Nojoto: Largest Storytelling Platform
mohansomalkar7420
  • 205Stories
  • 13Followers
  • 1.3KLove
    6.6KViews

Mohan Somalkar

  • Popular
  • Latest
  • Video
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White सोनेरी विण, एका अनोखी प्रेमाची

भाऊबहिणीचे नाते
खुप खुप गोड आहे
म्हणूनच कुठल्याच 
नात्यात नाही एवढी 
या नात्यात ओढ आहे

एकतरी बहिण 
भावाला असावी
तिच्या प्रेमाची ओढ
तिच्या नजरेत दिसावी

बालपणी खुप घेत असतो
भाऊ बहिणीची काळजी
तिच्यासाठी हृदयात ओढ
अन डोळ्यात माया खुजी! 

भावबंधाचे हे नाते
अनोखी असते ह्याची विण!
जितका भाऊ लावतो माया
तितकीच माया लावते बहिण! 

ज्याला नसते दुर्दैवाने बहिण 
तो बहिणीच्या प्रेमाविना थिटा! 
अन ज्याला असते बहिण 
कधी कधी भाऊ ठरे खोटा!

अतुट धागा नात्याचा
तो आहे स्नेहबंधाचा
एक वादा मनात घेतला
बहिणीच्या रक्षणाचा!

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar
  #raksha_bandhan
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White सोनेरी विण, एका अनोखी प्रेमाची

भाऊबहिणीचे नाते
खुप खुप गोड आहे
म्हणूनच कुठल्याच 
नात्यात नाही एवढी 
या नात्यात ओढ आहे

एकतरी बहिण 
भावाला असावी
तिच्या प्रेमाची ओढ
तिच्या नजरेत दिसावी

बालपणी खुप घेत असतो
भाऊ बहिणीची काळजी
तिच्यासाठी हृदयात ओढ
अन डोळ्यात माया खुजी! 

भावबंधाचे हे नाते
अनोखी असते ह्याची विण!
जितका भाऊ लावतो माया
तितकीच माया लावते बहिण! 

ज्याला नसते दुर्दैवाने बहिण 
तो बहिणीच्या प्रेमाविना थिटा! 
अन ज्याला असते बहिण 
कधी कधी भाऊ ठरे खोटा!

अतुट धागा नात्याचा
तो आहे स्नेहबंधाचा
एक वादा मनात घेतला
बहिणीच्या रक्षणाचा!

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar
  #raksha_bandhan_2024 #रक्षाबंधन
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White बारीश पाणी की
===≈=======

बारीश पाणी की
बारीश पाने की
कभी भी आ जाती है बारीश
किसी के मनकी पुरी करने ख्वाईश!
कभी भी आ जाती है बारीश! 

चिखो,चिल्लाओ , धुतकारो मत
बुंदे बारीशके कितने दुरसे इस धरा पर आते है
प्यासे की प्यास, भुके को रोटी देते है...!

मनुष्यगण...!
जो आती है बारीश कोसोदुरसे
वो तुम्हारी गुलाम नही है
जो भिग जाते और चिल्लाते हो
वो तुम्हारे आधीन नही है..!

वर्षारानी आती है खुशियाॅ सारी लेके
चेहरे की मुस्कान अपने ऑचलमे भरके
अपने हर बच्चो का वो दुलार करे
वर्षा ऋतु मे जलधारा आये जल भरके!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  #weather_today बारीश
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White जिवलग ग्रुप अंतर्गत उपक्रम
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 सावळा विठ्ठल (षडाक्षरी काव्य)


नाव माहेराचे
माझ्या ते इंदोरी
जशी वाटे मज
विठूची पंढरी 

तिथेच श्रीक्षेत्र
भंडारा डोंगर
संत तुकाराम
येत नित्यंतर

होते जरी तिथे
घनदाट रान
भय नसे तुका
करीतसे ध्यान

अशी एक दिनी
तुक्याची संगिनी
येत होती वर
भाकरी घेऊनी 

काटा तिच्या पायी 
रुतला जोरात
बसली विठूला
बोल सुनावत

आला तिथे मग
साक्षात ईश्वर
रूप गुराख्याचं
हातकटेवर

काटा काढताना
नव्हती वेदना
देव तो जिजाला 
नव्हती कल्पना

अशा पुण्य भूमी
 बालपण गेले
 असे वाटे काही
 पुण्य कर्म केले



©️®️
सौ. रसिका तुपे 
पुणे

©Mohan Somalkar
  #sad_shayari
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White जिवलग ग्रुप अंतर्गत उपक्रम
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 सावळा विठ्ठल (षडाक्षरी काव्य)


नाव माहेराचे
माझ्या ते इंदोरी
जशी वाटे मज
विठूची पंढरी 

तिथेच श्रीक्षेत्र
भंडारा डोंगर
संत तुकाराम
येत नित्यंतर

होते जरी तिथे
घनदाट रान
भय नसे तुका
करीतसे ध्यान

अशी एक दिनी
तुक्याची संगिनी
येत होती वर
भाकरी घेऊनी 

काटा तिच्या पायी 
रुतला जोरात
बसली विठूला
बोल सुनावत

आला तिथे मग
साक्षात ईश्वर
रूप गुराख्याचं
हातकटेवर

काटा काढताना
नव्हती वेदना
देव तो जिजाला 
नव्हती कल्पना

अशा पुण्य भूमी
 बालपण गेले
 असे वाटे काही
 पुण्य कर्म केले

©Mohan Somalkar
  #sad_shayari
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White माऊली भेट(अभंग)

निघालो वारीला॥ विठ्ठल भेटीला॥
मनी सजविला ॥ भेटीयोग ॥

दर्शनास लागे॥ भक्तांचीच रिघ॥
दिंडीचा परीघ॥ डोळी दिसे॥२॥

आस लागे जिवा॥ पंढरीला जावे॥
तल्लीन मी व्हावे॥ भजनात ॥३॥

कानात भरला॥ टाळांचा गजर॥
हृदयाला पाझर ॥ फुटे कसा॥४॥

होऊनिया दंग॥ वाजवी मृदुंग ॥
ऐकुनी अभंग ॥ मन लागे॥५॥

विटेवरी उभा॥ अठ्ठावीस युगे॥
भक्त सदा जागे॥ विठुसाठी॥६॥

आषाढ कार्तिकी॥ पंढरीची वारी॥
आर्त हाक खरी॥ माऊलीची॥७॥

जय हरी विठ्ठल 🙏🏻

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar
  #अभंगगाथा
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White पाऊसधारा(नववृंद काव्य)

कारे मेघराजा रुसला 
ढगात जाऊन लपला
निघ ना नभातून आता
किती पाहशील परिक्षा
किती अशी देशील शिक्षा
पडशील धरणीवर 
येईल ना छान बहर
मृग नक्षत्रही संपला
राग तुला आला कसला!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  #Yoga
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White *आभाळ भरुन येतांना*
🌈⛈️🌈🌩️🌈🌨️🌈

पाहिलं होतं मी काल
आभाळ भरुन येतांना
अचानक गेली नजर
घरी ऑफिसमधून जातांना!

आलं होत भरुन आभाळ 
तसं मनही भरुन आलं!
अचानक चिंब ओल्या सरीचं 
जणु आभाळाने स्वप्न दाखविलं

रोज रोज असंच
आभाळ भरुन येतं
पाऊस काही पडेना
मन माझे मग रोज
हिरमुसलं होतं! 

पावसा पावसा !
कधीतरी मनसोक्त पडशील का?
का फक्त असंच स्वप्न दाखवतं 
एक एक दिवस काढशील का?

एक दिवस मोठा तु
खुप तुफान घेऊन बरसतो!
बिचारा बळीराजा 
तुझ्यावर विश्वास ठेवून पेरणी करतो

फक्त खोटं स्वप्न तू
बळीराजाचा दाखवतो!
असाच दरवर्षी तु पावसा
नुसता टाईमपास करतो!


कित्येकदा पाहिलं मी
आभाळ भरुन येतांना!
नशीबाने मुसळधार पडला तु
पाहिलं मग मी डोळे भरुन येतांना!

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar
  #good_night
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White जय श्री. गजानन....

भेटला अफाट ॥ तो जनसागर ॥
भक्तीचा आगर ॥ शेगावीला ॥१॥

जणु वाहे पाणी॥ संथ अनवाणी ॥
गुण्यागोविंदानी॥ शेगावीला ॥२॥

सारी मोहमाया॥ विसरुन काया॥
दर्शन घ्यावया॥ येई सारे॥३॥

तिथे ना कल्लोळ ॥ नसे कुजबुज ॥
पहावया तुज ॥ येई सारे॥४॥

प्रतिक्षा संपते॥ दर्शन घडते॥
देवा तु दिसते॥ डोळ्यात रे॥५॥

पहात रहावे॥ डोळी साठवावे॥
समाधीस्थ व्हावे॥ तुझ्यापाशी ॥६॥

चालता मी होतो॥ पाय अवजड ॥
वाटे रस्ता गड॥ निघतांना॥७॥

जय गजानन ॥ जय माऊली🙏🌷

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar
  #aloneभक्ती
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

White आयुष्य जगतांना

आयुष्य जगतांना
आयुष्यच घेते परिक्षा 
मन आपले मजबूत ठेवा
स्वतःला देऊ नका शिक्षा! 

आयुष्य जगतांना
आयुष्याच्या वाटेवर काटे असतात 
त्या काट्यांना फुल बनवा 
जे असे करतात तेच खरे जीवन जगतात 

आयुष्य जगतांना
डगमगून जाऊ नका!
इथे प्रत्येक वळणावर 
मिळे धोकाच धोका!

आयुष्य जगतांना
मनात सकारात्मक विचार ठेवा!
चाला आपल्या मर्जीनुसार 
करु नका कुणाचा हेवा!

आयुष्याला द्या हसतमुखाने तोंड 
संघर्षाशिवाय जीवन नाही!
तडजोड आयुष्यात करा
अडचणीचा करा बिमोड

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar
  #कविताई
loader
Home
Explore
Events
Notification
Profile