Nojoto: Largest Storytelling Platform

प्रसन्नीत मुद्रा॥ सदा मुखी हास्य॥ काय करु भाष्य ॥

प्रसन्नीत मुद्रा॥ सदा मुखी हास्य॥
काय करु भाष्य ॥ ताईवरी॥१॥

पहाट पूर्वेला ॥ सूर्योदय झाला॥
दिवस हो आला॥ सौख्याचा हा॥२॥

थबके रांगोळी॥ आठवल्या ओळी॥
लाऊ लाडीगोळी ॥ ताईपाशी॥

मंगल दिवस ॥ सुखाचा पाऊस॥
तो वाढदिवस ॥ आज आला ॥४॥

आरतीचे ताट॥ पाहु नका वाट॥
औक्षवाण लाट॥ येऊद्या ग॥५॥

ज्ञाना निशा मनी॥ अनघा अश्विनी॥
सुप्रिया ती रानी॥ सार्याजणी॥६॥

औक्षवाण करा॥ पेढा बर्फी चारा॥
सुखाचाच वारा॥ ताईघाला॥७॥

आली धावत ती ॥ रश्मीजी ही आली॥
भेट ती पहिली ॥ आज झाली॥८॥

सचिन कुमार॥ साहित्याचा हार॥
केकाचीच कार ॥ आणली रे॥९॥

निवडक परिवार व काव्यपुष्प समुह तर्फे ताईला शब्दरुपी वाढदिवसाच्या शुभेच्छा
मोहन दादा सोमलकर व सौ.भारतीमोहन

©Mohan Somalkar
  #वाढदिवस