Nojoto: Largest Storytelling Platform

Best असतं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असतं Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutअसतं बढ़ने की दवा, असतं में दर्द होना, असतं में दर्द, असतं में गिल्टी होना, असतं बढ़ने के नुस्खे,

  • 45 Followers
  • 152 Stories

Vaibhav Maid

read more
गरूडालाही कुठे माहिती असतं 
जन्मल्याबरोबर,
आपण झेपावणार आहोत कधी
उत्तुंग आभाळी,
मात्र आपण गरूडच आहोत,
हे त्यानं हेरायच असतं
अगदी अचूक वेळी..
अगदी अचूक वेळी..

         ..✍वैभव उर्फ अनुभव
                 ०२.१०.२०१९

राज श्री

प्रेम

read more
Trust me प्रेम हे प्रेम असतं
विखुरलेल्या मनावर 
मायेची फुंकर घालतं
प्रेम हे प्रेम असतं
अथक प्रयत्नांनी
जो हारतो त्याला 
लढण्याची नवी प्रेरणा देतं
प्रेम हे प्रेम असतं
थकलेल्या जीवाला
जगण्याच नव बळ देतं
प्रेम हे प्रेम असतं
दोन अनोळखी जीवांना
एका नात्यात गुंफतं
प्रेम हे प्रेम असतं
जसं तुझं आणि माझं होतं प्रेम

Sachin Gharat

सच्चू

read more
आयुष्य किती अनमोल असतं
ते जगल्यावर कळतं
जग किती सुंदर असतं
ते पाहिल्यावर कळतं
नातं किती अतूट असतं
ते जपल्यावर कळतं
प्रेम किती पवित्र असतं
ते केल्यावर कळतं
मन किती सुंदर असतं
ते जाणल्यावर कळतं
दुःख किती वाईट असतं
ते आल्यावर कळतं
सुख किती चांगलं असतं
ते भोगल्यावर कळतं

:- सच्चू सच्चू

love💝life😊

read more
मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ...

शब्द शृंगार 9359164650

read more
नको असतो प्रत्येक वेळी मला तुझा पैसा, तुझं स्टेटस, तुझी संपत्ती तुझ पद मग काय हवं असतं मला.... नक्की काय अपेक्षित असतं मला आपल्या नात्यांला.... काय पाहीजे असतं मला तुझ्याकडून नक्की मला ही सांगता येणार नाही पण हवे असतात तुझे दोन शब्द जिव्हाळ्याचे.... हवी असते ती एक नजर प्रेमाची.... हवा असतो तो एक नजरेचा कटाक्ष खट्याळपणाचा.... तुझ्या केसात गुंतलेल्या मनाला तो गुंता ही आवडतो कारण तो असतो तुझ्याच विचारांचा.... थकलेलो असताना हवी असतात तुझ्या हातांची बोटे माझ्या केसात अन् तो हात माझ्या डोळ्यांच्या पापण्यावर.... कधी कधी घाबरतो मी या निर्दयी जगाला वाटतं तु म्हणावं अरे मी आहे ना तुझ्यासोबत आणि मग हवा असतो तो हात मला माझ्या खांद्यावर, धीर देण्यासाठी खूप एकाकी वाटत कधी, हिरमुसायला होतं, रडायला येतं तेव्हा मात्र हवा असतो तो हात माझ्या हातात आधारासाठी, चालायचं असतं तुझा हात हातात घेऊन त्या शांत रस्त्यावरून, अनुभवायची असते तुझी सोबत त्या झाडाखाली बसून.... कधी तरी एकांतात अनावर होणाऱ्या भावनांना पाहिजे असतो तुझा तो अलवार स्पर्श जो मोहरून टाकतो मनासोबतच शरीरालाही.... मला ही गरज असते तुझी, मला ही हवे असतात ते धुंद मंतरलेले क्षण तुझ्या सहवासाचे, तुझ्या सानिध्याचे मग हळूच शिरावेसे वाटते तुझ्या मखमली कुशीत अन् हरवून जावं वाटतं स्वतः ला.... काही क्षण हवे असतात आपल्या फक्त आपल्या जाणिवांचें.... त्या विलक्षण अनुभुतिचे.... जगाला विसरुन तुझ्यातच गुंतायच असतं, विरघळायचं असतं पण नाही व्यक्त करता येतं मला माझ्या भावनाना शब्दात.... वाटतं तु समजून घ्यावसं मी काहीच न बोलता.... ओळखावसं मनातलं फक्त नजरेतूनच.... कधीतरी घे ना मला ही समजून.... कधीतरी दे ना मला ही ती आश्वासक नजर मला बघून... तु ही विसर ना कधीतरी या जगाला.... ये ना कधी तरी मोकळ्या मनाने आणि हो ना एकरूप माझ्याशी.... माझ्या विचारांशी.... माझ्या भावनांशी.... कधीतरी माझ्यातल्या माझ्याशी....

-निल इमरोझ

Manish Kanade

आता सगळ्यांनाच ठाऊक आहे
महागडा टिव्ही बंद असतो दिवसभर 
सुंदर फर्निचर, नसतं कोणी त्यावर 
सगळे पाहुणे,  स्मार्ट झालेत 
मी नको तुझ्याकडे आणि तू नको माझ्याकडे 
सगळ्यांनाच ठाऊक आहे...

मायेची नाती कोरडी होऊ लागली 
ऑनलाइन मैत्रिपुरात वाहू लागली 
डोळ्यातील अश्रू गालावरच सुकू लागले
टिपणार कोणी नाही ..... 
सगळ्यांनाच ठाऊक आहे

एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही 
ट्रॅफिकमध्ये फिरतो 
अचानक एखादी गाडी आलीच समोर 
तर घट्ट हात धरून मागे ओढणारं कोणी नाही 
सगळ्यांनाच ठाऊक आहे

महागातला महाग पदार्थ आम्ही
ए सी रेस्टोरंट मध्ये बसून खातो
पण घराबाहेरील ओट्यावर बसून
आईने चारले.ला चिऊ काऊंचा घास 
गोष्टींपुरताच राहिला आहे...
हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे

आता सगळ्यांनाच सगळं ठाऊक असतं
त्यामुळे कुठलीही गोष्ट उलगडणे
म्हणजे काय असतं
हे कुणालाच ठाऊक नाही....
                - मनिष ज्ञानदेव कानडे #संभ्रम#

Geeta Darakhe❣️

read more
हातात पेन आला तर सुचत काही नसतं
मन जेव्हा शांत असत
तेव्हा बरच काही लिहायचं असतं
मनाला माझ्या शब्दांमध्ये गुंतवायच असतं
शब्दात माझ्या मलाच प्रश्न आणि उत्तरही शोधायचं असतं, 🙂--geet,,,........

Manish Kanade

परजीवी नाती

आता ती पण कामाला जाते 
आणि तो पण 
आता एकटं असतं घर 
दिसायला असतं टापटीप 
पण मनात पसारा घरभर 
वेळच नसतो कुणाला 
या सुंदर घरट्यासाठी 
उमलल्याच कळ्या 
तर, त्यांच्याशी बोलण्यासाठी 
त्यांना फुलताना पाहण्यासाठी 
अशी ही वाढत चाललीयेत
परजीवी नाती, परजीवी नाती...
       - मनिष ज्ञानदेव कानडे #परजीवीनाती#

Minty S Rupwate

#तू अन् मी

read more
तुलाही हवं असतं
मलाही हवं असतं
तुझं माझं नातं
रोज नवं असतं #तू अन् मी

Shailesh Hindlekar

शिक्षक दिन की शिक्षक दीन ? बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते, त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुसऱ्या दिवशी वर्गात तो पाठ शिकवावा, तर मुलं मख्ख चेहऱ्याने पाहतात..गालात हसतात..कारण ट्युशन मध्ये हे आधीच शिकवलं असतं.नावीन्य निघून गेलं असतं त्या पाठाचं, मग शिक्षकही कसा बसा तास ढकलतात. सरकारी शाळांत वेगळं दृश्य..अशीच तयारी असते शिकवायची, पण शिक्षकांना जुंपलं जातं इतर कामांमध्ये..जनगणना, पल्स पोलिओ,शाळेत न जाणारी मुलं मोजणं, खिचडी चा हिशेब, मुलांना मिळणाऱ्या

read more
 शिक्षक दिन की शिक्षक दीन ?
बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते,  त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुसऱ्या दिवशी वर्गात तो पाठ शिकवावा, तर मुलं मख्ख चेहऱ्याने पाहतात..गालात हसतात..कारण ट्युशन मध्ये हे आधीच शिकवलं असतं.नावीन्य निघून गेलं असतं त्या पाठाचं, मग शिक्षकही कसा बसा तास ढकलतात.
सरकारी शाळांत वेगळं दृश्य..अशीच तयारी असते शिकवायची, पण शिक्षकांना जुंपलं जातं इतर कामांमध्ये..जनगणना, पल्स पोलिओ,शाळेत न जाणारी मुलं मोजणं, खिचडी चा हिशेब, मुलांना मिळणाऱ्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile