Nojoto: Largest Storytelling Platform

मनाच ओझं कमी करण्यासाठी,कुणाकडे गेलो नाही दुःख सां

मनाच ओझं कमी करण्यासाठी,कुणाकडे गेलो नाही
दुःख सांगून मी कुणाकडे,मदत मागायला गेलो नाही

नियतिने दिलेले केव्हाच,समाप्त करून टाकले आहे
दिलेले दान मागायला,याच्या त्याच्याकडे गेलो नाही

माझाच अंत करण्यासाठी,टपलेले गिधाडे पाहतो मी
शत्रूला मारण्यासाठी,मी कुण्याचा टोळीत गेलो नाही

हे विश्व माझे आहे,हा नभ माझा आहे,सारे दुःख माझे
सुखाचा यादीत माझं नाव,शोधायला कधी गेलो नाही

गुलामीचा बाजार मांडायला,माणसं गोळा झाली होती
मी माणसाशी माणुसकीचा,सौदा करायला गेलो नाही

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad
  #sunrisesunset