hriday Govardhane
*लहान तोंडी मोठा घास।* * आलेल्या महाभयंकर पुरा मुळे कितीतरी कुटुंब उध्वस्त झाले।* *पूर ओसरेल। पण खरी कसोटी त्याच्या घरी गेल्यानंतर असेल।* *या वर्षी जे मोठं मोठे गणपती बसवून मांडव मूर्ती janz पथकावर अवाढव्य खर्च करतात त्यांना माणुसकी दाखवायचं मोठा चान्स आहे।* *या वर्षी चा गणेशोत्सव छोट्याशा मांडवात करून मिळालेल्या रकमेतून ज्या पुरात नुकसान झालेल्या कुटुंबाना पैश्याच्या स्वरूपात न करता त्याच्या गृहपयोगी वस्तू किंवा त्यांच्या वास्तू ची नुकसानी साठी मदत करू शकलो तर त्यांना काही प्रमाणात तरी हातभार लागेल। 200 मंडळांनी 5/5 कुटूंबना जरी मदत केली तरी किमान 1000 कुटुंबा पर्यंत मदत जाईल। आणि या कारनासाठी देणारे हात पण भरपूर मिळतील।।* *बघा पटतंय काय।।* 🙏🙏🙏🙏🙏 व्याख्याता : प्रज्ञा खैरे