साचलेले बरेचं काही खोल मनाच्या गूढ तळाशी गाठ उकलण्या सैल धागे सोड मौन तू बोल स्वतःशी.. काजळ काळे भरले अंबर अवचित आली वळीवाची सर जीर्ण पानगळ त्यागून आता नवलाईचा फुलू दे मोहर.. द्यूत रंगले मनःपटलावर मनाजोगते दान पडेना चितारलेले चित्र देखणे कुठे हरवले?का सापडेना? नजरेला दे नजर तुझ्या तू दर्पणात निरखून स्वतःला घे भरूनी पोलाद मनगटी चेतवून बघ सामर्थ्याला.. पाझरते बघ एकसारखी अथांग थरथर स्पंदनाची तख्त पालथे निशाण फडके आव्हान ,गर्जना दे बंडाची.. ©Shankar Kamble #SunSet #मन #तळ #बोला #मोकळे #आकाश #स्वातंत्र्य #पंख #वारा