Nojoto: Largest Storytelling Platform
shankarkamble7496
  • 71Stories
  • 13Followers
  • 666Love
    314Views

Shankar Kamble

  • Popular
  • Latest
  • Video
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे
श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे...

नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी
श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी...

रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी
लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी...

कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे
बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे...

उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला
किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला...

एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने
रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे...

©Shankar Kamble #माणूस #माणूसम्हणूनजगताना #जीवन #लढा #जगणं #अस्तित्व #प्रेम #चिंतन
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा
युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा...

साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता
पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता...

क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला
पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला...

शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली
लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली...

तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू
मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू...

©Shankar Kamble #Grayscale #लढा #युद्ध #अस्तित्व #लढाई #माणूस #संघर्ष #तलवार #टक्कर
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

शापित यक्ष...

शामलवर्णी अस्तर ओढून
गूढ नभाचे तेज लोपले
झरोक्यातूनी डोकावत का
अनोळखी मी बिंब गोपले..

उगां वाटते वठल्या झाडां
कधी तरी येईल पालवी
आस मनीची सुकते तेंव्हा
वसंत जेंव्हा गरळ कालवी..

कैक फुलांचे कैक ताटवे
स्वैर मुखाने दिशा चुंबिती
कोश पांघरूण खुळा भ्रमर तो
राग वीराणी सर गुंफिती..

विलुप्त झाल्या खुणा गहिऱ्या
मागमूस ना मातीला
आत कोंदला गंध कस्तुरी
कळ युगाची छातीला..

चमचमणारे मंद काजवे
भार पेलती नक्षत्रांचा
शापित यक्ष पैलतीरी मी
श्राप भोगतो आठवांचा..

©Shankar Kamble #Blossom #शाप #एकाकी #कवी #मराठीकविता #शापित #सुमन #काव्य
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

©Shankar Kamble #MerryChristmas #गझल #मराठीप्रेम #जीवन #सुख #झुंज #लढा #कोणी #सत्य
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

©Shankar Kamble #Childhood #गजल #मराठीप्रेम #मराठीकविता #सुख #जीवन #जगणे #दूर #दुरावा
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

गडद गहिऱ्या अंधाराच्या
मखमली सावल्या थांबल्या
पाठमोरी भार उन्हाचा
चिंब पदराआड लांबल्या!१!

सैल मोकळ्या जटा रेशमी
हळूच पूसती गूज कानी
शामल वर्णी गंध दाटला
मंद हासतो पानोपानी!२!

अधरी अवचित जुळून आले
गीत प्रसवले तुला माळले 
धागां–धागां गुंफून हृदयी
चित्र देखणे साकार झाले!३!

विणेच्या झंकारून तारा 
सूर छेडले तेच जुने
काय गवसले मजला आता?
भरली ओंजळ नसे उणे!४!

नक्षत्रांच्या शुभ्र मृत्तिका
पहाट वेळी ओघळल्या
दवबिंदूचे मोती बनूनी
धुक्यात हिरव्या झाकोळल्या !५!

©Shankar Kamble #Ray #रात्रि #रात #सखा #प्रियकर #कृष्ण #सखी #आठवण #याद
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

चोरपावली सांज दाटली रानभूल ही वाट हरवली
थबकत आले भास अवेळी माखून काजळ रेघ ओली..

सताड उघडे दार नभाचे नक्षत्रांचे रम्य फुलोरे
गळूनी गेले शिणले मोती भग्न हासती खिन्न मनोरे..

क्षितीजाच्या या गूढ पटली चितारलेली हळवी नक्षी
तळहातावर गोंदून गेली रंग हळदी पिवळी पक्षी..

जलाशयाच्या संथ दर्पणी बिंब उमटले नवं तरुंचे
मुखं न्याहळी अती कौतुके तरंग भरले डोह मनाचे..

सावल्यांचे खोल जाळे नाते विणती एक क्षणाचे
धूसर झाल्या दृश्य प्रतिमा भाव कोंडले आर्त मनाचे..

©Shankar Kamble #moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

गुंतलेला फास आता मोकळा कर एकदाचा
माळलेला श्वास गहिरा वेगळा कर एकदाचा

अत्तराचे स्पर्श लाभले कोंदणात बिंब जागले
धुंद लहरी श्रावणाचा सोहळा कर एकदाचा

ओलं गहीवर मेघुटांचा भार सलतो सावल्यांचा
दूर माथी डोंगरांच्या हिंदोळा कर एकदाचा

खोल रुजल्या लाज वेली शीळ हलकी गुंफलेली
कैद करण्या स्वैर भ्रमरा सापळा कर एकदाचा

मी न मागितले कधीही शब्द उपरे तोलताना
गुढ कोडे अंधार चकवा उजाळा कर एकदाचा

घासतो दगडावर टाचा घाव बोलके काळजाचे
सान घरटे विणले किंतु पाचोळा कर एकदाचा

©Shankar Kamble #hands #फास #जीव #श्र्वास #प्रेम #जीवन #मोकळा #मराठीशायरी #मराठीप्रेम #शायरी

hands फास जीव श्र्वास प्रेम जीवन मोकळा मराठीशायरी मराठीप्रेम शायरी

6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

गिरेबान मे झांक ये बंदे
टटोल अपने जमीर को
नोंक पे खडी आज जिंदगी
मीटां सरहदे लकीर को..

एक धरा है एक आसमां
पवन एकसी नदी ये जहां
सीमटे अपने आंचल मे सब
रंग वो बरखा जहां तहां..

सात रंग सी हंसी बिखरती
इंद्रधनुष की सजी कमान
हील मील सारे खीलते झुलते
ना रंजीशे खलीश ना गुमान..

जहर नफरत किसने घोला?
रंग बट गये खाली चोला
लहु लुहान हरी धरती
कही पे बारूद कही पे गोला..

भाई भाई खून के प्यासे
छाले पड गये नरम दिल से
अंगारों की ऐसी बारिश
लपटों की फरियाद किससे?

घर जलाने वालो सुनलो
लाख जतन कर धागे बुनलो
एक मजहब एक ही धरम
माटी का ऋण आज चुनलो..

©Shankar Kamble #Aasmaan #देश #देशभक्ति #देशप्रेम #देशभक्त #देशवासी #भारत #इंडिया #माती
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

जळणाऱ्या त्या चितेकडे उगां एकटक पाहत बसलो
आत पेटला जाळ तरी राख उद्याची वाहत बसलो

दबा धरून बसलेल्या श्वानांच्या झुंडी जागोजागी
लचके तोडून कशा हसती पाठ शांतीचा सांगत बसलो

जात माझी तोलतो "तो "पारड्यात ठेवून माणुसकीला
माप भरण्या माणुसकीचे मीच मला मग कापत बसलो

पोतलेला रंग निखळतो खपली उडते पुन्हा पुन्हा
पाया खचला तुझाच वेड्या दोष घराला देतं बसलो

विरक्तीचे हे भस्म लिंपूनी सोहळा झाला देखणासा
पोळे पाहून मधुर घटाचे एकाक्षाने सेवत बसलो

डोळ्यांच्या खाचा झाल्या मन पाझर पाझर आटले
खणतोय पुन्हां तळ आता बळ उसने मागत बसलो

चूल आहे विझली माझी काळोख दाटला भवती
चिमण्यांची फडफड नुसती सूर्यास ऐकवीत बसलो

पायांना माहित कुठले? वाटेचे बंड अघोरी
धुडकावून रुळल्या वाटा पथ नवीन शोधत बसलो

©Shankar Kamble #DiyaSalaai #चिता #मरण #जन्म #राख #गजल #मराठी #MarathiKavita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile