Find the Best आठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutआठवणीने meaning in english, आठवणीतल्या कविता instagram, आठवणी मराठी शायरी, आठवणीची शायरी मराठी, शाळेच्या आठवणी शायरी,
Amita
कप्पा.... आज मी निवांत आवरायला घेतला कप्पा, आठवायला लागला मग, आठवणींचा एकेक टप्पा.... एकेक वस्तू कप्प्यातील, उलगडत होत्या आठवणी ज्याचे त्याचे मोल ठरती, करून पडताळणी.... गोजिरवाण्या अनेक गोष्टी जपून मी ठेवते वापरूया परत कधीतरी, असाच विचार करते... अडगळीच्या काही काही गोष्टी नजरेसमोर येतात खूप जपून ठेवल्यावर, आता नकोशाच होतात.... विस्कटलेला कप्पा आता येतो जरा रुळावर मनासारखा लागताक्षणी हसू झळके मुखावर.. मनाचाही असाच विस्कटलेला कप्पा! असंख्य आठवणींचा गाठतो टप्पा कधी कधी उतू जाता आठवणी मनासी आवरू कशी त्या क्षणी? मनाचा कप्पा, असाच विखुरलेला यत्न करूनही, मोकाट सुटलेला.. आठवणींचा पसारा, कधी अवरतच नाही.. नव्या जुन्या सयींचा माग सुटतच नाही.. अमिता.. ©Amita #आठवणी #MarathiKavita
Shankar Kamble
चोरपावली सांज दाटली रानभूल ही वाट हरवली थबकत आले भास अवेळी माखून काजळ रेघ ओली.. सताड उघडे दार नभाचे नक्षत्रांचे रम्य फुलोरे गळूनी गेले शिणले मोती भग्न हासती खिन्न मनोरे.. क्षितीजाच्या या गूढ पटली चितारलेली हळवी नक्षी तळहातावर गोंदून गेली रंग हळदी पिवळी पक्षी.. जलाशयाच्या संथ दर्पणी बिंब उमटले नवं तरुंचे मुखं न्याहळी अती कौतुके तरंग भरले डोह मनाचे.. सावल्यांचे खोल जाळे नाते विणती एक क्षणाचे धूसर झाल्या दृश्य प्रतिमा भाव कोंडले आर्त मनाचे.. ©Shankar Kamble #moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी
#moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी
read moreकविराज धनंजय
अनंत युगाच्या विरहात न्हाऊन निघालेल्या वाटेवर मी अजुनही तिथेच आहे खवळलेल्या समुद्राच्या लाटेवर जन्मजन्माचे क्षण घेऊन बसलोय आठवणीच्या हिंदोळ्यावर क्षणात हसू क्षणात आसू देतोय वाहून तिथल्या शांत किनार्यावर होईल का पुन्हा कधी भेट आपली त्या पहिल्या वाटेवर अलवार स्पर्शाने वार्याच्या स्पंदनेही बोलतात माझी खरोखर होऊन लाट श्वास माझे हे धडकतात येऊन किनार्यावर जातात परत तळाशी समुद्राच्या कधी तरंगतात त्या खाऱ्या पाण्यावर सरतात सार्याच आठवणी सारे आयुष्य या जन्मातून सरल्यावर उरतात फक्त नेत्र कोरडे आठवणीचे अश्रू त्यातून उतरल्यावर ©कविराज धनंजय #आठवणी #कविराज_धनंजय
Dileep Bhope
असे कुंद होते अचानक वारे सभोवती विजाळल्या ढगांनी कोणास द्यायचे उत्तर? श्वासांनी श्वासांचे भोगायचे शाप निरंतर मौनातल्या आठवणींना म्हणायचे 'या नंतर' ©Dileep Bhope #आठवणी
Sangam Pipe Line Wala Poet Shayar
तुझ्या मनात माझ्या आठवणी येतील दिन रात त्या तुला सतत खुप सतावतील पाणी पिऊन पिऊन तू थकून जाशील तुझ्या कोरड्या गश्याला हिचक्या येतील... ©®संगम पाईप लाईन वाला ©Sangam Pipe Line Wala Poet Shayar #आठवणी
Amit datir
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला ...✨ ✨✨✨✨💦 ©Amit datir #आठवणी Vikas Singh Tanwar अधूरी बातें Nitesh kumar Chaitali Yengade Rajesh Kumar
#आठवणी Vikas Singh Tanwar अधूरी बातें Nitesh kumar Chaitali Yengade Rajesh Kumar
read moreKunal Salve
ये पुन्हा तु माझी सखी होऊन आज खरंच आठवणींची जत्रा भरली घे घट्ट मिठीत नव्यानं एकदा पाहा स्पंदनंही आता तुलाच गूनगूनली ! #आठवणी
Kunal Salve
खूपच आठवणी येतात गं तुझ्या LOCKDOWN मध्ये उल्लंघन खूप करतात हृदयातील CURFEW चे शिथिल होईल LOCKDOWN मग ठरव काय करायचे गुन्हा केलेल्या शिक्षेचे ! #lockdown #शिथिल #आठवणी
Ekta Gour
तु कसा माझ्या सोबत भांडला, मग स्वःताच माफी साठी माझ्या मागे मागे धावत आला, आठवतं ना तो दिवस, मित्रानों💕 आज आल्या आल्याचं विषया कडे वळुया आजचा विषय आहे आठवतं ना... यावरुन जे सुचतयं ते लिहा. आणि मराठी च्या नवीन कोट्स वाचण्यासाठी Best YQ Marathi Quotes पेज ला लगेच फाँल्लो करा.
मित्रानों💕 आज आल्या आल्याचं विषया कडे वळुया आजचा विषय आहे आठवतं ना... यावरुन जे सुचतयं ते लिहा. आणि मराठी च्या नवीन कोट्स वाचण्यासाठी Best YQ Marathi Quotes पेज ला लगेच फाँल्लो करा.
read moreAbhishek Panchal
काही सुंदर क्षण मनाच्या खोल कप्प्यात कायमचीच जागा करून जातात ते सुंदर क्षण अनुभवताना तर आनंद देतातच पण पुन्हा पुन्हा आठवतानाही तितकाच आनंद देतात #मराठीलेखणी #मराठी_quote #आठवणी #marathiquotes #memories
#मराठीलेखणी #मराठी_quote #आठवणी #marathiquotes #Memories
read more